Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

15 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा पाठलाग, नागरिक जमा झाले अन्…; पुण्यातील थरारक घटना

बँकेतून काढलेली १५ लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा चौघांनी पाठलाग करून त्याच्याजवळील रोकड लुटून नेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. नागरिकांमुळे चोरट्यांचा प्रयत्न फसला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 03, 2026 | 12:30 AM
15 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा पाठलाग, नागरिक जमा झाले अन्...; पुण्यातील थरारक घटना

15 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा पाठलाग, नागरिक जमा झाले अन्...; पुण्यातील थरारक घटना

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बँकेतून काढलेली १५ लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा चौघांनी पाठलाग करून त्याच्याजवळील रोकड लुटून नेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. नागरिकांमुळे चोरट्यांचा प्रयत्न फसला आहे.

 

तरुणाला हत्याराच्या धाकाने लुटण्याचा प्रयत्न केला. पण, त्याने पळ काढला. तरुण एका पान टपरीवर थांबल्यानंतर देखील चोरटे त्याचा पाठलाग करत तिथे आले. त्यांनी त्याला मारहाण करून रोकड लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिक जमल्यानंतर चोरटे पसार झाले. चंदननगर परिसरात ही थरारक घटना घडली आहे. याप्रकरणी २३ वर्षीय तरुणाने चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यानूसार, चौघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तीन दिवसांपुर्वी भरदुपारी ही घटना घडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण एका खासगी कार्यालयात नोकरी करतो. कार्यालयीन कामकासाठी त्याला बँकेतून रोकड काढून आणण्यास सांगितले होते. त्यानूसार, तरुण दुपारी बँकेत रोकड काढण्यासाठी गेला. तेथून त्याने १५ लाख रुपयांची रोकड काढली आणि ती सॅकमध्ये ठेवून तो पुन्हा कार्यालयात येत होता. तेव्हा वडगाव शेरी येथील हनुमान मंदिर परिसरात आल्यानंतर दोन दुचाकीवरून पाठिमागून पाठलाग करत आलेल्या चोरट्यांनी त्याच्याकडील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. एकाने त्याला हत्याराचा धाक दाखविला. हा सर्व प्रकार चालत्या गाडीवर सुरू होता. तरुणाने मात्र, बॅग हिसकावणाऱ्या चोरट्यांना हिसका देऊन त्यांना ढकलले. त्यामुळे ते दोघेही खाली कोसळले. त्यानंतर तरुणाने त्याची दुचाकी सुसाट वेगात पळवत ऑक्सीजन पार्कचे गल्लीतील एका चहाच्या टपरीवर थांबला.

काही वेळाने पुन्हा हे चोरटे त्याचा पाठलाग करत तिथे आले. त्यांनी तरुणाला धमकावत मारहाण केली. हत्याराचा धाक दाखवून त्याच्याकडील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. पण, तरुणाने मोठा आरडाओरडा केला. त्यामुळे याठिकाणी नागरिक जमा झाले. त्यांनी काय झाले असे विचारण्यास सुरूवात करताच चोरटे तेथून पसार झाले. त्यानंतर तरुणाने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास चंदननगर पोलिस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : महाराष्ट्र कृषी विभाग ॲक्शन मोडवर; बेकायदेशीर ‘कम्फर्ट’ मच्छर अगरबत्तीची विक्री करणाऱ्या दुकानांवर टाकले छापे

Web Title: An incident has occurred in pune where thieves tried to steal money by chasing a young man

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

जतमध्ये रास्ता रोकोप्रकरणी दोन माजी आमदारांसह ७० जणांवर गुन्हा; बंदी आदेशाचा भंग केल्याचा आरोप
1

जतमध्ये रास्ता रोकोप्रकरणी दोन माजी आमदारांसह ७० जणांवर गुन्हा; बंदी आदेशाचा भंग केल्याचा आरोप

Accident Breaking: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! दोन महिलांचा दुर्दैवी अंत, नेमके काय घडले?
2

Accident Breaking: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! दोन महिलांचा दुर्दैवी अंत, नेमके काय घडले?

दारूसाठी पैसे न दिल्याने झाला वाद; धाकट्या भावाने केली थोरल्या भावाची हत्या
3

दारूसाठी पैसे न दिल्याने झाला वाद; धाकट्या भावाने केली थोरल्या भावाची हत्या

भाजप नगरसेविकेच्या नणंदेची आत्महत्या, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल; धक्कादायक कारणही समोर
4

भाजप नगरसेविकेच्या नणंदेची आत्महत्या, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल; धक्कादायक कारणही समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.