Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात धक्का; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?

राज्यातील विधानसभा निवडणुकांतील निकालानंतर महाविकास आघाडीत धुसपूस सुरू आहे. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधी पक्षातून बाहेर पडण्याचे प्रकार वाढले आहे. सर्वाधिक फटका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बसला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 21, 2025 | 04:53 PM
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात धक्का; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?

ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात धक्का; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?

Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील विधानसभा निवडणुकांतील निकालानंतर महाविकास आघाडीत धुसपूस सुरू आहे. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधी पक्षातून बाहेर पडण्याचे प्रकार वाढले आहे. सर्वाधिक फटका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बसला आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोकणातही ठाकरेंची साथ सोडून स्थानिक नेत्यांनी दुसऱ्या पक्षाची वाट धरताना दिसत आहेत. आता, कोकणात शिवसेनेच्या ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या रत्नागिरीच्या तालुकाप्रमुखांनी पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा आहे.

पुण्याच्या पाणीकोट्यातील वाढ रोखणे अन्यायकारक; ‘जलसंपदा’ विभागच…, माहिती अधिकारातून समोर आली बाब

शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरी तालुका प्रमुख प्रदीप साळवी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून लवकरच ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. साळवी यांनी जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्याकडे राजीनामा दिला आहे. प्रदीप साळवी यांची विनायक राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून कोकणात ओळख असून तळागाळात देखील त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळेच, साळवी यांचा राजीनामा हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातो. राजीनाम्यानंतर साळवी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा कोकणातील राजकारणात आहे. काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतील शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्याबद्दल तक्रारींचा पाढा वाचून माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. मात्र, योग्य वेळ आल्यानंतर आपण निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेकडे सध्या माजी खासदार विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक यांचंच नेतृत्व आहे. तर, शिंदेंच्या शिवसेनेत मंत्री उदय सामंत, मंत्री योगेश कदम, दीपक केसरकर, आमदार निलेश राणे यांच्यासारखे बडे नेते आहेत. त्यामुळे, सध्या शिंदेंच्या शिवसेनेचा आलेख कोकणात वाढत असून ठाकरेंच्या शिवसेनेला धक्के बसत आहेत. त्यातच, राजन साळवी हेही ठाकरेंची साथ सोडून दुसरा पर्याय निवडणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे, कोकणच्या बालेकिल्ल्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे गट कसा सामोरे जाणार हे पाहावं लागणार आहे.

Walmik Karad CCTV: वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगविरोधात सर्वात मोठा पुरावा, ‘त्या’ दिवशीचं CCTV फुटेज आलं समोर!

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिला असून मुंबईसह राज्यातील निवडणुकांमध्ये स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे, आगामी काळात महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहण्याची कसरत त्यांना करावी लागणार आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये ३५ जणांचे राजीनामे

गळवारी विश्‍वनाथ स्वामी यांच्यासह ३५ जणांनी प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे दिले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला हा धक्का मानला जात आहे.छत्रपती संभाजीनगर शहरात ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा देणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, मंगळवारी (21 जानेवारी) शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांच्यासह ३५ जणांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांसह माजी नगरसेवकांचा समावेश आहे. हे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Shiv sena thackeray group ratnagiri taluka chief pradeep salvi has resigned will be join join eknath shinde shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2025 | 04:46 PM

Topics:  

  • Maharashtra Poitics
  • Shiv Sena UBT Chief Uddhav Thackeray

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.