Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP Merger : ‘अजितदादा असते तर १२ फेब्रुवारीलाच…’ राष्ट्रवादीचं विलिनीकरणावरून सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!

NCP Merger : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार हयात असते तर १२ फेब्रुवारीला विलिनीकरण झाले असते, असा मोठा दावा सुनील तटकरे यांनी केला.

  • By विवेक
Updated On: Nov 13, 2026 | 06:23 PM
MP Sunil Tatkare

MP Sunil Tatkare

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सुनील तटकरेंचं मोठं विधान
  • छगन भुजबळांच्या दाव्यालाही तटकरेंचा दुजोरा
  • अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये झाली होती बैठक
 

मुंबई : राज्याच्या राजकारणात आता पुन्हा एकदा मोठा भूकंप होणार का? अश्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येऊन विलीनीकरण करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. याबाबत गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु असून राज्यात राजकीय टेन्शन वाढल्याचं दिसत आहे. अश्यातच, आज (शुक्रवार, 13 नोव्हेंबर) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नवा बॉम्ब फोडला असून पुढील राजकीय गणिताकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाचा मुद्दा चर्चेत असतानाच तटकरेंनी नवा दावा केला आहे. अजित पवार हयात असते तर १२ फेब्रुवारी रोजीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण झाले असते, असा मोठा दावा सुनील तटकरेंनी केला असून नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. अजितदादांनी आपल्याला याबाबत आधीच कल्पना दिली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. तटकरेंच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात वातावरण गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजित पवार यांच्या काळात चर्चा झाली होती, असा पुनरुच्चार तटकरे यांनी केला. अजितदादांनी स्वतः आपल्याला विलिनीकरणाची तारीख आणि त्यामागील प्रक्रिया सांगितली होती. ते हयात असते तर १२ फेब्रुवारीला हा निर्णय प्रत्यक्षात आला असता, असे तटकरे म्हणाले.

NCP Merger : ‘दादा गेले, विषय संपला!’ राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

छगन भुजबळांच्या दाव्यालाही दुजोरा

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात विलिनीकरणाबाबत चर्चा झाल्याचा दावा केला होता. या दाव्याला तटकरे यांनी दुजोरा दिला.

भुजबळ यांच्यावर एशियन हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी आपण त्यांना भेटायला गेलो होतो. त्याआधी अजितदादा आणि जयंत पाटील यांची भेट झाली होती. भुजबळ यांनी रुग्णालयातूनच या चर्चेत सहभाग घेतला असावा. त्यामुळे त्यांनी सांगितलेली माहिती चुकीची वाटत नाही, असे तटकरे यांनी सांगितले.

अजित पवार यांच्या निधनानंतर लगेच आपण या विषयावर का बोललो नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, प्रत्येक गोष्ट बोलण्याची एक वेळ असते. कोणत्या वेळी काय बोलायचे, याची आपल्याला जाणीव आहे. या विषयावर योग्यवेळी आणखी माहिती देणार असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

उदय सामंतांच्या टीकेलाही दिलं प्रत्युत्तर

दरम्यान, शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी केलेल्या टीकेवरही तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. मी काय बोलावे आणि काय बोलू नये, हे सांगण्याची गरज नाही. आमचे पक्ष वेगळे आहेत, त्यामुळे आमच्या पक्षाच्या विषयात इतरांनी हस्तक्षेप करू नये, असे ते म्हणाले. उदय सामंत यांना मंत्री करण्यात राष्ट्रवादीचा थोडाफार वाटा होता, असा टोलाही तटकरे यांनी लगावला.

एकीकडे विलिनीकरणाच्या जुन्या चर्चांवर नवे दावे समोर येत आहेत, तर दुसरीकडे तटकरे यांनी सध्या विलिनीकरणाचा विषय संपल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या भविष्यातील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Rahul Gandhi यांचा फोन टॅप होतोय? फोन टॅपिंगवरून काँग्रेस आक्रमक! नाना पटोलेंचा थेट भाजपवर गंभीर आरोप

💡

Frequently Asked Questions

  • Que: सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत काय दावा केला?

    Ans: अजित पवार हयात असते तर १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलिनीकरण झाले असते. अजितदादांनी आपल्याला याबाबत आधीच कल्पना दिली होती, असा दावा सुनील तटकरे यांनी केला.

  • Que: छगन भुजबळ यांनी विलिनीकरणाबाबत काय सांगितले होते?

    Ans: अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत चर्चा आणि बैठक झाल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केला होता. सुनील तटकरे यांनीही या दाव्याला दुजोरा दिला.

  • Que: उदय सामंत यांच्या टीकेला सुनील तटकरे यांनी काय उत्तर दिले?

    Ans: आपण काय बोलावे आणि काय बोलू नये, हे सांगण्याची गरज उदय सामंत यांना नाही, असे तटकरे म्हणाले. तसेच सामंत यांना मंत्री करण्यात राष्ट्रवादीचा वाटा असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

Web Title: Ajit pawar ncp merger february 12 sunil tatkare big statement vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 06:23 PM

Topics:  

  • ajit pawar
  • NCP Party
  • NCP Sharad Pawar
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर हर्षवर्धन पाटलांचा मोठा खुलासा, ‘अजितदादांची तीच इच्छा होती पण…’
1

NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर हर्षवर्धन पाटलांचा मोठा खुलासा, ‘अजितदादांची तीच इच्छा होती पण…’

NCP Merger : ‘दादा गेले, विषय संपला!’ राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
2

NCP Merger : ‘दादा गेले, विषय संपला!’ राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

Devendra Fadnavis : सुनेत्रा पवारांनंतर तटकरे यांची फडणवीसांशी भेट; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
3

Devendra Fadnavis : सुनेत्रा पवारांनंतर तटकरे यांची फडणवीसांशी भेट; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग

NCP Merger News : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग! बीडमध्ये शरद पवार-अजित पवार गटाचे नेते एकत्र
4

NCP Merger News : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग! बीडमध्ये शरद पवार-अजित पवार गटाचे नेते एकत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.