Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक घटना! मुंबई वडोदरा महामार्गासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

कल्याणजवळ असलेल्या बल्ल्यानी येथे राहणारे चांद शेख शहा यांचे नातेवाईक रियाज शहा हे मीरा भाईंदरला राहतात. बल्यानी येथे शेख पीर वल्ली शहा बाबा यांचा २७ तारखेपासून उरूस सुरू आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 29, 2024 | 02:08 PM
धक्कादायक घटना! मुंबई वडोदरा महामार्गासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत बल्ल्यानी गावात मुंबई वडोदरा महामार्गाचे काम सुरू आहे. मुंबई वडोदरा जेएनपीटी महामार्गाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान अंडरपास मोरी बनवण्याचे काम सुरू आहे. या मोरीजवळ साचलेल्या सांड पाण्यात तीन वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाल्याचे धक्कादायक घटना आज सकाळी ११ वाजता घडली आहे. या मुलीचे नाव रेहमुनीसा रियाज शहा असे आहे. या घटनेमुळे मुंबई वडोदरा जेएनपीटी महामार्गाचे काम करीत असलेल्या ठेकेदारकडून निष्काळजीपणा केला जातो आणि तो कसा जीवघेणा ठरतोय, ही बाब उघड झाली आहे.

कल्याणजवळ असलेल्या बल्ल्यानी येथे राहणारे चांद शेख शहा यांचे नातेवाईक रियाज शहा हे मीरा भाईंदरला राहतात. बल्यानी येथे शेख पीर वल्ली शहा बाबा यांचा २७ तारखेपासून उरूस सुरू आहे. या उरूमध्ये सहभागी होण्यासाठी रियाज शहा हे चांद शहा यांच्या घरी आले. सोबत त्यांची तीन वर्षाची मुलगी रेहमूनिसा देखील होती. आज सकाळी रेहमूनिसा घरी दिसत नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. काही वेळाने तिचा मृतदेह चाळी लगत असलेल्या मुंबई वडोदरा जेएनपीटी महामार्गाच्या अंडरपास मोरीत साचलेल्या पाण्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. टिटवाळा पोलिसांना देखील या घटनेची माहिती देण्यात आली. या रस्त्याच्या कामाच्या संबंधित ठेकेदाराकडे या अंडरपासमध्ये सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याचे मागणी अनेकदा स्थानिक नागरिकांनी केली होती.

मात्र संबंधित ठेकेदाराने या मागणीकडे दुर्लक्ष केले. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच आज या तीन वर्षाच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला. या आधी देखील खड्ड्यात पडून दोन ते तीन मुले जखमी झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी नगरसेवक पाटील यांच्यासह मयत मुलीच्या कुटुंबीयांनी केली. तसेच ठेकेदाराने संबंधित मयत मुलीच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील माजी नगरसेवक पाटील यांनी केली आहे. टिटवाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून घटनेचा पंचनामा सुरू आहे. मुलीचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहे.

Web Title: Shocking event a 3 year old child died after falling into a pit dug for the mumbai vadodara highway kalyan dombivli municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 29, 2024 | 02:08 PM

Topics:  

  • kalyan
  • Kalyan Dombivli Municipal Corporation
  • thane

संबंधित बातम्या

Thane Pollution Control: ठाणे शहराच्या पर्यावरणाचा ‘ॲक्शन प्लॅन’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर आढावा
1

Thane Pollution Control: ठाणे शहराच्या पर्यावरणाचा ‘ॲक्शन प्लॅन’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर आढावा

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक
2

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

मुंबईतील तापमान १७ अंशांपर्यंत घसरले, ठाणे आणि नवी मुंबईमध्येही थंडीचा जोर वाढला, येत्या काही दिवसांत हवामान कसं राहणार?
3

मुंबईतील तापमान १७ अंशांपर्यंत घसरले, ठाणे आणि नवी मुंबईमध्येही थंडीचा जोर वाढला, येत्या काही दिवसांत हवामान कसं राहणार?

KDMC News : कल्याणमधील ‘या’ भागात रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था, नागरीकांनी समस्या मांडताच माजी नगरसेवकांनी केला पाहणी
4

KDMC News : कल्याणमधील ‘या’ भागात रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था, नागरीकांनी समस्या मांडताच माजी नगरसेवकांनी केला पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.