Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उदयनराजेंबद्दल प्रश्न विचारताच शरद पवारांनी उडवली कॉलर; राजकीय वर्तुळात चर्चा

शरद पवार यांनी सातारा लोकसभा निवडणूकीसाठी भाजपचे संभाव्य उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल उत्तर देताना कॉलर उडवत प्रतिक्रिया दिली.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 29, 2024 | 04:26 PM
उदयनराजेंबद्दल प्रश्न विचारताच शरद पवारांनी उडवली कॉलर; राजकीय वर्तुळात चर्चा
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी सातारा दौरा केला आहे. यावेळी त्यांनी निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेतला. तसेच कार्यकर्त्यांची भेट देखील घेतली. यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेला देखील संबोधित केले. यावेळी शरद पवार यांनी सातारा लोकसभा निवडणूकीसाठी भाजपचे संभाव्य उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल उत्तर देताना कॉलर उडवत प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियावर शरद पवार यांच्या प्रतिक्रियेचे व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सातारा लोकसभा निवडणूकीसाठी उदयनराजे भोसले उत्सुक आहेत. यासाठी त्यांनी दिल्लीवारी देखील केली असून अमित शाह यांची भेट घेतली आहे. उदयनराजे परतल्यानंतर त्यांची जंगी मिरवणूक देखील काढण्यात आली. मात्र अद्याप भाजपकडून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांनी जर तुमच्याशी संपर्क साधल्यास त्यांच्याशी बोलणार का? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी आता तशी शक्यता नसल्याचे स्पष्ट सांगितले. तसेच पत्रकार म्हणाले की, मग तुम्हीही कॉलर उडविणार का? त्यावर शरद पवारांनी पत्रकार परिषदेतच आपली कॉलर उडवून दाखविली. त्यामुळे पत्रकारांमध्येही जोरदार हशा पिकला.

पुढे शरद पवार म्हणाले, “उदयनराजे आता भाजपामध्ये आहेत. मी पाहिले दोन दिवसांपूर्वी सातार शहराने त्यांचे संपूर्ण रस्त्यात स्वागत केले. त्यामुळे त्यांनी आमच्याशी संपर्क साधण्याचा विषयच येत नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. २०१९ साली उदयनराजेंनी शरद पवारांशी बंडखोरी करून पोटनिवडणुकीला सामोरे गेल्यानंतर शरद पवार यांनी सातारकरांना चूक सुधारण्याचे आवाहन केले होते. यावेळीदेखील चूक करू नका, असे आवाहन करणार का? असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, सातारकर चाणाक्ष आहेत. त्यांना आवाहन करण्याची कोणतीही आवश्यकता नाही,” असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

Web Title: Sharad pawar reacts on udayanraje bhosale candidature from satara loksabha election nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2024 | 04:26 PM

Topics:  

  • MP Sharad pawar
  • political news
  • Satara Politics
  • Udayanraje Bhosale

संबंधित बातम्या

शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून…; हर्षवर्धन सपकाळ यांची टिपू सुलतान प्रकरणावर जाहीर माफी
1

शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून…; हर्षवर्धन सपकाळ यांची टिपू सुलतान प्रकरणावर जाहीर माफी

Parth Pawar clean chit : राज्यसभेवर पाठवण्याची घाई म्हणून..; अंंजली दमानिया यांचा चढला पारा
2

Parth Pawar clean chit : राज्यसभेवर पाठवण्याची घाई म्हणून..; अंंजली दमानिया यांचा चढला पारा

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार
3

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन
4

गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.