Shaktieeth Expressway: ‘शक्तिपीठ’ महामार्गावरून पुन्हा जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीकडून तीव्र विरोध केला जात आहे. तर या विरोधाची धार कमी करण्यासाठी या महामार्गाच्या समर्थनार्थ महायुती उतरली आहे. महामार्ग रोको, विठ्ठलाला साकडे या आंदोलनांना प्रत्युत्तर देण्यासाठी मेळावे घेतले जात आहेत. या निमित्ताने महायुती व महाविकास आघाडी आमने-सामने आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टला चंदगडचे भाजपा प्रणित अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांनी समर्थन देत हा महामार्ग गडहिंग्लज, चंदगड मतदारसंघातून नेण्यात यावा यासाठी प्रयत्न चालवल्याने एकच खळबळ उडाली आहे. याविरोधात गडहिंग्लज उपविभागातील शेतकर्यांनी कॉं. संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडले आहे. शिरोळ,कागल, भुदरगड पाठोपाठ गडहिंग्लज उपविभागातील शेतकर्यांनी विरोध केला आहे.
शेतकर्यांचा विरोध असताना देखील आम. शिवाजीराव पाटील यांनी जनतेला विश्वासात न घेता ही अनाठायी व अवाजवी मागणी केली आहे. यामागचे नेमके गौडबंगाल काय? अशी विचारणा गडहिंग्लज उपविभागातील शेतकर्यांनी केली आहे . प्रस्तावित शक्तिपीठ मार्गा मुळे चंदगड, गडहिंग्लज, आजरा तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. पिकांसह, पर्यावरणाची हानी होणार आहे. या महामार्गाला पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांनी विरोध केला आहे. तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील आपल्या मतदारसंघातून महामार्ग नेण्यास विरोध करीत शिवाजीराव पाटील यांच्या मागणी कडे लक्ष वेधत चंदगड मधील शेतकर्यांचा विरोध नसेल तर तेथून महामार्ग जाण्यास काय हरकत आहे असे सूचक विधान केल्याने हा प्रस्तावित महामार्ग पुणे बेंगलोर महामार्ग समांतर हत्तरगी मार्गे राजगोळी ते गडहिंग्लज उपविभागातील चंदगड तालुक्यातील मोठ्या गावातून गोवा राज्याला जोडण्याचा घाट घातला जात आहे अशी चर्चा आहे. आम. शिवाजीराव पाटील यांनी चार पर्याय सुचवल्याने गडहिंग्लज उपविभागातील शेतकरी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
Bihar Election: बिहार जिंकण्यासाठी नितीश कुमारांनी खेळला मोठा डाव; सरकारी नोकरीत महिलांना थेट…
प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी कोल्हापूरसह १२ जिल्ह्यात एक जुलैला महामार्ग रोको झाला. त्याला उस्फूर्त प्रतिसाद लाभला. मात्रं भाजपाला पाठींबा देणारे फडणवीस समर्थक शिवाजीराव पाटील यांनी हा महामार्ग चंदगड मतदारसंघातून नेण्यात यावा यासाठी प्रयत्न सुरू केल्याने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कोल्हापुरातून जाणार्या महामार्गाबाबत भूसंपादनाची रद्द झालेली प्रक्रिया पुनस्थापित करण्याच्या मुद्याला मंत्रिमंडळात ना. मुश्रीफ व ना आबीटकर यांनी विरोध केला असताना भाजपाला पाठिंबा देणारे शिवाजीराव पाटील आणि शिंदे शिवसेनेचे आम. राजेश क्षीरसागर यांनी आपल्या मतदारसंघातून हा प्रस्तावित महामार्ग नेण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पुण्याला आणखी नवीन 5 पोलीस ठाणे! 30 चौक्यांचीही निर्मिती होणार
राज्य सरकारने १२ जिल्ह्यांतून शक्तिपीठ महामार्ग करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी नुकतीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधीची तरतूद करण्यास मंजुरी देण्यात आली; परंतु या महामार्गालाच कोल्हापूरसह १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध दिसत आहे.त्यामुळे मोजणीसह अन्य सर्वेक्षणाला येणाऱ्या यंत्रणेला शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. त्यातच शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीबरोबर महाविकास आघाडीने हा मुद्दा पहिल्यापासून लावून घरला आहे. वेळोवेळी आंदोलन करून या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. राज्य सरकारने संपूर्ण मार्गासाठी निधी मंजूर केल्याने विरोधाची धार वाढली आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रश्न उपस्थित करून महामार्गाला विरोध करण्यात आला आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून महामार्गाला समर्थन असणाऱ्या शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात आला आहे. आत्ता आम. शिवाजीराव पाटील यांच्या भूमिकेने त्यात भर पडली आहे.