shiv sena uddhav balasaheb thackeray group met kdmc commissioner regarding civic issues nrvb
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) क्षेत्रातील विविध समस्यांबाबत (Issues) आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena UBT) गटाचे जिल्हाप्रमुख विजय साळवी (District Chief Vijay Salvi) यांच्या शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे (KDMC Commissioner Dr Bhausaheb Dangde) यांची भेट घेतली. यावेळी कल्याण शहरातील विविध समस्यांवर चर्चा करत विविध विषया संदर्भात निवेदन देण्यात आले. आयुक्तांनी लवकरच समस्यांचे निवारण करू असे आश्वासन दिले.
झालेल्या या चर्चेत प्रामुख्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मणीबाई रुग्णालयाबाबत आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सिग्नल यंत्रणाबाबत चर्चा करण्यात आली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रुक्मीणीबाई रुग्णालय असून नसल्यासारखेच आहे. कोरोना महामारीच्या काळात या रुग्णालयाचा गोरगरीब नागरीकांना काहीही उपयोग झाला नाही.
करोडो रुपये खर्चून बांधलेले हे रुग्णालय, लाखो रुपये पगार देऊन ठेवलेले कर्मचारी या सर्व खर्चाचा गोरगरीब नागरिकांना उपयोग होत नाही. कल्याण शहरात असलेले हे महानगरपालिकेचे रुग्णालय शहरातील तसेच टिटवाळा, मोहने व आजूबाजूची सर्व ग्रामीण विभाग येथील गोरगरीब नागरीकांना फार गरजेचे व आवश्यक आहे. परंतु ती आवश्यक असलेली वैद्यकीय उपचाराची सोय नसल्यामुळे गोरगरीब व गरजू नागरिकांना नाईलाजाने त्यांची आर्थिक परीस्थिती नसताना खाजगी रुग्णालयात जावे लागते.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 24 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-24-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]
वसंत व्हॅली प्रसुतीगृह येथे महानगरपालिकेचे स्वतः चे सोनोग्राफी सेंटर असावे. रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या इमारतीत एक संपूर्ण मजला खाजगी ब्लड बँकेसाठी देण्यात आला आहे. या ब्लड बँकेचा आपल्या रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना किती उपयोग होतो याची माहिती घेणे आवश्यक आहे. रक्ततपासणीसाठी रुग्णांना खाजगी पॅथॉलोजी मध्ये पाठवले जाते किंवा काही खाजगी पॅथॉलोजीच्या लोकांना रुग्णालयात बसण्याची व्यवस्था केली जाते. ज्या संस्थेला ब्लड बँकेसाठी अनेक वर्ष मोठी जागा उपलब्ध करून दिली आहे त्यांनीच विनामुल्य रक्त तपासणीची सुविधा देणे गरजेचे आहे. याबाबत महापालिकेच्या वतीने रक्ततपासणी सुविधा उपलब्ध करून द्यावी.
केडीएमसी क्षेत्रात सुरळीत व शिस्तबध्द वहातुक व्हावी यासाठी सिग्नल यंत्रणा सुरु करण्यात आली. महापालिकेत मोठे कंट्रोलरुम सुरु करण्यात आले. हे सर्व लाखो रुपये खर्चुन सुरु केले, त्याला दोन वर्ष झाली परंतु अद्याप ज्या चौकात सर्वात जास्त वाहतूक कोंडी होते. त्या सुभाष चौकात आणि सहजानंद चौकात सिग्नल यंत्रणा सुरु झाली नाही. या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी असते. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महराज चौक, लालचौकी येथे सिग्नल यंत्रणा सुरु करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
[read_also content=”घरभाड्याच्या बदल्यात नगरसेवकाने ‘अश्लील मागणी करताच ‘या’ अभिनेत्रीने शिकवला चांगलाच धडा https://www.navarashtra.com/web-stories/birthday-special-tejaswini-pandit-actress-teach-lesson-to-corporator-shocking-experance-nrvb/”]
या शिष्टमंडळात जिल्हाप्रमुख विजय साळवी यांच्यासह महिला जिल्हा संघटक विजया पोटे, शहर प्रमुख सचिन बासरे, सुजाता धारगळकर, वंडार कारभारी, विजय काटकर, दशरथ तरे, दयाशंकर शेट्टी, सुरेश सोनार, राजेश महाले, अरूण बागवे, दत्ता खंडागळे, सुधीर कंक, भागवत बैसाने, प्रदीप साळवी, अमोल गायकवाड, ॲड. सूरज पातकर, सतिश वायचळ, समिर मानकर, समिप काळे आदींसह इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.