Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीत महागाईविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक; युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली वाढती महागाई, कांद्याचे घसरलेले दर, इंधन दरवाढ आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांबाबत जोरदार “जाहीर निषेध महामोर्चा” काढला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 04, 2026 | 05:47 PM
बारामतीत महागाईविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक; युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन

बारामतीत महागाईविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक; युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन

Follow Us
Follow Us:

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली वाढती महागाई, कांद्याचे घसरलेले दर, इंधन दरवाढ आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांबाबत जोरदार “जाहीर निषेध महामोर्चा” काढला आहे. बारामती शहरातील तीन हत्ती चौक येथे आयोजित या आंदोलनात नागरिक, शेतकरी, व्यापारी तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनातून केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असून, शेतकऱ्यांच्या कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

 

यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. “महागाई कमी करा”, “शेतकऱ्यांना न्याय द्या”, “इंधन दरवाढ मागे घ्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चूल पेटवून निषेध केला.

कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. वारंवार कांद्यासह इतर शेत मालाचे भाव कोसळत असल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील निघत नाही, त्यामुळे शासनाने कांद्याला २५ रुपये प्रति किलो प्रमाणे हमीभाव जाहीर करावा. तसेच वाढत्या महागाईने सामान्य जनतेचे मोठे हाल होत असून, महागाई रोखण्यास हे सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप युगेंद्र पवार यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी यावेळी केला. यावेळी बैलगाडीतून स्वतः युगेंद्र पवार व इतर पदाधिकाऱ्यांनी प्रवास केला. गळ्यात कांद्याच्या माळा घालून हे आंदोलन करण्यात आले.

हे सुद्धा वाचा : भाजपने सत्तेच्या हव्यासापोटी लोकशाही मुल्ये पायदळी तुडवली, विरोधी पक्षांच्या उमेदवारांना…; काँग्रेसचा आरोप

जनतेच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या प्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप, बारामती नगर परिषदेच्या विरोधी पक्षनेत्या आरती शेंडगे, वनिता बनकर, सुभाष ढोले, प्रा. बुरुंगले, ॲड सुभाष ढोले, मंगलदास निकाळजे, आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान या आंदोलनानंतर नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

Web Title: Sharad pawars ncp has staged a strong protest against rising inflation in baramati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 05:47 PM

Topics:  

  • baramati
  • MP Sharad pawar
  • Yugendra Pawar

संबंधित बातम्या

तीन एकर डाळिंब बागेतून लाखोंचे उत्पन्न; माळेगाव येथील जाधव बंधूंनी शेतीतून साधली आर्थिक प्रगती
1

तीन एकर डाळिंब बागेतून लाखोंचे उत्पन्न; माळेगाव येथील जाधव बंधूंनी शेतीतून साधली आर्थिक प्रगती

Sharad Pawar Letter To CM Fadnavis: शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार अन्… ; शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांकडे ९ प्रमुख मागण्या
2

Sharad Pawar Letter To CM Fadnavis: शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार अन्… ; शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांकडे ९ प्रमुख मागण्या

६० वर्षांचा निष्ठावान सांगाती आणि विश्वासू सहकारी गमावला; माजी मंत्री मदन बाफना यांच्या निधनाने शरद पवार भावुक
3

६० वर्षांचा निष्ठावान सांगाती आणि विश्वासू सहकारी गमावला; माजी मंत्री मदन बाफना यांच्या निधनाने शरद पवार भावुक

पणदरे येथील गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून, पोलिसांची अवघ्या दोन तासांत कारवाई; २६ वर्षीय संशयित आरोपी अटकेत
4

पणदरे येथील गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून, पोलिसांची अवघ्या दोन तासांत कारवाई; २६ वर्षीय संशयित आरोपी अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.