Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur : अतिक्रमणामुळे रस्ते बंद; स्थानिक राजकारणामुळे शेतकऱ्यांची अडवणूक

गगनबावडा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले पाणंद रस्ते आजही कागदावरच अस्तित्वात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 15, 2026 | 02:33 PM
Kolhapur : अतिक्रमणामुळे रस्ते बंद; स्थानिक राजकारणामुळे शेतकऱ्यांची अडवणूक
Follow Us
Follow Us:
  • अतिक्रमणामुळे रस्ते बंद;
  • स्थानिक राजकारणामुळे शेतकऱ्यांची अडवणूक
कोल्हापूर : गगनबावडा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले पाणंद रस्ते आजही कागदावरच अस्तित्वात असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासन स्तरावरून वेळोवेळी पाणंद रस्ते मोकळे करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे आदेश दिले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र या आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. ग्रामीण भागात उसाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. ऊस तोड झाल्यानंतर तो वेळेत साखर कारखान्यापर्यंत पोहोचवणे हे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे ऊस वाहतुकीसाठी आवश्यक असलेले पाणंद रस्ते अतिक्रमणामुळे बंद झालेले आहेत.

66 ग्रामीण भागात वाट आडवा आडवीचे प्रकार जास्त प्रमाणात घडत असतात. कायमस्वरूपी असणारी पाणंद वाट राजकीय किंवा अन्य हेतूने अडवली जात आहे. तोडलेला ऊस मजुरांच्या कमतरतेमुळे घरगुती माणसे व बदली माणसे लावून डोक्यावरून बाहेर आणावा लागत आहे. त्यामुळे या विषयाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालावे. शासनाचे आदेश जर केवळ कागदापुरतेच मर्यादित राहिले, तर शेतकऱ्यांचा प्रशासनावरील विश्वास डळमळीत होईल. त्यामुळे आता तरी प्रशासनाने ठोस पावले उचलून पाणंद रस्ते प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी खुले करून द्यावेत.
– तानाजी पाटील, माजी सरपंच, अणदूर

राजकीय हस्तक्षेप व भाऊबंदकीचा फटका
शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी पाणंद रस्त्यांवर राजकीय दबाव, भाऊबंदकी, आपापसातील वाद यामुळे मुद्दाम अडथळे निर्माण केले जात आहेत. काही लोकांनी पाणंद रस्त्यांवर शेती, कुंपण, झाडे लावून किवा माती टाकून रस्ते बंद केले आहेत. यामुळे शेजारील शेतकऱ्यांना आपल्या शेतातून ऊस बाहेर काढणे अशक्य होत आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की काही शेतकऱ्यांना डोक्यावरून, बैलगाडीने किंवा पर्यायी लांब मार्गाने ऊस वाहून नेण्याची वेळ येत आहे, यामुळे खर्च वाढत असून ऊस वेळेत कारखान्यात न गेल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

Kolhapur News : “जिल्ह्यातील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळणार” – मंत्री हसन मुश्रीफ

पाणंद रस्ते म्हणजे शेतकऱ्यांचा हक्क
पाणंद रस्ते हे कोणाची खासगी मालमता नसून शासनाच्या नोंदीत असलेले सार्वजनिक रस्ते आहेत. या रस्त्यांवरून शेतीमालाची वाहतूक करणे हा शेतकऱ्यांचा मूलभूत हक्क आहे. तो हिरावून घेणे म्हणजे शेतक-यांच्या उपजीविकेवर गदा आणण्यासारखे आहे.

मागणी
सर्व पानंद रस्त्यांची तातडीने पाहणी करावी
अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी
राजकीय दबाव न घेता कायद्याप्रमाणे निर्णय घ्यावा
ऊस वाहतुकीसाठी रस्ते तात्काळ मोकळे करून द्यावेत
जर वेळेत कारवाई झाली नाही, तर शेतकरी आंदोलनाच्या मार्गावर जाण्याची शक्यता व्यक्त करत आहेत. असा थेट इशारा स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे.

Kolhapur News : पंचगंगा नदी बनतेय ‘गटारगंगा’; जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ मूग गिळून गप्प

Web Title: Kolhapur roads closed due to encroachment farmers obstruction due to local politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Rice Storage Tips: तांदूळ हवाबंद डब्यात ठेवूनही किडे पडतात? ‘हे’ कारण जाणून घ्या!
1

Rice Storage Tips: तांदूळ हवाबंद डब्यात ठेवूनही किडे पडतात? ‘हे’ कारण जाणून घ्या!

Nepal Flood Viral Video: पूराच्या थैमानातही लाजिरवाणी घटना; मृत महिलेचे कानातले काढण्याचा प्रयत्न, Video Viral
2

Nepal Flood Viral Video: पूराच्या थैमानातही लाजिरवाणी घटना; मृत महिलेचे कानातले काढण्याचा प्रयत्न, Video Viral

शाळांना पोषण आहारासाठी परवाना सक्ती नको! मुख्याध्यापक संघ आक्रमक, बहिष्काराचा इशारा
3

शाळांना पोषण आहारासाठी परवाना सक्ती नको! मुख्याध्यापक संघ आक्रमक, बहिष्काराचा इशारा

Chandrapur News: चंद्रपुरात वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा; 19 हजारांहून अधिक जणांवर कारवाई
4

Chandrapur News: चंद्रपुरात वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा; 19 हजारांहून अधिक जणांवर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.