Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“एकनाथ शिंदे गद्दारी करून मुख्यमंत्री झाले”; सुषमा अंधारे यांची घणाघाती टीका

सध्या युवकांना रोजगार नाही सोयाबीन, कापूस, कांदा याला हमीभाव नाही. मोदींच्या चुकीच्या कृषी विषयक धोरणामुळे महाराष्ट्रात दररोज सरासरी सात शेतकरी आत्महत्या करत आहेत, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 11, 2024 | 02:21 PM
“एकनाथ शिंदे गद्दारी करून मुख्यमंत्री झाले”; सुषमा अंधारे यांची घणाघाती टीका
Follow Us
Close
Follow Us:

कराड: एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना निवडणुका तोंडावर आल्यावरच लाडकी बहीण का आठवली? असा सवाल उपस्थित करत गद्दारी करून मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीला जनतेने लोकसभेत चांगलाच हात दाखवला आहे. त्यामुळे आता लोकांना भुलवण्यासाठी टीव्हीवर योजनांची जाहिरातबाजी केली जात आहे. मुळात चांगल्या गोष्टींची जाहिरात करावीच लागत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने खोटी जाहिरातबाजी करणाऱ्या महायुतीला लाडक्या बहिणींनी विधानसभेतही हात दाखवावा, असे आवाहन शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले.

कराड येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. विचारमंचावर कराडच्या माजी नगराध्यक्षा शारदाताई जाधव, मलकापूरच्या माजी नगराध्यक्षा नीलमताई येडगे, माजी जिल्हा परिषद सदस्या श्यामबाला घोडके, अर्चनाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सुषमा अंधारे म्हणाल्या, करोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाची दखल जागतिक संघटनेने घेतली. त्यांनी सरसकट शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला. तीन लाखांपर्यंत कर्जमाफी केली. नियमित परतफेड करणाऱ्यांनाही 50 हजारांचा लाभ दिला. मात्र, सध्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळत नाही. प्रचंड महागाई, बेरोजगारी वाढली आहे. विकासावर बोलायला महायुतीकडे मुद्दे नसल्याने ते कटेंगे – बटेंगेची भाषा बोलत आहेत.

पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, जाती – जातीत तेढ निर्माण करणाऱ्या, लाडक्या बहिणींबद्दल पोकळ कळवळा दाखवणाऱ्या लोकांचा खरा चेहरा समोर आला आहे. अनेक ठिकाणी होत असलेल्या महिला अत्याचारांच्या घटना, महिलांबद्दल काढण्यात येणारे अपशब्द संताप आणणाऱ्या गोष्टी आहेत. महाराष्ट्रात कधीही असली गलिच्छ वापरा भाषा बोलली गेली. ते गलिच्छ, अस्थिर राजकारण फडणवीस यांनी केले. आता त्यांची वाईट नजर सुसंस्कृत कराडवर पडली असून त्यांना येथे धार्मिक दंगली घडवायच्या आहेत. परंतु, कराडची जनता साक्षर व सुज्ञ आहे. इथे जातीयवाद चालत नसून आपण कराडची संस्कृती कधीही हरवू देणार नाही, याची मला खात्री असल्याचेही त्या म्हणाल्या.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजपच्या १० वर्षांच्या काळात महाराष्ट्राची मोठी अधोगती झाली. अनेक उद्योग गुजरातला पळवले. सरकार पाडण्यासाठी ५० कोटी रुपये देऊन आमदार खरेदी केले गेले. रस्ते, पुल, अन्य विकासकामांतही पैसे खाणाऱ्या सरकारने शिवरायांच्या पुतळा उभारणीतही पैसे खाऊन महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावला. त्यामुळे अशा भ्रष्ट लोकांना जनता नक्कीच धडा शिकवेल.

हेही वाचा: “संधी मिळाल्यास येथील झोपडपट्टीवासीयांचे…”; महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांचे जनतेला आश्वासन

ते म्हणाले, सध्या युवकांना रोजगार नाही सोयाबीन, कापूस, कांदा याला हमीभाव नाही. मोदींच्या चुकीच्या कृषी विषयक धोरणामुळे महाराष्ट्रात दररोज सरासरी सात शेतकरी आत्महत्या करत आहेत, याला मोदी, फडणवीस जबाबदार आहेत. महागाई वाढली त्यावेळी त्यांना बहिणीची आठवण झाली नाही. अग्निवीरच्या नावाखाली युवकांची दिशाभूल केली जात त्यांच्यासमोर कोणतेही शाश्वत भविष्य नाही. त्यामुळे अशा भ्रष्टाचारी सरकारला हद्दपार करायला पाहिजे.

कराडची जागा राज्याचे नेतृत्व करणारी
कराडच्या प्रीतिसंगमाला यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आहे. तो वारसा सुसंस्कृत राजकारणी व निष्कलंक व्यक्तिमत्व असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सक्षमपणे चालवत आहेत. परंतु, येथे जातीयवादी राजकारण करणाऱ्या फडणवीस यांचे उमेदवार पैशांच्या जोरावर उड्या मारत आहेत. बाबांनी त्यांना दोन वेळा पाडले. आता तिसऱ्यांदा त्यांची पडायची हौस तुम्ही पूर्ण करा. कराडची जागा ही महाराष्ट्राचे नेतृत्व करणारी जागा आहे. तब्बल 1800 कोटी रुपयांचा विकासनिधी आणणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या सुसंस्कृत नेतृत्वाला साथ दिल्यास राज्याला नेतृत्व लाभेल, असा विश्वास सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.

महालक्ष्मी योजनेचा लाभ देणार
लाडकी बहीण योजनेचे मी समर्थनच केले होते. खरंतर कर्नाटकमध्ये काँग्रेसने ही योजना राबवली, तेलंगणातही त्याची अंमलबजावणी केली. आम्ही महाराष्ट्रात महिलांना दोन हजार रुपये देणार होतो. परंतु, महायुतीने कंजूशी करत दीड हजार रुपये दिले. आता ते 2100 रुपये देणार असल्याचे सांगताहेत. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर आम्ही महिलांना महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून प्रतिमहा तीन हजार रुपये देणार आहोत. तसेच मोफत एसटी प्रवास, मुलींसह मुलांनाही मोफत उच्च शिक्षण, लोकांना 25 लाखांपर्यंत मोफत आरोग्य विमा देणार, राज्यात जातवार जनगणना करणार, तात्काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणार असल्याचे आ.  चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Shivsena ubt leader sushma andhare criticizes to cm eknath shinde for maharashtra election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2024 | 02:14 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Assembly election 2024
  • sushma andhare

संबंधित बातम्या

मित्रपक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव, शिंदेंची दिल्लीवारी पक्ष वाचवण्यासाठी; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
1

मित्रपक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव, शिंदेंची दिल्लीवारी पक्ष वाचवण्यासाठी; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Maharashtra Politics: मोहोळांंवर आरोप करताच एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, “धंगेकरांना काय…”
2

Maharashtra Politics: मोहोळांंवर आरोप करताच एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, “धंगेकरांना काय…”

Maharashtra Politics: महायुतीमध्ये बिनसलं? एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याने चर्चांना उधाण
3

Maharashtra Politics: महायुतीमध्ये बिनसलं? एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याने चर्चांना उधाण

Eknath Shinde : लक्ष्मी घरी येणार! लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार; DCM एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही
4

Eknath Shinde : लक्ष्मी घरी येणार! लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार; DCM एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.