
Raigad News: खोपोली हत्याकांडानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू; आ. महेंद्र थोरवेंवर केले गंभीर आरोप
Raigad News: रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील शिंदे गटाच्या शिवसेनेचे कार्यकर्ते तसेच नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची २६ तारखेला निघृण हत्या झाली. या प्रकरणानंतर शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर वारंवार टीकास्त्र सोडले होते. दरम्यान, शिंदे गटाकडून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्यावरही सोशल मीडियावरून टीका करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कर्जत येथील शिवालय पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, तालुका प्रमुख बाजीराव दळवी, माजी तालुका प्रमुख पंढरीनाथ राऊत, उपस्थित होते.
हेही वाचा: Raigad News: रायगडमधील पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल, पर्यटकांना समुद्र किनाऱ्यांची भुरळ
पोलिसांच्या हलगर्जीपणावरही केले भाष्य
पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे अशा घटना पुन्हा पुन्हा घडत असल्याचा आरोप करत, आम्हाला संयम घेण्यास पोलिस प्रशासन सांगत असताना अशा पद्धतीने बदनामी करणाऱ्यांना पोलिसांनी योग्य समाज द्यावी अन्यथा भविष्यात पोलिस ठाण्याविरोधात भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही नितीन सावंत यांनी दिला आहे. यावेळी सर्व पर्शाच्या कार्यकत्यांनी एकत्र येऊन न्यायासाठी लढण्याचे आवाहन करण्यात आले.
आ. महेंद्र थोरवेंना दिला तीव्र इशारा
यावेळी सुरुवातीला आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर गंभीर आरोप केले. बाबू घारे आणि पंढरीनाथ राऊत यांनीही आमदार थोरवे यांच्यावर टीका करत तीव्र इशारा दिला. दरम्यान, सोशल मीडियावर नितीन सावंत यांच्याबाबत आक्षेपार्ह उल्लेख करत ‘पक्षाला राष्ट्रवादीच्या दावणीला बांधण्याचा आरोप झाला आहे. अशा पोस्टर आणि पोस्टद्वारे बदनामी केली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिका-यांनी केला.
हेही वाचा: Raigad News: शेकापला मोठा धक्का! वाहतूक सेल रायगड जिल्हाध्यक्ष जयेंद्र शेळके शेकडो समर्थकांसह भाजपात
मंगेश आप्पा काळोखे यांच्या हत्येची घटना 66 ही माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या घटनेनंतर चार दिवसांपासून आम्ही कोणतेही राजकारण न करता पीडित कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्याची भूमिका घेतली होती. मात्र काही लोकांनी या घटनेचा वापर करून राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
– नितीन सावंत, उपजिल्हाप्रमुख, उबाठा