Shiv Sena Aditya Thackeray Press reaction on Dinanath Mangeshkar Hospital woman death case
शिवसेनेचे युवानेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्जबाबत चिंता व्यक्त करत, शहारांमध्ये असे होर्डिंग न लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राजकीय पक्षांना आवाहन करावं, अशी विनंती केली आहे.
राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी शहरांमध्ये राजकीय होर्डिंग लावण्याचं टाळावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘नो बॅनर’ उपक्रमासाठी पाऊल उचललं, तर आम्ही देखील त्यांना साथ देऊ आणि त्याचं काटेकोरपणे पालन करू, असे आश्वासनही त्यांनी दिलं आहे.
सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी आपल्या शहरांमध्ये राजकीय होर्डिंग लावण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यास मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ह्यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे.
फडणवीस जी ह्यांनी ‘नो बॅनर’ उपक्रमासाठी पाऊल उचलले, तर आम्ही देखील त्यांना साथ देऊ आणि त्याचे… pic.twitter.com/oU8vKZdgmM— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 24, 2024
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रात, २०२५ मध्ये पदार्पण करताना तसेच लोकसेवेचा संकल्प करताना, पक्षीय भेदभाव आणि विचारसरणी बाजूला ठेवून, नागरिकांना दिलासा देण्यासाठी राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्जवर प्रतिबंध घालून आपण सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेऊ शकता.
बृहन्मुंबई महानगरपालिकेवर सत्ता कोणाची? विधानसभेनंतर उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर मोठी खलबतं सुरु
गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या राजकीय गोंधळामुळे, प्रत्येक शहराच्या कानाकोपऱ्यात हजारो राजकीय पोस्टर पाहायला मिळत आहेत आणि असतात. एक नागरिक म्हणून हे पाहून खेद वाटतो. गेल्या दोन वर्षांत बीएमसीकडून निवडणूक पोस्टर हटवण्यात आली, मात्र सत्ताधारी पक्षाचे पोस्टर मात्र तसेच दिसत आहेत, असा निशाणाही आदित्या ठाकरेंनी साधला आहे. आपण या बालिश राजकीय स्पर्धेला बाजूला ठेऊ, असेही त्यांनी म्हटले आहे.
आपण या कारवाईच्या दिशेने पहिले पाऊल टाका, आम्हीही तुमच्या पाठिशी आहोत, अशी आश्वासन ठाकरेंनी दिले आहे. आपण सत्तेत मुख्यमंत्री आणि आम्ही, विरोधी पक्ष म्हणून असोल तरी या गोष्टींवर एकत्र काम केलेच पाहिजे. याविषयी बैठक बोलावली किंवा सर्व पक्षांना पत्र लिहिले, तर मी, माझा पक्ष आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.