Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati News :दहा हजार पणत्यांच्या प्रकाशात उजळल्या अजितदादांच्या आठवणी; बारामतीकरांचे डोळे पाणावले

Baramati News : बारामतीच्या सनसेट पॉईंटवर दहा हजारांहून अधिक पणत्या प्रज्वलित करून दिवंगत अजितदादांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. सुनेत्रा पवार, जय पवार यांच्यासह पवार कुटुंबीय आणि हजारो बारामतीकर या भावूक कार्यक्रमात सहभागी झाले.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 11, 2026 | 04:47 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • पवार कुटुंबीयांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला भावनिक महत्त्व
  • दादांची रांगोळी अन् हजारो पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट
  • माझा आनंद हरवला’ गीताने उपस्थितांचे डोळे पाणावले
Baramati News : आपला माणूस काळाच्या पडद्याआड गेल्यावरही त्यांच्या आठवणी कधीच पुसल्या जात नाहीत. त्यांनी केलेली कामं, दिलेली प्रेरणा आणि माणसांशी जोडलेलं नातं कायम मनात घर करून राहतं. याच भावनेचा प्रत्यय बारामती शहरातील सनसेट पॉईंटवर आला.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘एक पणती दादांसाठी… असंख्य आठवणी त्यांच्या कार्यासाठी…’ या उपक्रमाला बारामतीकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. तब्बल दहा हजारांहून अधिक पणत्यांनी सनसेट पॉईंट उजळून निघाला आणि संपूर्ण परिसर अजितदादांच्या आठवणींनी भावूक झाला.

पवार कुटुंबीयांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला भावनिक महत्त्व

या भावपूर्ण उपक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, युवा नेते जय पवार, अजितदादांच्या भगिनी विजया पाटील, ऋतुजा जय पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांची उपस्थिती लाभली. या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष भावनिक महत्त्व प्राप्त झाले. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एकत्र आलेल्या कुटुंबीयांसह हजारो नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

गेली अनेक वर्षे दिवाळी पाडव्याच्या दिवशी अजितदादा बारामतीकरांच्या भेटीसाठी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत उपस्थित असायचे. सर्वसामान्य नागरिकांपासून कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाला वेळ देत त्यांच्या अडचणी समजून घेणे, बारामतीच्या विकासाचा ध्यास आणि नागरिकांच्या हिताला प्राधान्य देणे ही दादांची कार्यशैली होती. मात्र, यंदाचा पहिला दिवाळी पाडवा दादांशिवाय असल्याने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Group Attack: तरुणावर लोखंडी फायटर अन् दगडांनी टोळीचा जीवघेणा हल्ला; संपूर्ण थरार CCTV मध्ये कैद!

दादांची रांगोळी अन् हजारो पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट

कार्यक्रमातील सर्वांत भावस्पर्शी क्षण म्हणजे अजितदादांची साकारण्यात आलेली भव्य आणि आकर्षक रांगोळी. महेंद्र दीक्षित, भारत काळे, सिद्धार्थ कांबळे आणि वेदांत काळे यांनी आपल्या कलाकौशल्यातून अजितदादांचे सुंदर रांगोळीचित्र साकारले. या रांगोळीने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

यानंतर परिसरातील सर्व विद्युत रोषणाई बंद करण्यात आली. केवळ हजारो पणत्यांच्या प्रकाशात अजितदादांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. उपस्थित प्रत्येकाने आपल्या मोबाईलची बॅटरी टॉर्च सुरू करून दादांना अभिवादन केले. हजारो मोबाईल टॉर्च आणि पणत्यांच्या प्रकाशाने उजळलेला सनसेट पॉईंट हा क्षण उपस्थितांच्या मनावर कायमचा कोरला गेला.

FDA Raid: ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहीम, पुण्यातील वानवडीत दोन कराची स्वीट्सवर FDA ची धडक कारवाई

माझा आनंद हरवला’ गीताने उपस्थितांचे डोळे पाणावले

यावेळी सादर झालेल्या ‘माझा आनंद हरवला’ या भावस्पर्शी गीताने उपस्थितांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. दादांसोबतच्या आठवणी, त्यांचा सहवास आणि त्यांनी बारामतीसाठी केलेले कार्य यांची आठवण काढताना संपूर्ण वातावरण भावुक झाले होते.

या कार्यक्रमाला समस्त बारामतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दादांवर प्रेम करणारे हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणताही औपचारिकपणा न ठेवता आपल्या मनातील प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून पणत्या आणून या उपक्रमात सहभाग नोंदवला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगराध्यक्ष सचिन सातव, नगरसेवक अमर धुमाळ, अमोल कावळे, वैभव जगताप, समीर चव्हाण, नवनाथ बल्लाळ, प्रवीण माने, विशाल हिंगणे, अक्षय डांगे तसेच असंख्य दादाप्रेमी बारामतीकरांनी मोलाचे योगदान दिले.

दहा हजारांहून अधिक पणत्या, हजारो मोबाईल टॉर्च, अजितदादांची आकर्षक रांगोळी आणि प्रत्येकाच्या डोळ्यांत दाटलेल्या आठवणी… हा केवळ दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम नव्हता, तर एका लोकनेत्याने आपल्या माणसांच्या मनात निर्माण केलेल्या अढळ स्थानाची जिवंत साक्ष होती.

अजितदादा आज प्रत्यक्षात आपल्यात नसले, तरी त्यांनी बारामतीला दिलेली विकासाची दिशा, कामाची ऊर्जा आणि नागरिकांच्या मनात निर्माण केलेला विश्वास कायम राहणार आहे. सनसेट पॉईंटवर उजळलेल्या हजारो पणत्यांनी जणू एकच संदेश दिला.

Web Title: Ajit pawar baramati diya tribute cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 04:47 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Trump News : अमेरिकेत नवा वाद; ट्रम्प कुटुंबाच्या क्रिप्टो व्यवसायाचे पाकिस्तान कनेक्शन; चौकशीची मागणी सुरु
1

Trump News : अमेरिकेत नवा वाद; ट्रम्प कुटुंबाच्या क्रिप्टो व्यवसायाचे पाकिस्तान कनेक्शन; चौकशीची मागणी सुरु

Bunker Roy News : शिक्षणाची पदवी नाही, तरी बनवल्या शेकडो महिला अभियंता; बंकर रॉय यांनी बदलले ग्रामीण महिलांचे आयुष्य
2

Bunker Roy News : शिक्षणाची पदवी नाही, तरी बनवल्या शेकडो महिला अभियंता; बंकर रॉय यांनी बदलले ग्रामीण महिलांचे आयुष्य

Supriya Sule: ‘दादा, आजच्या दिवशी तुझं नसणं…’; भाऊबीजेनिमित्त सुप्रिया सुळेंची अजित दादांसाठी भावूक पोस्ट
3

Supriya Sule: ‘दादा, आजच्या दिवशी तुझं नसणं…’; भाऊबीजेनिमित्त सुप्रिया सुळेंची अजित दादांसाठी भावूक पोस्ट

Ajit Pawar Plane Crash : ‘अजित पवारांचा घातपात झाल्याचं मला वाटतं, एक दिवस बोलणार’; उमेश पाटलांचं मोठं वक्तव्य
4

Ajit Pawar Plane Crash : ‘अजित पवारांचा घातपात झाल्याचं मला वाटतं, एक दिवस बोलणार’; उमेश पाटलांचं मोठं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.