‘मी पुन्हा येईन’चा नारा देत अमृता फडणवीसांची तूफान बॅटिंग (फोटो सौजन्य-X)
Amruta Fadnavis Marathi News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुण्यातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवत किरण दगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात, महिला मेळाव्यात विशेष उपस्थिती लावताना अमृता फडणवीस यांनी मोकळेपणाने भाषण केले आणि जोरदार बॅटिंग केली.त्यांनी महिलांना जगण्याचा मंत्र सांगितला आहे. अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांचे नाव घेत उखाणादेखील घेतला आहे.
माझ्या लाडक्या पतीदेवाच्या लाडक्या बहीणी म्हणत त्यांनी समोरच्या महिलांशी आपलं नणंद- भावजयीचं नातं असल्याचं सांगत उशीरा येण्याबद्दल मी सॉरी तर म्हणणार नाही, मी बसं एढचं म्हणेन की ‘मी पुन्हा येईन’ असा नारा देत पुन्हा येईन तेव्हा लेट येणार नाही, असे म्हणत अमृता फडणवीस यांनी हसतखेळत, मजेशीर अंदाजात भाषण केलं.
अमृता फडणवीस या एक गायिका असून त्या सामाजिक कार्यात सक्रिय असतात. त्या नेहनी महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत असतात. त्यासाठी वेगवेगळ्या मेळाव्यांनादेखील भेट देतात. असाच उल्लेख त्यांनी उखाण्यातदेखील केला आहे. त्यांनी महिलावर्गाला संबोधित देवेंद्र फडणवीसांचे नाव घेतले आहे.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री असताना, नंतर उपमुख्यमंत्री आणि पुन्हा मुख्यमंत्री झाले, पण आधीपासूनच यअमृता फडणवीस यांनी त्यांना खंबीर साथ दिली. त्या विविध सामाजिक कार्यक्रमात अग्रेसरपणे सहभागी होता, समाजोपयोगी कामं करतानाही दिसतात. राज्यभरात विविध ठिकाणी महिलांसाठी जे मेळावे आयोजित केले जातात, तिथेही त्या हजेरी लावतात. महायुतीच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ची सर्वत्र चर्चा असते, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यशही मिळालं.
राज्य सरकारच्या याच योजनेचा विविध नेत्यांकडूनही प्रसार सुरू असतो, उल्लेख होत असतो, अमृता फडणवीस यांनीही सरकारी योजनांची प्रसिद्धी आणि प्रचार सुरू केला आहे हे उल्लेखनीय आहे. काल पुण्यातील कार्यक्रमातही त्यांनी याच योजनेचा उल्लेख करत उपस्थित महिलांसाठी, लाडक्या बहिणींचा खास उल्लेख केला. आज या कार्यक्रमात हळदी-कुंकूही ठेवलेलं आहे, त्यामुळे मी येथील महिलांसाठी खास चार ओळी लिहून आणल्या आहेत, असं सांगत अमृता फडणवीस यांनी एक मस्त उखाणा घेतला . ‘ आज माझ्या नणंदा दिसत आहेत खास, देवेंद्रजी तुमच्या पाठिशी आहेत, प्रगति व्हावी तुमची झकास’ असा मस्त उखाण त्यांनी घेताच, टाळ्यांचा कडकटाड झाला.
जर तुम्ही निरोगी आणि आनंदी असाल तर तुम्ही दररोज हसले पाहिजे.कोणी काही टोला मारला, टोमणा लगावला तरी तरी तो ऐकायचा आणि सोडून देऊन हसायंच, असे अमृता फडणवीस म्हणाल्या. मी तेच केलंय, माझ्या जीवनात मला जे ठीक वाटतं ते मी केलं, माझ्या मुलीसाठी पण पुढे मी एक वाट मोकळी करून शकेन असं वाटलं, ते मी केलं. माझ्ंलग्न झाल्यानंतरही मी गाणं सुरू ठेवणं असो, नाचणं असो, बँकिंग असो, मी ते सगळं चालू ठेवलं. कोणीही मला टोला मारला , टोमणे ऐकवले तर मी ते फक्त ऐकायचे, हसायचे आणि पुढे निघून जायचे, असं अमृता फडणवीस यांनी नमूद करत महिलांना दिलखुलासपणे, मनमोकळेपणे जगत पुढे जायचा मोलाचा सल्ला दिला.