Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावाने मुंबईत डान्सबार; अनिल परबांचा सभागृहात खळबळजनक आरोप

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे मुंबईतील कांदिवलीत सावली डान्सबार असल्याचा दावा ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांनी केला आहेु्. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 18, 2025 | 05:40 PM
गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावाने मुंबईत डान्सबार; अनिल परबांचा सभागृहात खळबळजनक आरोप

गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावाने मुंबईत डान्सबार; अनिल परबांचा सभागृहात खळबळजनक आरोप

Follow Us
Close
Follow Us:

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे मुंबईतील कांदिवलीत सावली डान्सबार आहे. या बारवर धाड टाकून २२ बारबाला ताब्यात घेण्यात आल्या होत्या, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केला आहे. शिवाय डान्सबारवर बंदी असतानाही हा बार कसा सुरू आहे?” असा सवाल देखील अनिल परब यांनी सभागृहात उपस्थित केला आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे.

विधानसभेतील राड्यावरुन बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रीया; भाजपवर केली जोरदार टीका

अनिल परब नक्की काय म्हणाले?

मुंबईतील कांदिवली येथे सावली बार आहे. पोलिसांनी या बारवर धाड टाकली त्यावेळी 22 बारबाला सापडल्या. शिवाय 22 कस्टमर आणि 4 कर्मचाऱ्यांना त्यावेळी ताब्यात घेण्यात आलं. कस्टमरवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि पंचनामा करण्यात आला. त्या बारचे परमिट ज्योती रामदास कदम यांच्या नावे असल्याचं समोर आलं. त्या गृह मंत्र्यांच्या मातोश्री आहेत, असा दावा परब यांनी केला आहे.

एकीकडे लाडक्या बहिणीचा तुम्हाला आशीर्वाद आहे म्हणता आणि दुसरीकडे तुम्ही आया बहिणीना डान्सबारमध्ये नाचवता? असा सवाल करत त्यांनी आजच्या आज गृह राज्यमंत्री यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली. अजित पवार तुम्ही योग्य ती कारवाई कराल. मुख्यमंत्री गृहमंत्रिपद सांभाळतात त्यांनी गृहराज्यमंत्री यांचा राजीनामा घेतला पाहिजे. जर कारवाई झाली नाही तर सरकारचा त्याला पाठींबा आहे, असं सिद्ध होईल. सध्या शरमेने मान खाली जातं आहे. आज बिहारमध्ये तुमचा महाराष्ट्र बिहार झाला आहे का? असं म्हटलं जात आहे. गृहराज्यमंत्र्यांकडून कायदे पायदळी तुडवले जातं असतील तर मुख्यमंत्र्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे, असा घणाघात त्यांनी यावेळी केला.

Vidhansabha News: विधिमंडळाच्या पासचा खुला बाजार ; विरोधी आमदारांचा गंभीर आरोप

जनसुरक्षा विधेयक चाटायचं आहे का?

विधान परिषदेत अनिल परब पुढे म्हणाले की, आज आम्ही राज्यपालांकडे आम्ही गेलो होतो. त्याठिकाणी आमच्या पीएला खाली उतरवलं? का उतरवलं तर म्हणाले की राज्यपालांच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. आता राज्यपाल सुरक्षित नसतील तर जनसुरक्षा विधेयक चाटायचं आहे का? काल विधीमंडळात राडा झाला, हाणामारी झाली, आमदार सुरक्षित नाहीत. सचिन पाटील नावाचा आरटीओ अधिकारी आहे, त्याचा ड्रायव्हर कंत्राटी होता. त्याचं कंत्राट संपलं आहे तरी हा ड्रायव्हर आहे. अधिकाऱ्याचे कपडे घालून चलन कापत आहे. तो अधिकारी गाडीत बसतोय आणि त्याचा ड्रायव्हर मशीन हातात घेऊन चलन काढत आहे. त्याचे मी फोटो पाठवतो, त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

Web Title: Shiv sena ubt mlc anil parab claims mumbai kandivali savli dance bar owner is minister yogesh kadam mother

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2025 | 05:40 PM

Topics:  

  • Anil Parab
  • Dance Bar
  • Yogesh Kadam

संबंधित बातम्या

Kokan Politics: महायुतीत मिठाचा खडा; कोकणात शिंदे गटाच्या दोन नेत्यांकडून स्वबळाची घोषणा
1

Kokan Politics: महायुतीत मिठाचा खडा; कोकणात शिंदे गटाच्या दोन नेत्यांकडून स्वबळाची घोषणा

मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते? हर्षवर्धन सपकाळांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका
2

मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते? हर्षवर्धन सपकाळांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

माणिकराव कोकाटे अन् गृहराज्यमंत्री योगेश कदमाची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करा; शिवसेना पक्षाची मागणी
3

माणिकराव कोकाटे अन् गृहराज्यमंत्री योगेश कदमाची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करा; शिवसेना पक्षाची मागणी

‘हिंमत असेल तर राजीनामा घेऊन दाखव’; डान्सबारवरून रामदास कदमांचं अनिल परबांना खुलं आव्हान
4

‘हिंमत असेल तर राजीनामा घेऊन दाखव’; डान्सबारवरून रामदास कदमांचं अनिल परबांना खुलं आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.