पुण्याचा पाणी प्रश्न पेटणार (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे: महापािलकेने सांडपाण्यावर प्रक्रीया करून शेतीसाठी पुनर्वापराकरीता दिलेल्या पाण्यातून केवळ ४० टक्केच पाणी जलसंपदा विभाग घेत असल्याची माहीती पुढे आली आहे. नुकतेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुणे महापािलकेकडून प्रक्रीया केलेल्या पाण्याविषयी माहीती मागविण्याचे आदेश दिले आहेत. पण प्रत्यक्षात जलसंपदा विभागच पाणी उचलण्यास सक्षम नसल्याचे माहिती अधिकारातील माहितीतून स्पष्ट हाेत आहे.
सजग नागरीक मंचचे विवेक वेलणकर यांनी यासंदर्भात माहीती अधिकारात माहिती मिळविली आहे. त्याआधारे त्यांनी विखे पाटील यांना निवदेन दिले आहे.
महापािलकेकडून साेडले जाणारे प्रक्रीया केलेले पाणी जलसंपदा विभाग वापरण्यास कमी पडला असा दावा वेलणकर यांनी माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीच्या आधारे केला.
२०१६ पासून २०२४ डिसेंबर अखेरपर्यंत *९ वर्षांत क्षमतेच्या जेमतेम ३५ टक्के ( २२.५ टिएमसी)* प्रक्रिया केलेले सांडपाणी जलसंपदा विभाग शेतीसाठी पुनर्वापर करु शकला. १ जानेवारी२०२५ पासून आजपर्यंत तर १०टक्के क्षमतेने पण शेतीसाठी पाणी उचलले गेले नाहीये. हे जलसंपदा खात्याचे अपयश आहे आणि त्यासाठी पुण्याच्या पाणीकोट्यातील वाढ रोखून धरणे निश्चितच अन्यायकारक आहे, असे वेलणकर यांनी नमूद केले.
हेही वाचा: पुण्यात ‘पाणी’ पेटणार; PMC ला नाेटीस देण्याचे विखे-पाटलांचे आदेश; नेमके प्रकरण तरी काय?
पुणे शहराला केला जाणारा पाणी पुरवठा हा जलसंपदा विभाग आणि महापािलका यांच्यातील वादाचा मुद्दा नेहमीच ठरला आहे. पुण्याची वाढती लोकसंख्या, हद्दीत समाविष्ट होत असलेली गावे लक्षात घेऊन पुण्याचा पाण्याचा कोटा वाढला पाहिजे ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. तसेच महापािलका मंजुर काेट्या पेक्षा अधिक पाणी उचलत आहे. नुकतेच जलसंपदा विभागाची बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीत पुणे महापािलकेकडून केली जाणारी वाढीव मागणीवर विखे पाटील यांनी प्रक्रीया केलेल्या पाण्याचा तपशील महापालिकेकडे मागितला हाेता. तसेच किती सांडपाणी प्रक्रिया करुन पुढे सोडते यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.
पुण्याला ४ धरणांचं वरदान लाभलं आहे ज्यामध्ये २९ टिएमसी पाण्याचा साठा होतो. हे पाणी पुण्याच्या पाण्याची तसेच दौंड, इंदापूर पर्यंतच्या शेतीची तहान भागवते, पुण्याने जास्त पाण्याची मागणी केली की शेतीला पाणी कमी पडू शकते. यामुळे गेल्या काही वर्षांत विनाकारण शहरी विरुद्ध ग्रामीण असा पाण्याचा संघर्ष उभा राहीला अाहे. यावर ताेडगा म्हणून महापािलकेने वापरलेले पाणी प्रक्रिया करून शेतीला पुनर्वापरासाठी मिळावे याकरिता २०१५ मध्ये १०० कोटी रुपये वापरून मुंढवा जॅकवेल येथे पुण्याचे सांडपाणी प्रक्रिया करून शेतीसाठी पुनर्वापर करण्यासाठी प्रकल्प उभारला. यात रोज साडेपाचशे एमएलडी अर्थात वर्षाला ६.५ टिएमसी सांडपाणी प्रक्रिया करून शेतीसाठी पुनर्वापर करण्यासाठी उपलब्ध करण्याची क्षमता निर्माण केली गेली.
जलसंपदा विभागाच्या मागणीनुसार महापािलकेने प्रक्रीया केलेला पाणी पुरवठा वर्ष – टिएमसीनिहाय पुढील प्रमाणे :
२०१६ : २.५८
२०१७ : १.९१
२०१८ : ३.५३
२०१९ : २.७७
२०२० : २.२१
२०२१ : १.६८
२०२२ : १. ६६
२०२३ : ३.७७
२०२४ : २.४४
‘‘मुंढवा जॅकवेल प्रकल्पातून शेतीसाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा १०० टक्के वापर करण्यास आपल्या खात्यास भाग पाडावे जेणेकरुन शेतीची गरज भागेल आणि पुण्याचा पाण्याचा कोटा २२ टिएमसी करुन द्यावा.’’
– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे