मुंबई : विधी मंडळ अधिवेशनात (Legislative Assembly) शिंदे गटाला १६४ मते मिळाले आहेत, तर महाविकास आघाडीला (MVA) १०० आकडाही पार करता आला नाही. त्यांना ९९ मते मिळाली. तसेच, ३ तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. यामध्ये सपा (SP) आणि एमआयएमचा (AIMIM) समावेश आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने आज विधीमंडळ सभागृहात बहुमत सिद्ध (Prove Majority) केले आहे. रविवारी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारने पहिला विजय मिळवला. त्यानंतर आज त्यांची कसोटी लागणार होती. सकाळी ११ वाजता विधिमंडळाचे कामकाज सुरु झाल्यानंतर आवाजी मतदानाने त्यांनी बहुमत सिद्ध केले. दरम्यान, शिवसेनेच्या संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी शिंदे गटाला मतदान केले.
गटनेतेपदी एकनाथ शिंदे, तर पक्ष प्रतोदपदी त्यांच्या गटाच्या भरत गोगावले (Bharat Gogawle) यांची निवड कायम ठेवण्यात आली आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्यासोबत ५० आमदारांना घेऊन भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन केले. त्यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर बहुमत सिद्ध केले आहे.