Second National Lok Adalat in all courts in Solapur district news
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट येथे भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. मालवणमधील राजकोट येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत मोठी दुर्घटना घडली होती. यामध्ये पुतळा पूर्णपणे कोसळला होता. यानंतर राज्य सरकारकडून पूर्ण काळजी घेऊन आणि अनुभवी शिल्पकारांच्या मदतीने नवीन पुतळा उभारण्यात आला. कोकणातील या भव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झाले आहे. यावेळी फडणवीस यांनी हा पुतळा शिल्पकार राम सुतार यांनी अतिशय सुंदर पुतळा बनवला आहे. कितीही जोरदार वारा किंवा वादळ आले तरी पुतळा उभा राहील. हा पुतळा सुमारे ९१ फूट उंच आहे. त्याचा पाया १० फूट उंच आहे. तसेच हा महाराजांचा देशातील सर्वात उंच पुतळा आहे,” अशी माहिती दिली.