बारामती : देशात जेव्हापासून भाजपाचे सरकार आले आहे, तेव्हापासून केंद्रीय तपास यंत्रणा तसेच अन्य तपास यंत्रणा मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या आहेत. दरम्यान, काल (गुरुवारी) बारामतीतून (Baramati) एक मोठी व धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार व शरद पवारांचे नातू रोहित पवार यांना बारामती ॲग्रो (Baramati Agro) या प्लॅन्टवर रात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने (Maharashtra Pollution Department) नोटीस पाठवत कारवाई केली आहे. त्यामुळं आश्चर्य व्यक्त केले जात असून, एवढ्या रात्री नोटीस पाठवण्यामागे कोणता हेतू, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असताना, आता चक्क रोहित पवारांचे आजोबा व राष्ट्रवादीचे अध्यक्ष व नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. (sharad pawar one sentence reply to rohit pawar midnight notice said currently in the country)
मुंबई : यांचे पुरोगामी विचार घेऊन महाराष्ट्रभर फिरणारे पक्षाचे युवा आमदार रोहित पवार यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न विद्यमान सरकारने केला आहे. कायद्याची पायमल्ली करून तसंच केंद्रीय यंत्रणेचा धाक दाखवून महाराष्ट्राच्या जनतेच्या मानगुटीवर बसलेल्या विद्यमान असंविधानिक सरकारचा जाहीर निषेध राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. महाराष्ट्रात आमदार रोहित पवारांची लोकप्रियता अनेक लोकांना बघवत नाही व त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेचा आड घेऊन राजकीय डाव साधण्यासाठी रोहित पवारांच्या कंपनीवर कारवाई मुख्यमंत्री शिंदे यांच्या सरकारने केल्याचा गंभीर आरोप तपासे यांनी केला आहे.
मी त्यावर काही बोलणार नाही…
आज बारामतीत शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यात त्यांना रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना शरद पवार यांनी अधिक भाष्य करणं टाळलं. बारामती अॅग्रो प्लांटवरील कारवाईवर सध्या बोलणार नाही, असं ते म्हणाले. त्यामुळं सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत. “मी कारवाईबाबत बोलणार नाही,” असं एका वाक्यात शरद पवार यांनी उत्तर दिले. तर दुसरीकडे राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
या सरकारचं विसर्जन होणार – महेश तपासे
महाराष्ट्र याला घाबरत नाही तुम्ही कितीही पुरोगामी विचारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी देखील आमचं मनोबल खच्चीकरण होत नाही आणि आता रोहित पवारांसोबत महाराष्ट्रातले लाखो तरुण या सरकारचं विसर्जन करण्यासाठी कामाला लागलेले आहेत. संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे व आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या सोबत जाण्याला विरोध दर्शवल्यामुळे सरकारमध्ये सामील झालेल्या अनेक आमदारांची गोची झाली आहे त्यांच्या मतदारसंघातील पक्षाचे कार्यकर्ते जैसे थे या परिस्थितीत आदरणीय पवार साहेबांसोबत राहिले. सरकारसोबत गेलेले अनेक आमदार पराभवाच्या छायेत असल्याचा दावाही महेश तपास यांनी केला.
72 तासांत प्लांट बंद करा…
दरम्यान, रोहित पवार (Rohit Pawar) यांना रात्री 2 वाजता नोटीस दिली असून 72 तासांत प्लांट बंद करण्याची सूचना नोटीसीच्या माध्यमातून दिली आहे. अशी माहिती रोहित पवार यांनी स्वतः ट्वीट करत दिली आहे. सध्या राज्यातील राजकारण पाहता, सूडाचे व कुरघोडीचे राजकारण सुरु आहे, त्याचाच एक भाग म्हणून ही कारवाई केली जात असल्याचं बोललं जात आहे.
सूडबुद्धीने कारवाई…
अजितदादा पवार शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर देखील राष्ट्रवादीचा जनाधार महाराष्ट्रात कमी झाला नाही, याचा दुःख भाजपला आहे. आणि म्हणूनच ही कारवाई केली असल्याचा आरोप तपासे यांनी केला. सूडबुद्धीने केलेल्या या कारवाईचे उत्तर बारामतीची जनता आणि महाराष्ट्रातले मतदार योग्य वेळी देणार अशी घोषणा महेश तपासे यांनी केली.