महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 अजून जाहीर झाली नसली तरी राजकीय शह-काटशहाचा खेळ सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या डोक्यात काय सुरू असते याचा अंदाज त्यांच्या निकटवर्तीयांना नसतो. पण शरद पवार यांनी अलीकडेच खेळलेल्या एका डावामुळे त्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे, समरजीतसिंह घाटगे यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. समरजीत घाटगे यांच्या या प्रवेशाच्या माध्यमातून शरद पवार यांनी केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच नव्हे तर अजित पवार यांनाही धक्का देण्यासाठी स्क्रिप्ट लिहिली आहे. पण याच माध्यमातून शरद पवारांनी भाजपच्या मदतीने महायुतीचा पराभव करण्याची रणनीती आखली आहे.
हेदेखील वाचा: खाकीनेच खाकीचा केला घात! 8वी पास तोतया हवालदाराकडून 10 महिला कॉन्स्टेबलवर लैंगिक
याचे कारण म्हणजे, महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार, कागल मतदारसंघातून अजित पवार यांच्या गटाचे हसन मुश्रीफ यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी यासंदर्भात घोषणाही केली. पण गेल्या काही महिन्यांपासून समरजीत घाटगे भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. पण महायुतीच्या फॉर्म्युल्यामुळे समरजीत घाटगेंचा कागलमधून जवळपास पत्ताच कट झाला होता.
पण समरजीत घाटगे यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आणि कोल्हापूरची राजकीय समीकरणेच बदलून गेली. समरजीत घाटगेंचा प्रवेश होताना शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आपण त्यांना मंत्रीपद देऊ, अशी ग्वाही कागलकरांना दिली. पण याच माध्यमातून शरद पवार यांनी अजित पवार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढवल्या आहेत.
दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ सलग पाच वेळा येथून आमदार झाले आहेत. अशा स्थितीत राष्ट्रवादीला ही जागा कोणत्याही किंमतीत मिळवायची असून कागलची जागा भाजपच्या वाट्याला जाणार नाही. त्यामुळे शरद पवार यांच्यागटाकडून समरजीत घाटगेंना आमदारकीची ऑफर दिली जात होती.
हेदेखील वाचा: प्रभू देवा आणि सनी लिओनीचा ‘पेट्टा रॅप’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, निर्मात्यांनी शेअर केले पोस्टर!
समरजितसिंह घाटगे यांना कागलमधून विधानसभा निवडणूक लढवायची होती. भाजपकडून तिकीट न मिळण्याची शक्यता पाहून त्यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. पण संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे दोन डझन विधानसभा जागा आहेत ज्यावर भाजप नेते अजित गटाच्या उमेदवाराच्या विरोधात तिकिटाच्या शर्यतीत आहेत. कारण त्यांनी 2019 मध्ये अशा जागांवर अटीतटीची निवडणूक लढवली होती.
अजित पवार यांच्या महायुतीतील प्रवेशानंतर आणि जागावाटपाच्या फॉर्म्युल्यामुळे अनेक भाजप नेत्यांना तिकीट मिळणार नसल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे समरजितसिंह घाटगे यांच्यासारखे भाजपचे अनेक नेते आहेत, ज्यांच्या हातातून जागा निसटताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत अशा अनेक नेत्यांनी आपल्या राजकीय अस्तित्वासाठी थेट पक्षांतर करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.
हेदेखील वाचा: शरद पवार आपसे बैर नही, समरजीत तेरी खैर नही; मुश्रीफांचे घाटगेंना खुले आव्हान
भाजपमध्ये आपले राजकीय भवितव्य अंधारात पाहणाऱ्या नेत्यांमध्ये समरजीत घाटगे हे एकटेच नेते नाहीत. तर भाजपच्या नेत्यांची यादी मोठी आहे. साताऱ्याच्या फलटणमधून निवडणूक लढवलेले अजित पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर आणि इंदापूरमधून निवडणूक लढवलेले भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचा समावेश आहे.
सोलापूर आणि साताऱ्याच्या राजकारणात झालेल्या बदलांमुळे रणजितसिंह निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांचेही राजकीय अस्तित्व पणाला लागले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे बदलते समीकरण पाहता सोलापूरचे भाजप नेते उत्तमराव जानकर आणि प्रशांत परिचारक हेही शरद पवार गटाकडे वाटचाल करताना दिसत आहेत.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे राजकीय समीकरण असल्याने अनेक नेत्यांचे विधानसभा जागांचे गणित बिघडले आहे. त्या जागा म्हणजे इंदापूर, उदगीर, वाई, परळी, वडगाव शेरी, मावळ, हडपसर, अहमदपूर, अमळनेर, अर्जुनी मोरगाव, अहेरी, विक्रमगड, अकोले.इ. जागांचा समावेश आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटातील 21 आमदार भाजपविरोधात विजयी झाले होते. पण आता राजकीय सत्तासमीकरणांमध्येही खूप बदल झाले आहेत.
हेदेखील वाचा: PM मोदी सिंगापूरला पोहोचण्यापूर्वीच भारतासाठी आनंदाची बातमी; मित्र देश ‘येथे’ मोठ्या प्रमाणात करणार
आता अजित पवार भाजपसोबत सरकारमध्ये असून 2024 ची विधानसभा निवडणूक एकत्र लढणार असल्याने भाजपच्या अनेक बड्या नेत्यांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागलेले दिसत आहे. अशा स्थितीत त्यांनी ज्या पक्षात राजकीय भवितव्य दिसेल त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर या प्रसंगाची निकड पाहून शरद पवार यांनीही भाजपच्या नाराज नेत्यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांना राजकीयदृष्ट्या पराभूत करण्याची रणनीती आखण्यास सुरुवात केली. पण त्यामुळे भाजपचीही डोकेदुखी वाढणार आहे.