Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Saraf: “… कधीही विसरू शकत नाही”; ‘कला जीवनगौरव पुरस्कार’ मिळाल्यावर काय म्हणाले अशोक सराफ?

मला मिळालेले पुरस्कार मी जपून ठेवले असून ते मला सतत ऊर्जा देणारे आहेत, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 13, 2025 | 08:49 PM
Ashok Saraf: “… कधीही विसरू शकत नाही”; ‘कला जीवनगौरव पुरस्कार’ मिळाल्यावर काय म्हणाले अशोक सराफ?
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण अशा थोर व्यक्तीच्या नावाने मला पुरस्कार मिळाला, हे माझे भाग्यच आहे. पुणेकरांनी आजपर्यंत मला भरभरून प्रेम दिले आहे, त्यांचे हे प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही. मला मिळालेले पुरस्कार मी जपून ठेवले असून ते मला सतत ऊर्जा देणारे आहेत, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली.

स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगालॉज मित्र मंडळातर्फे पहिले मुख्यमंत्री, लोकनेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण कला व साहित्य पुरस्कार समारंभात कै. प्रकाश ढेरे स्मृत्यर्थ ‘कला जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिरात प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते नागराज मुंजुळे उपस्थित होते.

याप्रसंगी सुनिता झाडे (नागपूर) यांना ‘शब्दांच्या पसाऱ्यातील आत्महत्या’ या कविता संग्रहासाठी कै. शिवाजीराव अमृतराव ढेरे यांच्या स्मृत्यर्थ ‘साहित्य पुरस्कार’, फेलिक्स डिसोजा (वसई) यांना आरशात ऐकु येणार प्रेम या कविता संग्रहासाठी कै. बाबासाहेब जाधव यांच्या स्मृत्यर्थ साहित्य पुरस्कार, सफर अली इसफ (वैभववाडी) यांना ‘अल्लाद ईश्वर’ कवितासंग्रहासाठी कै. धनाजी जाधव स्मृत्यर्थ ‘साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जेष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ, ज्येष्ठ कवी व वात्रटिकाकार रामदास फुटाणे, जेष्ठ लेखक व कवी प्रा. फ.मु. शिंदे, अशोक नायगावकर , ट्रस्टचे विजय ढेरे, संजय ढेरे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, गौरव फुटाणे, सचिन जाधव, कुणाल जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

पुरस्काराला उत्तर देताना अशोक सराफ म्हणाले, थोर व्यक्तीच्या नावाने मला पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार माझा सन्मान आहे, प्रेम मी विसरणार नाही. स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्टचा ऋणी आहे. पुणेकरांनी नेहमीच माझे कौतुक केले याचेही यावेळी त्यांनी नमूद केले. डॉ. मोहन आगाशे म्हणाले, अशोक सराफ हा कलाकार तळागाळात मिसळणारा आहे. त्यांच्यात बडेजावपणा, इगो अजिबात नाही. कधीही केव्हाही भेटणारा साधा सरळ हा माणूस आहे. साध्या सरळ माणसाला हा पुरस्कार मिळाल्याने खरोखर आनंद आहे.

नागराज मुंजुळे म्हणाले, अशोक मामाच्या साध्या आणि सरळ स्वभावामुळे मीच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र त्यांचा चाहता आहे. हा माणूस आभाळासारखा आहे. कारण मी त्यांना अनुभवलं आहे. मी काहीही नसताना त्यांचा बाईट घेण्यासाठी गेलो असता, कुठून आला, कोण आहेस असे कोणतेही आढेवेढे न घेता माझ्या खांद्यावर हात ठेवून मला पहिला बाईट दिला. हा माणूस चित्रपट क्षेत्रातलाच नव्हे तर खऱ्या जीवनातला देखील हिरो आहे, सही यावेळी त्यांनी सांगितले. ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ढेरे व जाधव परिवाराने गेली 39 वर्षे कार्यक्रमातून यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती जतन ठेवल्या आहेत. यशवंतराव चव्हाण यांचा संस्कृतपणा आणि राजकारण पुढे घेऊन जायचे आहे. सध्याची महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृतपणा हरवत चाललेला आहे. महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा जोपासण्याचे आपले सर्वांचे काम आहे. यशवंतरावाचा सुसंस्कृतपणा ढेरे-जाधव परिवार जोपासत आहे कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले.

मराठी मातीचा सुगंध, हळव्या मनाच्या माणसांनो काळजी घ्या थोडी, आता दिवसेंदिवस जगणं कठीण होत चाललं, आमच्या पप्पांनी आमदार फोडला.., मला आई व्हायचं नाही., कुणाचे आहे शरीर काही विखुरलेली छिन्न, स्त्री कधी मंदिरातील विना…, हे 376 दाखल करणाऱ्या माझ्या प्रिया बापांनो, तुमच्या आई-लेकीनं, बापू तुमचा चष्मा हरपला, भक्त कुणाचाही असो, काळ्या मातीत मातीत, कुणाच्या नावाचं डोरलं गळ्यात, आणि माझे दुःख गळून गेलेअशा वास्तव जीवनावर कविता सादर करुन श्रोत्यांना अंतर्मुख केले. सध्याच्या कोलमोडून पडलेल्या राजकीय परिस्थितीवर कवीनीं आपली कविता सादर करुन लोकशाही जीवंत ठेवण्याचे आवाहन कवि संमेलनातून केले. श्रोत्यांनी यावेळी कविसंमेलनाला भरभरुन दाद दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. सत्कारानंतर राज्यभरातून आलेल्या प्रख्यात कवींचे कवी संमेलन रंगले.

गेली 39 वर्षांपासून यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त पुरस्कार सोहळा कवी संमेलन अविरतपणे होत आहे. दरम्यान कवी संमेलनाला श्रोत्यांची तुडुंब गर्दी झाली होती.
तीन पुरस्कार विजेते कवींसह अंजली कुलकर्णी, प्रकाश होळकर, कल्पना दुधाळ, मृणालिनी कानिटकर, अनिल दीक्षित, बालिका विखले, वैशाली पतंगे, शशिकांत तिरोडकर, नितीन देशमुख, गुंजन पाटील यांनी सहभाग घेतला होता. ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, प्रा. फ. मुं. शिंदे व अशोक नायगावकर यांनी कवि संमेलनाचे सूत्रसंचालन केले. यावेळी राजकारण, समाजातील व्यथा कवितेतून केले. तसेच आपल्या खास भाषेतून कविता सादर करुन श्रोत्यांची मने जिंकली. टिळक स्मारक मंदिर श्रोत्यांनी तुडूंब भरले होते.

नितीन देशमुख यांनी यशवंतराव ही कविता सादर करून कवी संमेलनाची सुरुवात केली . ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी ‘ माझ्या मराठी मातीचा सुगंध मला जीवापाड छंद ही कविता सादर करून इजात मराठी भाषेचा गौरव केला. नितीन देशमुख यांनी
‘फुलात भिजल्या, लाटात भिजली होडी,
हळव्या मनाच्या माणसांनो काळजी घ्या थोडी
वेगवेगळी फुलझाडे पाचोळा झाली आता,
सर्व कमळाच्या फुलापाशी गोळा झाली आता
सध्याच्या राजकारणावर विडंबन करणारी कविता त्यांनी सादर केली. त्यांनी टाळ्यांची दाद देत कवीने वाह वा मिळवली.

रामदास फुटाणे यांनी ‘ शूर आम्ही आमदार आम्हाला ईडीची भीती’ ही सद्य स्थिती वर कविता सादर करून कवि संमेलनात रंग भरला. ज्येष्ठ कवी फ. मु .शिंदे यांनी ‘कळेना काय कुठे कुठवर हे भोगावे ही कविता सादर करून अंतर्मुख केले. कल्पना दुधाळ यांनी माळरानावरील शेतीची परिस्थिती, शेतकऱ्यांच्या कष्टाचे चित्रण ‘ वस्तीवर करवंदाची झाडे असती अजुन’ या कवितेतून मांडली. तर प्रकाश होळकर यांनी देखील करायच्या बिकट परिस्थितीवर कविता सादर करून अच्छे दिन कधी येणार? असा सवाल आपल्या कवितेतून उपस्थित केला. ‘आता दिवसेंदिवस जगणं किती कठीण होत चाललेलं’ या कवितेतून शेतकऱ्याच्या व्यथा त्यांनी मांडल्या. सुनिता झाडे यांनी ‘ काय बरं ओवती ती’ महिलेच्या संघर्षावर कविता सादर केली. फेलिक्स डिसोजा यांनी ‘कुणाच्याच कसं आलं नाही लक्षात’ ज्येष्ठ महिलेवरील कविता सादर केली. सफर अली इसफ यांनी ‘ कवी शब्दांची रोजच खेळत असतो’ या कवितेतून दारिद्र्य, लोकशाही, बेरोजगारीची दाहकता मांडली.

गुंजन पाटील, वैशाली पतंगे, बालिका विखले आणि सुनीता झाडे यांच्यासह इतर कवींनी कविता सादर करून महिला सुरक्षितेचे आवाहन केले. गझल, प्रेमगीते, राजकरण्यांवर विडंबन कविता सादर करत उत्तोरात्तर संमेलन रंगत गेले. त्याचबरोबर कवि रामदास फुटाणे व अशोक नायगावकर यांच्या खास शैलीतील किस्यात श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. कवयित्री कवितेद्वारे तसेच यांनी महिलांच्या समस्या, व्यथा आणि स्वाभिमान त्याच्या रचनांतून मांडल्या. महिलांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते यावर भाष्य केले. अनिल दीक्षित यांनी राजकारणी पत्रातून जनतेला काय मागणी करतो त्यांच्या विडंबन कवितेतून सादर केले.

अनेक कवीनीं राजकीय त्याच्या व्यंगावरील कवितेने रंग भरला. या कवितेला रसिकांची चांगली दाद मिळाली. कवि संमेलनात कवींनी एकाहून एक सरस कविता सादर करुन श्रोत्यांची वाहवा मिळविली. कवयित्रींकडून स्त्रियांच्या जिव्हाळा, निसर्गसौंदर्य, प्रेम-विडंबन, अशा अनेक विषयांना स्पर्श करत कवींनी रसिकांना खिळवून ठेवले होते. तर निसर्ग व प्रेम कवितांच्या सादरीकरणाने कवीनीं श्रोत्यांची वाहवा मिळविली. कवि डॉ. विठ्ठल वाघ यांनी आपल्या खास आवाजात गुलामगिरी वरील अरे कसं सासून ही कविता सादर करुन कार्यक्रमाचा समारोप केला. या कवी संमेलनास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कवितेचा आस्वाद घेतला

Web Title: Senior marathi actor ashok saraf awarded by kala jeevan gourav purskar balgandhrva rangmandir pune entertainment news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2025 | 08:49 PM

Topics:  

  • ashok saraf
  • Entertainement News
  • Pune

संबंधित बातम्या

Aryan Khan: आर्यन खानच्या पहिल्या वेब सीरिजचा फर्स्ट लूक प्रदर्शित, दिग्दर्शकाच्या भूमिकेत गाजवणार बॉलिवूड
1

Aryan Khan: आर्यन खानच्या पहिल्या वेब सीरिजचा फर्स्ट लूक प्रदर्शित, दिग्दर्शकाच्या भूमिकेत गाजवणार बॉलिवूड

सायलीच खरी तन्वी! सत्य समोर येणार तेवढ्यात… ; ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट; ‘असं’ येणार नवं वळण
2

सायलीच खरी तन्वी! सत्य समोर येणार तेवढ्यात… ; ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट; ‘असं’ येणार नवं वळण

कोलकातामध्ये ‘The Bengal Files’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, तणावाचे वातावरण
3

कोलकातामध्ये ‘The Bengal Files’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, तणावाचे वातावरण

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी
4

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.