Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : पंचगंगा नदी बनतेय ‘गटारगंगा’; जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ मूग गिळून गप्प

कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहीनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचगंगा नदीची अवस्था आता गटारगंगा बनली आहे. परिणामी शिरोळ तालुक्यात पुन्हा एकदा आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 15, 2026 | 01:42 PM
Kolhapur News : पंचगंगा नदी बनतेय ‘गटारगंगा’; जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ मूग गिळून गप्प
Follow Us
Follow Us:
  • पंचगंगा नदी बनतेय ‘गटारगंगा’;
  • जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ मूग गिळून गप्प
कोल्हापूर : (जि. प्र.) कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहीनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचगंगा नदीची अवस्था आता गटारगंगा बनली आहे. परिणामी शिरोळ तालुक्यात पुन्हा एकदा आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. पंचगंगा नदीपात्रात गेल्या 2-3दिवसांपासून मैलामिश्रित काळेकुट्ट पाणी येऊ लागल्याने नदीकाठच्या नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तेरवाड-शिरढोण पुलादरम्यान नदीचे पाणी पूर्णपणे काळसर झाले आहे. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. या प्रकारामुळे शेतकरी, ग्रामस्थ व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीपात्रात काळेकुट्ट पाण्याचा प्रवाह दिसून येत आहे. पाण्यावर फेस तरंगताना दिसत असून, त्यातून असहा वास येत आहे. अनेक ठिकाणी मासे मृतावस्थेत आढळल्याचीही माहिती स्थानिकांकडून देण्यात आली.

मातीची गुणवत्ता व पिकांच्या वाढीवर परिणाम; पशुधनासाठीही धोका
या पाण्याचा वापर शेतीसाठी केल्यास पिकांवर विपरीत परिणाम होतो. मातीची गुणवत्ता खालावते, पिकांची वाढ खुंटते आणि उत्पादन घटते. पशुधनासाठीही हे पाणी धोकादायक ठरू शकते. काही ठिकाणी जनावरांना पाणी पाजल्यानंतर आजाराची लक्षणे दिसल्याचा दावा ग्रामस्थानी केला आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ पर्यावरणापुरता मर्यादित नसून, तो थेट आरोग्य आणि अर्थकारणाशी संबंधित असल्याचे स्पष्ट होत आहे.

Kolhapur News : “जिल्ह्यातील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळणार” – मंत्री हसन मुश्रीफ

दोषींवर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत
नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासनाने केवळ पाहणी करून समाधान मानू नये, तर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा सक्षम आहे का, त्याची नियमित तपासणी होते का, तसेच मलनिस्सारण प्रकल्प कार्यरत आहेत का, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. दोषीवर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही पुढे येत आहे.

नदीकाठच्या विहिरींतील पाण्यालाही दुर्गंधी
नदीकाठच्या विहिरीतील पाण्यालाही दुर्गंधी येऊ लागल्याने पिण्याच्या पाण्याबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते विश्वास कांबळे यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, नदीकाठावरील औद्योगिक वसाहतींमधील रसायनयुक्त सांडपाणी तसेच शहरातील मलयुक्त सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता ओढे-नाल्यांद्वारे थेट पंचगंगा नदीत सोडले जात आहे. विशेषतः धरणातील पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने नदीतील नैसर्गिक प्रवाह घटतो, अशा वेळी मोठ्या प्रमाणावर सांडपाणी मिसळल्याने प्रदूषणाची तीव्रता वाढते आणि नदीचे पाणी पूर्णतः दूषित होते.

शिरोळ तालुक्यात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे
नदीपात्रातील या परिस्थितीमुळे डासांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. दूषित पाण्यामुळे त्वचारोग, पोटाचे विकार, ताप यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो, अशी भीती आरोग्यतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. शिरोळ तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची होत आहे मागणी
पंचगंगा नदी ही कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी मानली जाते. या नदीवर हजारो शेतकऱ्यांचे शेतीसाठी अवलंबित्व आहे. तसेच अनेक गावांचे पिण्याचे पाणीही अप्रत्यक्षपणे या नदीवर अवलंबून आहे. त्यामुळे नदीचे वाढते प्रदूषण हा केवळ स्थानिक प्रश्न नसून व्यापक पर्यावरणीय संकट ठरू शकतो. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलून पाण्याचे नमुने तपासावेत, प्रदूषणाचे स्रोत शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा या प्रश्नावर मोठे जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा
प्रदूषण मंडळाने तातडीने पाण्याची तपासणी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा प्रदूषण कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा विश्वास बालिघाटे यांनी दिला आहे.

Kolhapur : भिमा कृषी व पशू प्रदर्शनाचे उद्घाटन! निरनिराळ्या पशूंनी लावली हजेरी, चक्क 1400 किलोचा रेडा…

 

Web Title: Panchganga river water polluted district administration and pollution control board neglect

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • kolhapur news
  • panchganga river

संबंधित बातम्या

Election Commission Controversy : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात थेट हायकोर्टात याचिका; SIR थांबवण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?
1

Election Commission Controversy : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात थेट हायकोर्टात याचिका; SIR थांबवण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.