Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील स्कूलबस मालक उद्यापासून जाणार संपावर; ‘या’ आहेत प्रमुख मागण्या…

शालेय वाहतुकीसंदर्भातील अनेक समस्यांकडे शासनाचे व वाहतूक खात्याचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ शाळा 'बस ऑनर्स असोसिएशन'ने हा निर्णय घेतला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 01, 2025 | 01:08 PM
उद्यापासून स्कूलबस मालक संपावर

उद्यापासून स्कूलबस मालक संपावर

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यातील शाळा बस मालकांनी बुधवारपासून अनिश्चित काळासाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय वाहतुकीसंदर्भातील अनेक समस्यांकडे शासनाचे व वाहतूक खात्याचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ शाळा ‘बस ऑनर्स असोसिएशन’ने हा निर्णय घेतला आहे. शासनाने जर आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर 2 जुलैपासून आम्ही संपूर्ण राज्यभर शाळा बस सेवा बंद ठेवू’, अशी भूमिका त्यांनी घेतली.

आमच्या संघटनेची भूमिका सेवा थांबवण्याची नसली, तरी शाळा बस व्यवसायात निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे शाळा बस ऑनर्स असोसिएशनने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. ई-चलनाद्वारे होणारी कारवाई थांबवण्याची मागणी केली. शालेय वाहतूक सेवेसंदर्भातील सर्व शिफारसी शाळा बस सेवेवर लागू केल्याची स्पष्टता देणारे ई-चालान त्वरित रद्द करावेत. सर्व मान्यताप्राप्त शाळा बस चालकांना ओळखपत्र देण्यात यावे.

याशिवाय, शाळा बस वाहनांवरील नियमांचे पालन करणाऱ्या वाहनांवर कोणताही अन्यायकारक दंड लादू नये. शासन, शाळा प्रशासन व शाळा बस संघटनांसह संयुक्त टास्क फोर्स स्थापन करावी. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी व शालेय वाहतुकीतील अडचणी सोडवण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे.

…तर संपूर्ण राज्यभर शाळा सेवा बंद ठेवणार

शासनाने जर आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर आम्ही संपूर्ण राज्यभर शाळा बस सेवा बंद ठेवू. आमच्या संघटनेची भूमिका सेवा थांबवण्याची नसली, तरी शाळा बस व्यवसायात निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे.

– अनिल गर्ग, अध्यक्ष, स्कूल बस ऑनर्स असोसिएशन

यंदा शाळांना वर्षभरात 128 सुट्ट्या

शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांसाठी २०२५-२६ साठीचे सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर केले असून, यंदा विद्यार्थ्यांना वर्षभरात एकूण १२८ दिवस सुट्ट्या मिळणार आहेत. यामध्ये ५२ रविवारशिवाय ७६ अधिकृत सुट्यांचा समावेश आहे. यामध्ये दिवाळीची १० दिवसांची (१६ ते २७ ऑक्टोबर) आणि उन्हाळ्याची ३८ दिवसांची (२ मे ते १३ जून) सुट्टी विशेष ठरणार आहे.

Web Title: School bus owners in maharashtra will go on strike from tomorrow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 01:08 PM

Topics:  

  • maharashtra news
  • school bus

संबंधित बातम्या

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं
1

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं

Maharashtra Rain Update: महाराष्ट्र पावसाचा कहर! समुद्र खवळला, नद्यांची पातळीही ओलांडली
2

Maharashtra Rain Update: महाराष्ट्र पावसाचा कहर! समुद्र खवळला, नद्यांची पातळीही ओलांडली

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…
3

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

स्कूलबसबाबत मोहिम; नियम मोडणाऱ्यांना दणका, चार महिन्यात लाखोंचा दंड वसूल
4

स्कूलबसबाबत मोहिम; नियम मोडणाऱ्यांना दणका, चार महिन्यात लाखोंचा दंड वसूल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.