Crime News
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात (City of Aurangabad ) एक धक्कादायक घटना समोर आली असून शिवूर (Shivur) येथील एका पत्रकाराने महिलेचा गळा चिरून (journalist slit the woman’s throat) तिची हत्या केली आहे. शहरातील हडको कॉर्नर डी मार्ट (Hudco Corner D Mart) जवळ एका खोलीत महिलेचा खून करून मृतदेह घेऊन जात असतांना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. प्रेम प्रकरणातून हा खून झाला असल्याचे बोलले जात आहे. अंकिता श्रीवास्तव असे मृत महिलेचा नाव आहे. तर सौरभ लाखे असे आरोपीचे नाव आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सौरभ आणि अंकिता यांचे प्रेमप्रकरण होते. तर सौरभ याचा विवाह झालेला आहे. दरम्यान, सौरभकडे मृत महिलेने लग्नाचा तगादा लावल्याने रागाच्या भरात त्याने महिलेचा गळा चिरून खून केला असल्याचे बोलले जात आहे. हत्या केल्यानंतर सौरभ याने महिलेचा मृतदेह गाडीतून (woman’s body in a car) घेऊन निघाला असताना देवगाव पोलिसांनी (Devgaon Police)त्याला पकडले. सौरभ हा पत्रकार असून स्थानिक दैनिकासाठी काम करतो. त्याने महिलेची हत्या केल्यानंतर मी खून केला असल्याची माहिती पत्रकार आणि पोलिसांच्या ग्रुपवर टाकली. त्यांनतर आपण देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात जमा होत असल्याची माहिती सुद्धा आहे.