महायुतीतील ८ मंत्र्यांना मिळणार नारळ? राहुल नार्वेकर, सुधीर मुनगंटीवारांवर मोठी जबाबदारी?
विधानसभा अध्यक्ष म्हणून आतापर्यंत क्रांतिकारक निर्णय घेतले आहेत. अधिवेशनात १५२ लक्षवेधी मांडण्यात आल्या आहेत. मी माझ्या पदावर चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. दुसरी कोणती जबाबदारी मिळाली तर, ती सुद्धा योग्य पद्धतीने पार पाडू. मी माझ्या कामाबद्दल संतुष्ट आहे. ज्यावेळी मंत्रिपद मिळेल. त्यावेळी बघू, असं उत्तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं आहे. सामनात राहुल नार्वेकर यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता असून सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा अध्यक्षपद देण्यात येईल, असा दावा करण्यात आला आहे. त्यावर राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात येणार का? तर मंत्री छगन भुजबळ यांनी केलं मोठं विधान; म्हणाले…
महायुती सरकारमधील तब्बल ८ मंत्र्यांना नारळ दिला जाणार असल्याचा दावा समानात करण्यात आला आहे. त्यामुळे सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची शंका येत आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात लवकरचं फेरबदल होणार आहेत. सध्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिपदाची देण्यात येणार आहे. त्यांच्या जागी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा अध्यक्षपद देण्यात येण्याची शक्यता आहे, असा दावा देखील करण्यात आला आहे.
त्यावर उत्तर देतना राहुल नार्वेकर म्हणाले की, ‘माध्यमांमधील बातम्यांवर माझा विश्वास नाही. पक्षाच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे. पक्षाची जी इच्छा असेल, तीच इच्छा माझी देखील इच्छा असेल’, असं त्यांनी म्हटलं आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर आनंद होईल का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी, ‘मला देतील ती जबाबदारी पार पाडायला तयार आहे’, असंही त्यांनी म्हटलं आहे.
मंत्री असो किंवा विधानसभा अध्यक्ष, शेवटी जनतेसाठीच काम करायचं आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत असताना क्रांतिकारक निर्णय घेतले आहेत. अधिवेशनात आतापर्यंत १५२ लक्षवेधी मांडण्यात आल्या आहेत. माझं पद मी चांगल्या पद्धतीनं सांभाळत आहे. इतर कोणती जबाबदारी मिळाली तर, ती सुद्धा योग्य पद्धतीने पार पाडू. मी माझ्या कामाबाबतीत संतुष्ट आहे. जेव्हा केव्हा मंत्रिपदाची माळ पडेल. त्यावेळी बघू, असंही यावेळी नार्वेकर यांनी म्हटलं आहे.