Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील ‘या’ गंभीर प्रश्नावरून शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक; हायकोर्टात जाण्याचा दिला इशारा

तसेच दंड आकारणीची रक्कम गृहीत धरली तर हा आकडा २६ हजार कोटीपर्यंत जातो, असेही माने यांनी नमूद केले आहे. शहरात विविध टेलिकॉम कंपन्यांच्या सुमारे १८ हजार ८८५ किलोमीटर इतक्या ओव्हरहेड केबल आढळून आल्या आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 28, 2025 | 11:00 AM
ओव्हरहेड आणि अंडरग्राऊंड केबल टाकण्याच्या प्रकरणात महापालिकेच्या प्रशासनाने सुमारे २३ हजार कोटी रुपयांचे शुल्क आकारणे अपेक्षित

ओव्हरहेड आणि अंडरग्राऊंड केबल टाकण्याच्या प्रकरणात महापालिकेच्या प्रशासनाने सुमारे २३ हजार कोटी रुपयांचे शुल्क आकारणे अपेक्षित

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : ओव्हरहेड आणि अंडरग्राऊंड केबल टाकण्याच्या प्रकरणात महापालिकेच्या प्रशासनाने सुमारे २३ हजार कोटी रुपयांचे शुल्क आकारणे अपेक्षित असताना, टेलिकॉम कंपन्यांचे हित लक्षात घेतले आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होणार आहे, त्याच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुनील माने यांनी पत्रकार परीषदेत सांगितले.

हेदेखील वाचा : Datta Gade News मोठी बातमी ! स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालावे अशी मागणी माने यांनी केली आहे. केबल टाकण्यासंदर्भात पुणे महापालिका, महाप्रीत आणि दिनेश इंजिनिअर्स यांनी एक त्रिपक्षीय करार केला आहे. या कराराविषयी एसआयटी स्थापन करून चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या करारामुळे महापालिकेचे सुमारे २३ हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे, असा दावा माने यांनी केला आहे. या करारानुसार संबंधित कंपनीस ७०० किमी अंतराचे खोदाईचे सुमारे साडे आठशे कोटी रुपये माफ केले गेले आहे.

शहरात टाकण्यात आलेल्या ओव्हरहेड आणि अंडरग्राऊंड केबल संदर्भात महापालिकेने सल्लागार नियुक्त केला होता. या सल्लागाराने केलेल्या पाहणीनुसार बेकायदेशीरपणे केबल टाकणाऱ्या कंपन्यांकडून सुमारे १ हजार ८०० कोटी रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या केबल अधिकृतपणे टाकल्या गेल्या असत्या तर महापालिकेला सुमारे २३ हजार कोटी रुपये इतके शुल्क मिळाले असते, असा दावा माने यांनी केला आहे.

तसेच दंड आकारणीची रक्कम गृहीत धरली तर हा आकडा २६ हजार कोटीपर्यंत जातो, असेही माने यांनी नमूद केले आहे. शहरात विविध टेलिकॉम कंपन्यांच्या सुमारे १८ हजार ८८५ किलोमीटर इतक्या ओव्हरहेड केबल आढळून आल्या आहेत. याबाबतचे शुल्क जमा करण्याची नोटीस महापालिकेने संबंधित कंपन्यांना दिली होती. त्या कंपन्यांकडून महापालिकेला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मुख्य सभेच्या आदेशानुसार कंपन्यांना दंड व शुल्क वसुल करणे अपेक्षित होते. या कंपन्यांना ऑक्टोबर २०२१ पासून वेळोवेळी नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. त्याला कंपन्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही असा आरोप माने यांनी केला आहे.

Web Title: Sharad pawar ncp aggrasive over overhead cable issue nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2025 | 11:00 AM

Topics:  

  • Mumbai High Court
  • Pune Crime

संबंधित बातम्या

‘तो’ गैरसमज उठला जीवावर; टोळक्याकडून कोयता घेऊन तरुणाचा पाठलाग अन् नंतर…
1

‘तो’ गैरसमज उठला जीवावर; टोळक्याकडून कोयता घेऊन तरुणाचा पाठलाग अन् नंतर…

Pune Crime: पुण्यात 17 वर्षीय मुलाचं अपहरण करून निर्घृण हत्या; इन्स्टाग्रामवरून सापळा, दगड-कोयत्याने वार करत…
2

Pune Crime: पुण्यात 17 वर्षीय मुलाचं अपहरण करून निर्घृण हत्या; इन्स्टाग्रामवरून सापळा, दगड-कोयत्याने वार करत…

Pune Crime: ‘वडील गंभीर आहेत’ आणि…; बनावट इमर्जन्सी कॉलने डॉक्टरांना बोलावलं अन् चाकूच्या धाकात लुटलं
3

Pune Crime: ‘वडील गंभीर आहेत’ आणि…; बनावट इमर्जन्सी कॉलने डॉक्टरांना बोलावलं अन् चाकूच्या धाकात लुटलं

Pune Crime: हुंड्याच्या 5 लाखांच्या मागणीसाठी विवाहितेला बेल्टने मारहाण; लग्नाच्या पहिल्या माहिन्यातच…
4

Pune Crime: हुंड्याच्या 5 लाखांच्या मागणीसाठी विवाहितेला बेल्टने मारहाण; लग्नाच्या पहिल्या माहिन्यातच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.