Raigad News: रायगडमधील पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल, पर्यटकांना समुद्र किनाऱ्यांची भुरळ
जिल्ह्याला विस्तृत आणि मनमोहक समुद्र किनारा लाभला आहे. त्यामध्ये अलिबाग-नागाव, अक्षी, वरसोली, मुरुड- काशिद, श्रीवर्धन दिवेआगर, हरिहरेश्वर येथील समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालत आहे. हे सर्व समुद्र किनारे पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. किनाऱ्यांवर बोटींग, घोडागाडी, बाईक राईडची मजा पर्यटक लुटत आहेत. श्रीवर्धन येथील काळींजे व दिवेआगर येथील कंदळवण पर्यटनाचा देखील आनंद लुटत आहे, असे शंतनु कुवेसकर यांनी सांगितले. (फोटो सौजन्य – Pinterest)
शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर शिवप्रेमी मोठ्या संख्येने येत आहेत. गडावर जाण्यासाठी अनेकजण रोपवेला पसंती देत आहेत. त्यामुळे काही काळ यांनी रोपवेवर रांगा लावाव्या लागत आहेत. राज्यभरातून शाळेतील विद्यार्थी सुद्धा सहलीसाठी रायगड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात येत आहेत. असे येथील व्यवसायिक अजित औकीरकर सांगितले. मुरुड आणि अलिबाग समुद्रकिनार्याची मजा लुटतांनाच पर्यटक येथे असलेल्या मुरुड जंजिरा आणि कुलाबा किल्ल्याला आवर्जून भेट देत आहेत. आणि तिथला इतिहास जाणून घेत आहेत. कुलाबा किल्ल्यावर चालत किंवा घोडागाडीने जाता येते.
नाताळच्या सुट्या आणि नवे वर्ष यामुळे किनार्यावर जल्लोष करण्यासाठी पर्यटकांनी येथे तळ ठोकून ठेवला आहे. सर्वच ठिकाणची बुकींग फुल्ल झाली असली तरी देखिल काही हॉटेल व कॉटेजमध्ये ऐन वेळी येणाऱ्या पर्यटकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काही हॉटेलमध्ये नाताळ व वर्टीफर्स्टच्या पार्टीसाठी खास सुट व आकर्षक ऑफर दिल्या आहेत, ज्यामध्ये राहणे व खाण्यासाठी विशेष कुपनची व्यवस्था करण्यात आली आहे.
Mumbai News : पश्चिम मुंबईसाठी २००० मीटर लांबीचा विशेष आराखडा, कसा असेल प्रकल्प? जाणून घ्या…
66 दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वरला पर्यटकांसह भाविकांचीही पसंती असते. कारण एकाच ठिकाणी भव्यसमुद्र किनारा आणि देवदेर्शन अशा दोन्ही गोष्टीचा सुरेख संगम तेथे साधता येतो. कॉटजची व लॉजची व्यवस्था आहे. एक दिवसासाठी दोन व्यक्तीना राहण्याचा दर १२०० ते १२००० रुपये पर्यंत देखील आहे.- अमित खोत, व्यवसायिक






