Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : चिपळूणच्या राजकीय वर्तुळात उलथापालथ; दोन बड्या नेत्यांची अनपेक्षित भेट

शिवसेना (उबाठा)चे नेते आमदार भास्कर जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)चे आमदार शेखर निकम यांची अनपेक्षित भेट पुढे राजकीय समीकरणे बदलणारी ठरणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 11, 2026 | 07:44 PM
Ratnagiri News : चिपळूणच्या राजकीय वर्तुळात उलथापालथ; दोन बड्या नेत्यांची अनपेक्षित भेट
Follow Us
Follow Us:
  • चिपळूणच्या राजकीय वर्तुळात उलथापालथ;
  • दोन बड्या नेत्यांची अनपेक्षित भेट
चिपळूण : चिपळूणच्या राजकीय वर्तुळात सध्या एकाच चर्चेने जोर धरला आहे. तो म्हणजे शिवसेना (उबाठा)चे नेते आमदार भास्कर जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)चे आमदार शेखर निकम यांची अनपेक्षित भेट पुढे राजकीय समीकरणे बदलणारी ठरणार का? जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या सत्तास्थापनेच्या गुंतागुंतीच्या परिस्थितीमुळे ही चर्चा अधिकच रंगू लागली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी राजकीय विरोधक असलेले आमदार भास्कर जाधव आणि आमदार शेखर निकम अनावधानाने आमनेसामने आले होते. त्या भेटीत कटुता नव्हे तर सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन घडले. दिलखुलास संवाद आणि सौजन्यपूर्ण वागणुकीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यावेळी ती केवळ ‘औपचारिक भेट’ मानली गेली असली, तरी आता तीच भेट सत्तेच्या दिशेने जाणारा पहिला इशारा ठरतेय का, असा सवाल उपस्थित होत आहे.

Political News : दिल्लीमध्ये राजकीय हालचालींना वेग! DCM सुनेत्रा पवारांनी घेतली केंद्रीय नेत्यांची भेट

आकडेमोड राष्ट्रवादीच्या बाजूने, पण सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा गरजेचा

चिपळूण पंचायत समितीतील 18 गणांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) 7 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेना (उबाठा) गटाला 4, युतीतील शिवसेना शिंदे गटाला4आणि भाजपला 3 जागा मिळाल्या आहेत. एकट्या राष्ट्रवादीकडे बहुमत नसल्याने सत्ता स्थापनेसाठी अन्य पक्षांची साथ अपरिहार्य ठरते.

नगरपालिकेचा अनुभव आणि ‘एकला चलो’ची भूमिका

चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती झाल्याने राष्ट्रवादीला बाहेर ठेवण्यात आले होते. त्याचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसला आणि केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. त्या कटू अनुभवातून बोध घेत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका राष्ट्रवादीने स्वतंत्र ताकदीवर लढवण्याचा निर्धार केला. आमदार शेखर निकम यांनी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत ‘एकला चलो’ची भूमिका घेतली.

संकटातही संयम, प्रचाराची वेगळी वाट

निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने राष्ट्रवादी पक्षावर दुःखाचा डोंगर कोसळला. आमदार शेखर निकम यांच्यासाठी तो मोठा मानसिक आघात होता. मात्र त्यातून सावरत त्यांनी कोणतीही भव्य सभा, स्टार प्रचारक किंवा वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती न घेता, केवळ ‘डोअर टू डोअर’ प्रचारपत्रकांच्या माध्यमातून प्रचार केला. हीच प्रचारशैली मतदारांच्या मनाला भिडली, असे निकालातून स्पष्ट झाले. दुसरीकडे, युतीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिपळूणमध्ये जाहीर सभा घेतली. मात्र यावेळी त्यांची जादू फारशी चालली नाही. निकालात शिवसेना शिंदे गटाला ४ आणि भाजपला ३ जागांवरच समाधान मानावे लागले.

उबाठा गटाची ताकद कायम, जाधवांचे नेतृत्व ठळक

शिवसेना (उबाठा) गटानेही आपली ताकद सिद्ध करत ४ जागा जिंकल्या. आमदार भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लढवलेल्या निवडणुकीत पक्षाने आपली स्वतंत्र ओळख कायम ठेवली. राष्ट्रवादीच्या यशाबद्दल उबाठा गटाने खुलेपणाने कौतुक केले असून, पंचायत समितीत राष्ट्रवादीचाच सभापती बसावा, अशी भूमिका देखील अप्रत्यक्षपणे मांडली आहे.

सत्तास्थापनेसाठी नवी युती?

नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांतील कटू अनुभव पाहता आमदार शेखर निकम युतीच्या मदतीने सत्ता स्थापन करतील, असे सध्या तरी वाटत नाही. मात्र राष्ट्रवादीचा सभापती आणि समान भूमिकेवर सहमत असलेल्या पक्षांसोबत सत्ता स्थापन केली जाईल, असे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन पंचायत समितीत सत्ता स्थापन करतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.चिपळूणच्या राजकारणात निर्णायक क्षण एकेकाळचे राजकीय विरोधक असलेले आमदार भास्कर जाधव आणि आमदार शेखर निकम जर एकत्र आले, तर चिपळूणच्या राजकारणात तो मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. ‘ती’ भेट पुढे सत्तेची ‘गोड’ सुरुवात ठरते की नाही, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार असले तरी चिपळूणवासियांची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली आहे. “

मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न; राज ठाकरेंनी RSS मोहन भागवतांना सुनावले खडेबोल

 

Web Title: Upheaval in chipluns political circle unexpected meeting of bhaskar jadhav and shekhar nikam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 07:44 PM

Topics:  

  • NCP News
  • ratnagiri news
  • Shiv Sena UBT

संबंधित बातम्या

Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार दुष्काळाच्या संकटात; मासेमारी नौकांची संख्या अन्…
1

Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार दुष्काळाच्या संकटात; मासेमारी नौकांची संख्या अन्…

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
2

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

PDCC Bank Election : पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीत ठरावांचा धुरळा; राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचीही जोरदार फिल्डिंग
3

PDCC Bank Election : पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीत ठरावांचा धुरळा; राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचीही जोरदार फिल्डिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.