कल्याण : हिंगोलीचे शिवसेना जिल्हा प्रमुख आणि आमदार संतोष बांगर यांनी प्रकाश आंबेडकराबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यानी आक्रमक पवित्रा घेतलाय. प्रकाश आंबेडकरांविरोधात केलेल्या आरोपांचे पडसाद राज्यभरात उमटत असून ठिकठिकाणी वंचित बहुजन आघाडी चा कार्यकर्ता कडून आंदोलनं सुरू आहेत.
या आंदोलनाचे रविवारी पडसाद कल्याणात उमटले. वालधुनी अशोक नगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी संतोष बांगर यांच्या प्रतिमेला काळिमा फासत जोडे मार आंदोलन करणे निषेध नोंदवला. यावेळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी बांगर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत बांगर यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. शिवसेनाप्रमुखांनी बांगर यांच पद रद्द करावं, अशी मागणी केली.
[read_also content=”डायरीतील मातोश्री माहिती नाहीत, पण चौकशीतून कोणीही सुटणार नाही; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन https://www.navarashtra.com/maharashtra/matoshri-is-not-known-in-the-diary-but-no-one-will-escape-the-inquiry-statement-of-bjp-state-president-chandrakant-patil-nrdm-260489.html”]
तसेच बांगर यांना महाराष्ट्रातील जिथे दिसेल तिकडे काळ फासू असा इशाराही वंचितच्या कार्यकर्त्यांनी दिला. या निषेध आंदोलनात वंचित बहुजन आघाडी कल्याण पूर्व शहर अध्यक्ष मनोज धुमाळ, उपाध्यक्ष आणि कार्यकर्ते जय घोडे, विजय सुरडकर, मिलिंद खैरे, रोहित डोळस, राजाभाऊ मुकद्दर सय्यद यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.