most wanted kamal rana arrest in shirdi
शिर्डी: मध्यप्रदेश येथे कारवाईसाठी गेलेल्या राजस्थान पोलिसांवर गोळी झाडून पसार झालेया गुंडांना पडकण्यात पोलिसांना यश आलं आहे. शिर्डीत दाखल झालेल्या या पाच जणांना नुकतंच ताब्यात घेण्यात आलं आहे. शिर्डी पोलीस (Shirdi Police) आणि जयपुर पोलिसांनी (Jaipur Police) केलेल्या संयुक्त कारवाईत कमलसिंग टोळीचा (Kamalsingh Gang) म्होरक्या कमलसिंग उर्फ कमल राणा (Kamal Rana) याच्यासह पाच संशयितांना अटक (Arrest) करण्यात आली आहे.
साईबाबांच मंदीर असलेल्या शिर्डीत (Shirdi News) दररोज हजारो भाविक साई समाधीच्या दर्शनासाठी येत असतात. फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून भाविक इथे येत असतात. या अतिशय गर्दीच्या ठिकाणी गुंडदेखील आश्रयाला येत असल्याच अनेकदा समोर आलं आहे.
[read_also content=”‘आदिपुरुष’मध्ये देवांचा अपमान, नालासोपारामध्ये हिंदू संघटनेचा थिएटरमध्ये राडा, शो बंद पाडल्याचा व्हिडिओ व्हायरल https://www.navarashtra.com/maharashtra/adipurush-show-cancelled-in-nalasopara-by-hindu-organization-nrsr-418977.html”]
आठ महिन्यांपूर्वी सापडला होता पंजाबमधला अतिरेकी
आठ महिन्यांपूर्वी पंजाब येथील मोस्ट वॉन्टेड अतिरेक्याला शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आता राजस्थान (Rajasthan) आणि मध्यप्रदेश या दोन राज्यातील पोलिसांच्या रडारावर असणाऱ्या मोस्ट वॉन्टेड संशयितांना सर्च ऑपरेशन राबवत पकडण्यात आलं आहे.
या कारवाईविषयी शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके (Sandip Mitke) म्हणाले की, तीन दिवसांपुर्वी मध्यप्रदेशात (Madhya Pradesh) कारवाईसाठी गेलेल्या राजस्थान पोलिसांवर संशयितांनी गोळी झाडली आणि तेथून पळ काढला हाेता. त्यावेळी एक सरकारी पिस्तुल घेऊन ते पळाले होते. या गोळीबारात एक सहाय्यक पोलीस निरिक्षक देखील जखमी झाला आहे.
37 गुन्हे केलेल्या आरोपीवर 70 हजारांचे इनाम जाहीर
गोळीबाराची घटना घडल्यापासून राजस्थान पोलीस त्यांच्या मागावर होते. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास शिर्डी पोलीस आणि जयपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत शहरातील एका हॉटेलात सर्च ऑपरेशन राबवलं. त्यावेळी क्युआरटी टीमच्या मदतीने मोठ्या शिताफीने राजस्थानमधील गुंड कमलसिंग उर्फ कमल राणा याच्यासह कुख्यात टोळीतील पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. या टाेळीवर 37 गुन्हे दाखल आहेत. तसेच टोळीवर 70 हजारांचं इनामदेखील जाहीर झालं असल्याची माहिती शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी दिली.