Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! प्रतापराव पवारांच्या घरी शरद पवार-अजित पवारांचे स्नेह भोजन; भेटीनंतर अजितदादा दिल्लीला रवाना

राष्ट्रवादीतील बंडानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार (Sharad Pawar Ajit Pawar Meeting) यांची पुन्हा एकदा एकत्र भेट झाली. शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवार (Pratap Pawar) यांच्या निवासस्थानी संपूर्ण कुटुंब एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी शरद पवार-अजित पवार यांची भेट झाली आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Nov 10, 2023 | 03:36 PM
Sharad Pawar-Ajit Pawar

Sharad Pawar-Ajit Pawar

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी मागील काही काळापासून घडत असल्याचे पाहायला मिळाले. दोन वेळा अजित पवार – शरद पवार यांच्या भेटीनंतर (Sharad Pawar Ajit Pawar meeting) आता पुन्हा एकदा सर्व कुटुंबाचे एकत्रित स्नेह भोजनाचा कार्यक्रम असताना, अजित पवार-शरद पवार यांची भेट झाली आहे. रद पवारांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त भेट झाली. पुण्यातील बाणेरमध्ये (Baner Pune) प्रतापराव पवार यांचे निवासस्थान आहे. या भेटीनंतर अजित पवार दिल्लीला रवाना झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

राष्ट्रवादीतील बंडानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची पुन्हा एकदा एकत्र भेट झाली. शया ठिकाणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह पवार कुटुंबातील बहुतेक सर्वजण उपस्थित होते. प्रताप पवार यांच्या पुण्यातील बाणेरमधील घरी शरद पवार गेले असताना, त्याठिकाणी अजित पवारदेखील याठिकाणी उपस्थित होते. शरद पवार हे त्यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त गेले होते. ही भेट संपूर्णपणे कौटुंबिक आहे, असं शरद पवारांच्या बहीण सरोज पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीत सांगितले.

शरद पवार आणि अजित पवार यांचे सहकुटुंब एकत्रित जेवण झालं. दरम्यान, या भेटीनंतर अजित पवार हे तातडीने दिल्लीला रवाना झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार आज सायंकाळी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट असल्याची प्राथमिक माहिती आहे. भेटीवेळी राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यात मराठा ओबीसी धनगर आरक्षणाचा मुद्दा तीव्र आहे. त्या पार्श्वभूमीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

भेट राजकीय नव्हे कौटुंबिक
या भेटीबाबत शरद पवार यांच्या बहिण सरोज पाटील (Saroj Patil) यांनी प्रतिक्रिया दिली. ही भेट राजकीय नव्हती. कौटुंबिक भेट होती असे सरोज पाटील म्हणाल्या. आम्ही सर्वजण एकत्र आल्यावर विनोद करतो, एकमेकांची मस्करी करतो असे सरोज पाटील म्हणाल्या. अजित पवार यांची तब्बेत चांगली आहे. खूप दिवसानंतर एकत्र भेटलो आम्हाला खूप आनंद झाला. सगळी भावंडं, मुली एकत्र भेटलो. आज प्रतापराव पवार यांचा वाढदिवसही होता, असं सरोज पाटील यांनी सांगितले.

जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
दरम्यान, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. पवार कुटुंबियांनी काय करावे हे त्यांचा मुद्दा आहे. त्याबद्दल मी काय बोलणार ? मी पार्टीचा प्रदेश अध्यक्ष आहे. पार्टीबद्दल काही असेल तर बोला. कोणी कोणाला भेटावे याबद्दल मी काय बोलू, असं जयंत पाटील म्हणाले.

दिलीप वळसे पाटीलही शरद पवारांना भेटले
दरम्यान, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही आज सकाळीच शरद पवार यांची भेट घेतली होती. रयत शिक्षण संस्थेबाबत ही भेट असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं होतं. “शरद पवार यांची मी घेतलेली भेट ही पूर्वनियोजीत होती. माझ्यासोबत यावेळी रयत शिक्षण संस्थेच पदाधिकारी देखील होते. रयत शिक्षण संस्थेसंदर्भात चर्चा झाली” असं वळसे पाटील म्हणाले होते.

 

Web Title: Sharad pawar ajit pawars sneh bhojan at prataprao pawars house ajit dada left for delhi after meeting nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2023 | 03:36 PM

Topics:  

  • ajit pawar
  • NCP president Sharad Pawar

संबंधित बातम्या

Pune Nagar parishad Result : पुण्यात अजित पवारांचा जलवा कायम! जिल्हायात 17 पैकी 9 राष्ट्रवादी नगराध्यक्षांनी उधळला विजयी गुलाल
1

Pune Nagar parishad Result : पुण्यात अजित पवारांचा जलवा कायम! जिल्हायात 17 पैकी 9 राष्ट्रवादी नगराध्यक्षांनी उधळला विजयी गुलाल

Sangli Ajit Pawar : पक्षात प्रवेश केलेल्यांना पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही, अजित पवार यांचं वक्तव्य
2

Sangli Ajit Pawar : पक्षात प्रवेश केलेल्यांना पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही, अजित पवार यांचं वक्तव्य

Manikrao Kokate Bail: माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा! अटक टळली, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
3

Manikrao Kokate Bail: माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा! अटक टळली, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Mumbai : कोकाटेंचा स्वीकारला, खात्याचा कार्यभार अजित पवारांकडे; फडणवीसांनी दिली माहिती
4

Mumbai : कोकाटेंचा स्वीकारला, खात्याचा कार्यभार अजित पवारांकडे; फडणवीसांनी दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.