Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाविकास आघाडीमध्ये संजय राऊतांनी काडी टाकाण्यास सुरुवात केली; संजय शिरसाट यांचा घणाघात

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका विधानानंतर महाविकास आघाडीत विधानसभेच्या जागावाटपावरुन राजकारण सुरु असल्याचे बोलले जात आहे. यावर शिंदे गटाच नेते संजय शिरसाट यांनी देखील टीकास्त्र डागलं आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 27, 2024 | 06:40 PM
मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावरुन संजय शिरसाट यांचे संजय राऊतांवर टीकास्त्र

मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावरुन संजय शिरसाट यांचे संजय राऊतांवर टीकास्त्र

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणूकांचे बिगुल वाजणार आहे. द्याप निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी दखील राजकारण सुरु झाले आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. एकीकडे महायुतीमधील नेत्यांच्या बैठका तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. जागा वाटपाबद्दल नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहेत. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका विधानानंतर महाविकास आघाडीत विधानसभेच्या जागावाटपावरुन राजकारण सुरु असल्याचे बोलले जात आहे. यावर शिंदे गटाच नेते संजय शिरसाट यांनी देखील टीकास्त्र डागलं आहे.

काँग्रेसला त्यांचं नेतृत्व मान्य नाही

संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीमध्ये सुरु असलेल्या राजकारणावरुन टोला लगावला. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केला पाहिजे’, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. यावर आमदार शिरसाट म्हणाले, “महाविकास आघाडीत बिघाडी सुरु झाली असून त्यात संजय राऊतांनी काडी टाकाण्यास सुरुवात केली. त्यांना मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांचा चेहरा पाहिजे असेल तर मला वाटतं काँग्रेस हे मान्य करणार नाही. याचं कारण असं आहे की काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा झाल्या. त्या सभांमध्ये खुर्च्यामधील बदल केलेलाही काँग्रेसला मान्य नव्हता. त्यामुळे ते उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर निवडणुका लढतील याची शक्यता नाही. एकवेळेला महाविकास आघाडी तुटेल पण अशा पद्धतीचा चेहरा समोर येणार नाही. हे सत्य आहे, असे स्पष्ट मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले.

उद्धव ठाकरे व फडणवीस भेट

विधीमंडळामध्ये आज उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र लिफ्टमधून प्रवास केला. याबाबत बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एका लिप्टमधून प्रवास केला. याचा अर्थ समजून घ्या की आमचे वैयक्तिक भांडण नाही. उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांच्यासारखे काहीजण मिसगाईड करतात. राजकीय भांडण हे वेगळं असतं. मात्र, प्रत्येकाचे वैयक्तिक संबंध असतात. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की मनभेद कधीही नसावे. मनभेद नसावे याचं उदाहरण आज आपण पाहिलं. महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे काम नेत्यांनी केलं पाहिजे. त्यामुळे या भेटीला आम्ही वेगळं काहीही समजत नाही. त्यांची भेट झाली आम्हाला समाधान आहे”, असे मत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मांडले.

Web Title: Shinde group sanjay shirsat target sanjay raut for the statement of cm post of maharashtra nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2024 | 06:11 PM

Topics:  

  • cm of maharashtra
  • cm uddhav thackeray
  • Sanjay Shirsat

संबंधित बातम्या

‘उद्धव ठाकरेंचा हिंदूंशी आता काडीमात्र संबंध नाही’; ठाकरे गटाच्या ‘राम रक्षा आंदोलनावर’ संजय शिरसाटांचा पलटवार
1

‘उद्धव ठाकरेंचा हिंदूंशी आता काडीमात्र संबंध नाही’; ठाकरे गटाच्या ‘राम रक्षा आंदोलनावर’ संजय शिरसाटांचा पलटवार

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार
2

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.