Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाटण तालुक्यात 23 ग्रामपंचायतीत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 28 एप्रिलला होणार मतदान

मंगळवारी (दि.२८) एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. बुधवारी (दि.२९) मतमोजणी होणार आहे. एकंदरीत पाटण तालुक्यात पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा रणधुमाळी पाहावयास मिळणार

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 20, 2026 | 11:30 AM
पाटण तालुक्यात 23 ग्रामपंचायतीत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

पाटण तालुक्यात 23 ग्रामपंचायतीत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Follow Us
Follow Us:

पाटण : तालुक्यातील थेट सरपंच, सदस्य यांचे निधन, राजीनामा, अनर्हता अथवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार पाटण तालुक्यातील ६ ठिकाणी थेट सरपंच व १७ ग्रामपंचायतींमधील सदस्य अशा एकूण २३ ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांची पोट निवडणूक होणार आहे. यासाठी २८ एप्रिल प्रत्यक्ष मतदान घेण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा निवडणूक रणधुमाळी पाहावयास मिळणार आहे.

तालुक्यातील भारसाखळे, संभाजीनगर, झाकडे, मान्याचीवाडी, गुंजाळी, गोठणे या ६ ग्रामपंचायतीत सरपंचपद रिक्त असल्याने येथे थेट सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे. गोठणे, कराटे, ढोरोशी, किल्ले मोरगिरी, नारळवाडी, मारूल हवेली, घोटील येथील प्रत्येकी ३, गाडखोप २, नाव, बहुले, लेंढोरी, भिलारवाडी, निवी येथील प्रत्येकी १, मराठवाडी, म्हावशी येथील प्रत्येकी ४ अशा रिक्त सदस्यपदांच्या जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

हेदेखील वाचा : Satara Politics : सातारा जिल्हा परिषदेत सत्तेची ‘गुढी’ उभारणार कोण? अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग

या पोटनिवडणुकीसाठी मंगळवार ७ ते सोमवार १३ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन पत्र सादर करता येणार आहेत. बुधवार १५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजल्यापासून अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. शुक्रवार १७ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार आहेत. त्याचदिवशी दुपारनंतर निवडणूक चिन्ह वितरण व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. मंगळवारी (दि.२८) एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. बुधवारी (दि.२९) मतमोजणी होणार आहे. एकंदरीत पाटण तालुक्यात पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा रणधुमाळी पाहावयास मिळणार आहे.

हेदेखील वाचा : प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार? राज्यसभा निवडणुकीनंतर महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता

Web Title: Schedule announced for by elections in 23 gram panchayats in patan taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Patan News
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : कॉकरोच जनता पार्टीची साताऱ्यात महत्त्वपूर्ण बैठक; दुष्काळ निर्मूलन, शिक्षण सुधारणांसाठी विशेष रणनीती
1

Satara News : कॉकरोच जनता पार्टीची साताऱ्यात महत्त्वपूर्ण बैठक; दुष्काळ निर्मूलन, शिक्षण सुधारणांसाठी विशेष रणनीती

Satara News: ठेकेदाराची मनमानी अन् प्रशासनाची चुप्पी! वाई–पाचगणी मार्गावर धुळीचा कहर, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
2

Satara News: ठेकेदाराची मनमानी अन् प्रशासनाची चुप्पी! वाई–पाचगणी मार्गावर धुळीचा कहर, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Satara Forest Department: उसाच्या फडात सापडले बिबट्याचे २ बछडे! वन विभागाने घडवली आईशी भेट
3

Satara Forest Department: उसाच्या फडात सापडले बिबट्याचे २ बछडे! वन विभागाने घडवली आईशी भेट

Satara News : साताऱ्यात उद्या ‘एक दिवा सैनिकांसाठी’; पालकमंत्री शंभूराज देसाई वीरमाता-पित्यांसोबत साजरी करणार दिवाळी
4

Satara News : साताऱ्यात उद्या ‘एक दिवा सैनिकांसाठी’; पालकमंत्री शंभूराज देसाई वीरमाता-पित्यांसोबत साजरी करणार दिवाळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.