Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojana : तर ६० लाखांहून अधिक लाडक्या बहिणी योजनेतून बाद होतील; राज्यात या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

छगन भुजबळ यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर लाडकी बहीण योजनेची नव्याने चौकशी झाली तर ६० लाखांहून अधिक महिला योजनेतून बाद होतील, असा दावा ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 13, 2025 | 05:47 PM
तर ६० लाखांहून अधिक लाडक्या बहिणी योजनेतून बाद होतील; राज्यात या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

तर ६० लाखांहून अधिक लाडक्या बहिणी योजनेतून बाद होतील; राज्यात या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Follow Us
Close
Follow Us:

Ladki Bahin Yojana Updates : लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असलेल्या महिलांनी स्वत: हून आपले अर्ज मागे घ्यावेत, अन्यथा दंडासह रक्कम वसुल केली जाईल, असा इशारा छगन भुजबळ यांनी काल दिला होता. त्याच्या या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत असून ठाकरे गटानेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. लाडकी बहीण योजनेची नव्याने चौकशी झाली तर ६० लाखांहून अधिक महिला योजनेतून बाद होतील, असा दावा ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

Amruta Fadnavis: ‘मी पुन्हा येईन’चा नारा देत अमृता फडणवीसांची तूफान बॅटिंग,उखाणा घेत म्हणाल्या, आज माझ्या नणंदा दिसत आहेत खास…

“योजनेचे नियम काही वेगळे असतात. आता एका घरात दोन महिलांना लाभ देता येत नाही. तसेच एखाद्याच्या घरी चारचाकी गाडी असेल तर त्यांना लाभ देता येणार नाही. मात्र, गरीबांना लाभ मिळायला हवा. असा या योजनेचा उद्देश आहे. पण जे नियमात बसत नाहीत, त्यांनी स्वतःहून आपलं नाव काढून घेतलं पाहिजे. याबाबत लोकांना अवाहनही केलं पाहिजे. आता योजनेच्या माध्यमातून जे पैसे दिले गेले आहेत, ते पैसे परत मागण्यात काहीही अर्थ नाही. त्यामुळे दिले गेलेले पैसे पुन्हा घेण्यात येऊ नये. मात्र, यापुढे सांगितलं पाहिजे की, नियमात बसत नाही त्यांनी स्वत:हून आपले अर्ज काढून घ्यावीत. त्यानंतर जर त्यांनी आपले नावे काढून घेतले नाही, किंवा अपात्र महिलांनी अर्ज मागे न घेतल्यास दंडासह रक्कम वसुली कररण्यात येईल” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं.

लाडकी बहीण योजनेवरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. छगन भुजबळ यांच्या वक्तव्यानंतर आता ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी भाष्य केलं आहे. लाडकी बहीण योजनेवर राऊत म्हणाले, ‘केवळ विधानसभा निवडणुकीत फायदा होण्यासाठी महिलांना पैसे दिले नाहीत. तर या नव्याने चौकशी झाल्यानंतर साठ लाखांहून अधिक महिला या योजनेतून बाद होतील’, असा दावा त्यांनी केला आहे.

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना विनायक राऊत म्हणाले, ‘शिर्डीमधील त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमात येऊन त्यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर बोलावं लागतं, याचाच अर्थ राज्यात उद्धव ठाकरे यांचं महाराष्ट्रात वर्चस्व आहे हे मान्य करावं लागेल. राज्यातील इतर घटनांवर न बोलता फक्त टीका करतात. निधीच्या बाबतीत महाराष्ट्राला डावललं जात आहे. यावर न बोलता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका करणार असतील, तर त्यांनी वारंवार महाराष्ट्रात यावं’.

Devendra Fadnavis: “राज्यात ‘व्होट जिहाद’ पार्ट 2 सुरू झालाय”; मुख्यमंत्री फडणवीसांना नेमकं म्हणायचयं काय?

यावेळी आगामी महापालिका निवडणुकीवरही राऊत यांनी भाष्य केलं. शिवसेनेने स्वबळावर लढण्याची भूमिका अद्याप तरी घेतलेली नाही. ती कार्यकर्त्यांची भावना होती. स्वबळावर लढण्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असं राऊत पुढे म्हणाले.

‘सुरेश धस यांनी बीडमधील प्रकरण बाहेर काढलं. त्यांच्यावर टीका करण्याऐवजी पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्या कामाची माहिती घ्यावी. सत्याची बाजू घेतली म्हणून पंकजा मुंडे यांचा पापड होत असेल, तर त्यांना टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची नैतिकता अजित पवारांकडे नाही, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.

Web Title: Shiv sena uddhav thackeray group leader vinayak raut claimed 60 lakh women applications will be rejected from ladki bahin yojana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2025 | 05:34 PM

Topics:  

  • Ladki Bahin Yojana
  • Shiv Sena UBT
  • Vinayak Raut

संबंधित बातम्या

Mumbai Traffic Update: ठाकरेंचा दसरा मेळावा अन् वाहतूक व्यवस्थेत बदल; ‘या’ वाहनांना नो एन्ट्री
1

Mumbai Traffic Update: ठाकरेंचा दसरा मेळावा अन् वाहतूक व्यवस्थेत बदल; ‘या’ वाहनांना नो एन्ट्री

महिलांनो, लाडकी बहीण योजनेतून पैसे घेताय? तर ‘ही’ बातमी महत्त्वाची, सरकार 15 कोटी रुपये घेणार परत
2

महिलांनो, लाडकी बहीण योजनेतून पैसे घेताय? तर ‘ही’ बातमी महत्त्वाची, सरकार 15 कोटी रुपये घेणार परत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो काळजी घ्या…! E-KYC मधील एक चूक पडू शकते महागात, थेट नाव होईल कमी
3

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो काळजी घ्या…! E-KYC मधील एक चूक पडू शकते महागात, थेट नाव होईल कमी

लाडक्या बहिणींनो, e-KYC बंधनकारक असली तरी काळजी करू नका; ‘या’ स्टेप्स् फॉलो करा अन् KYC करून घ्या
4

लाडक्या बहिणींनो, e-KYC बंधनकारक असली तरी काळजी करू नका; ‘या’ स्टेप्स् फॉलो करा अन् KYC करून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.