Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : शिरोलीत ‘शोले स्टाईल’ तरुणाचे आंदोलन; पाण्याच्या टाकीवर चढला अन्…

गावांतील तरुण पिढीने पुढाकार घेऊन अनोखे आंदोलन केले. पुलाची शिरोली येथे पुणे-बंगळुरू महामार्गालगत असणाऱ्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल सुमारे तासभर आंदोलन केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 18, 2025 | 12:55 PM
शिरोलीत 'शोले स्टाईल' तरुणाचे आंदोलन; पाण्याच्या टाकीवर चढला अन्...

शिरोलीत 'शोले स्टाईल' तरुणाचे आंदोलन; पाण्याच्या टाकीवर चढला अन्...

Follow Us
Close
Follow Us:

शिरोली : कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर असताना हद्दवाढीविरोधात व समर्थनात वातावरण तापलेले आहे. मागील आठवड्यात न्यू पॅलेस येथे खासदार शाहू महाराज यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार-खासदार यांची बैठक झाली होती. त्यावेळी सर्वानुमते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन हद्दवाढीच्या बाजूने सर्वानुमते निर्णय घेण्याचे ठरले होते. दरम्यान, गावांतील तरुण पिढीने पुढाकार घेऊन अनोखे आंदोलन केले.

पुलाची शिरोली येथे पुणे-बंगळुरू महामार्गालगत असणाऱ्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल सुमारे तासभर आंदोलन केले. मंगळवारी मुंबई येथे कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीची बैठक मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत होत आहे. या बैठकीत हद्दवाढीसंदर्भात काय निर्णय होतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर २० गावांमध्ये हद्दवाढीविरोधात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

पुलाची शिरोली येथे व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच स्वयंस्फूर्तीने आपले व्यवहार बंद ठेवून हद्दवाढीला विरोध दर्शविला आहे. गावांतील तरुण पिढीने पुढाकार घेऊन अनोखे आंदोलन केले. पुलाची शिरोली येथे पुणे-बेंगलोर महामार्गांलगत असणाऱ्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल सुमारे तासभर आंदोलन केले. ‘शिरोली आमच्या हक्काची-नाही कुणाच्या बापाची, हद्दवाढ रद्द झालीच पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

आजच्या गावबंदमध्ये गावातील राजकीय पुढाऱ्यांनी पाठ फिरवल्याने या लोकप्रतिनिधींना हद्दवाढ हवी आहे काय? हद्दवाढीला समर्थन आहे असे समजायचे का? असा संतप्त सवाल तरुणांनी उपस्थित केला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. यावेळी आंदोलनकर्त्यांना शिरोली एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले.

Web Title: Sholay style youth protest in shiroli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 12:55 PM

Topics:  

  • kolhapur news

संबंधित बातम्या

Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका
1

Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी तृतीयपंथी निवडणूक रिंगणात; ‘शाहू आघाडी’कडून मिळाली उमेदवारी
2

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी तृतीयपंथी निवडणूक रिंगणात; ‘शाहू आघाडी’कडून मिळाली उमेदवारी

‘औंदा ह्यो पाऊस…’, शेतकऱ्यांच्या वेदनांचा कडवा हुंकार; कवी बाबा पवारांचा सडेतोड प्रहार
3

‘औंदा ह्यो पाऊस…’, शेतकऱ्यांच्या वेदनांचा कडवा हुंकार; कवी बाबा पवारांचा सडेतोड प्रहार

श्री महालक्ष्मी मंदिराच्या बाहेरील अतिक्रमणे हटवली जाणार; जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण आदेश
4

श्री महालक्ष्मी मंदिराच्या बाहेरील अतिक्रमणे हटवली जाणार; जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.