शेजारी निमुळती गल्ली असल्यामुळे व मागील बाजूस चाळ असल्यामुळे हे काम करताना चाळीतील कौलारू घर व पत्रे यांच्यावर मलबा पडल्यामुळे महापालिकेने दोन वेळा चाळ रिकामी करून घेतली.
कल्याणजवळ असलेल्या बल्ल्यानी येथे राहणारे चांद शेख शहा यांचे नातेवाईक रियाज शहा हे मीरा भाईंदरला राहतात. बल्यानी येथे शेख पीर वल्ली शहा बाबा यांचा २७ तारखेपासून उरूस सुरू आहे.
नगररचनाकार, सहाय्यक नगररचनाकार हे देखील अडकण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी व्यक्त केली आहे. या दोघांना कल्याण न्यायालयात हजर केले जाणार आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम मंजुरीसाठी काही कागदपत्र सादर करण्यात आली होते. या कागदपत्रात फेरफार करण्यात आल्याची तक्रार केडीएमसीने बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचत ही आग निर्माणनिधी इमारतीसाठी आणलेल्या बांधकाम साहित्यातील थर्माकोलला लागली असल्याची महिती सूत्रांकडून प्राप्त झाली.
इथल्या लोकप्रतिनिधी बद्दल नागरिक आणि राजकीय नेत्यांमध्ये रोष, त्यांना बदल हवं. मनसे आमदार राजू पाटील यांची नाव न घेता श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका, तर काही लोक आपल्या पोळी भाजण्यासाठी प्रसिद्धीसाठी…
महापालिकेच्या परिमंडळ एकचा उपायुक्त पदाचा पदभार धैर्यशील जाधव यांच्याकडे होता. तो काढून घेण्यात आला आहे. त्यांच्याकडे सध्या शिक्षण विभागाचे उपायुक्त पद दिले आहे.
प्रामुख्याने विजेचा वापर कमी करणे आणि सौर ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त करणे, ही आपली जबाबदारी असून नागरिकांनी देखील यास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आगीचे भीषण रूप पाहता घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ७ बंबानी पोहचत तातडीने बसला लागलेली आग विझविण्याचे काम सुरू केले. ७ अग्निशमन दलाच्या बंबाच्या सहाय्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी या दोन्ही बसला लागलेल्या…