संभाजीनगर : येथील तहसील कार्यालयात सेतू केंद्राची (Setu Center) सेवा बंद असल्याने विद्यार्थी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मागील 15 दिवसांपासून नागरिकांना सर्व्हर डाऊनचा (Server Down) फटका सहन करावा लागत आहे.
सेतू केंद्र बंद असल्याने विविध प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावे लागत आहे. मुलचेरा तालुका आदिवासी बहुल असून, गावखेड्यांची संख्या 70 आहे. या भागातील ऑनलाइन प्रक्रिया नेहमीच खंडित होत असते. मागील अनेक दिवसांपासून कधी वीजपुरवठा खंडित, कधी नेटची समस्या, तर कधी कृत्रिम समस्येमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आता शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असून, महविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
प्रवेशासाठी सेवाकेंद्र
जातीचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेयर, अधिवास, शपथपत्र या प्रमापत्राची प्रवेशासाठी आवश्यता आहे. मात्र, सेतू केंद्रातील सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे प्रमाणपत्र वेळवर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहेत. विद्यार्थी गेल्या 15 दिवसांपासून तहसील कार्यालयाच्या चकरा मारत आहेत.
विद्यार्थ्यांना मोठा मन:स्ताप
सद्यस्थितीत शेतीचा हंगाम सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच पालकांनाही मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. सेतूच्या प्रवेशद्वारावर सहर डाऊनचा फलक लागून असल्याने विद्यार्थी व पालकवर्गासमोर प्रमाणपत्र मिळविण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.