मालवण: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. आठ महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. पण पुतळा कोसळल्यामुळे संपूर्ण राज्यातून शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अशातच ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी पुतळा निर्मितीमध्येच मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.
सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाणांनी लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंसाठी महाराजांच्या पुतळ्याच्या भ्रष्टाचाराचे पैसे वापरल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे. नारायण राणेंसाठी एका मताला एक हजार रुपये वाटण्यात आले होते. पण आता नारायण राणेंकडूनच पालकमंत्री चव्हाणाची पाठराखण होत आहे. देशातला कोणताही मुद्दा असेल तर नारायण राणे आणि नितेश राणेंची प्रतिक्रीया येते, मग आता गप्प का आहेत?, असा सवाल वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे.
हेदेखीला वाचा: कोण आहे दहशतवादी फरहातुल्ला घोरी? भारतातील रेल्वे बॉम्बने उडवण्याची दिली धमकी
आज आम्ही मालवणमध्ये आक्रोश मोर्चा काढत आहोत. आज सरकारला शिवप्रेमींचा संताप काय आहे ते दिसेल. पुतळा प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या जयदीर आपटे आणि केतन पाटील या दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. मंत्रिमंडळातील एक मंत्री या दोघांनाही अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी सिंधुदुर्ग मधल्या वकिलांना फोन करत आहेत. पुतळ्याच्या अनावरणावेळी भाजपचेच झेंडे
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्ह राजकोट संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. मालवणमधील बाजारपेठ आज उत्सर्तपणे बंद ठेवण्यात आली आहे. भरड नाक्यासह बाजारपेठाबी बंद ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, हा बंद कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून थेट स्थानिक नागरिकांकडून हा बंद पाळण्यात येत आहे.
हेदेखीला वाचा: भारत-अमेरिकेची SOSA करारावर स्वाक्षरी; काय आहे करार आणि कसा होईल त्याचा फायदा?
दरम्यान, राजकोट किल्ल्याच्या बरोबर समोरच राहणाऱ्या एका घरातल्या व्यक्तींने महाराजांचा पुतळा पडला त्या दिवशीची परिस्थिती सांगितली. ज्या दिवशी पुतळा कोसळला त्या दिवशी वाऱ्याचा खूप वेग होता. पाऊस आणि वारा एकत्र असल्याने वाऱ्याचा वेग अधिक वाढला. पण पुतळा पडण्याइतका वाऱ्याचा वेग खरेच होता की, हेही माहिती नाही. पण त्यादिवशी वाऱ्याचा वेग अधिक होता, असे संबंधित व्यक्तीने सांगितले आहे.