Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्री गणेश गौरव पुरस्कार २०२२ स्पर्धा पारितोषिक वितरण, पर्यावरणपूरक व शिस्तबद्ध ही मुंबईतील गणेशोत्‍सवाची ओळख – आश्विनी भिडे

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे आयोजित श्री गणेश गौरव स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. याप्रसंगी परिमंडळ २ चे उप आयुक्त रमाकांत बिरादार, सहाय्यक आयुक्त (मालमत्ता) प्रशांत गायकवाड, बृहन्‍मुंबई सार्वजन‍िक गणेशोत्‍सव समन्‍वय समितीचे अध्‍यक्ष ऍड. नरेश दहिबांवकर यांच्‍यासह स्पर्धेचे परीक्षक, सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

  • By Amrut Sutar
Updated On: Nov 15, 2022 | 07:47 PM
श्री गणेश गौरव पुरस्कार २०२२ स्पर्धा पारितोषिक वितरण, पर्यावरणपूरक व शिस्तबद्ध ही मुंबईतील गणेशोत्‍सवाची ओळख – आश्विनी भिडे
Follow Us
Follow Us:

मुंबई – आपल्या मुंबई महानगरीत दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होणारा गणेशोत्सव हा अतिशय उत्साहाने व शिस्तबद्धरित्या साजरा होतो. बृहन्मुंबईसारख्या लोकसंख्येची घनता अधिक असणा-या व दाटीवाटीने वसलेल्या महानगरात शिस्त आणि पर्यावरण पूरकता जपत मोठ्या प्रमाणात घरगुती व सार्वजनिक स्तरावर साजरा होणारा गणेशोत्सव हा निश्चितच अभिमानास्पद आहे, असे कौतुकोद्गार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांनी काढले. त्या आज बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे आयोजित श्री गणेश गौरव स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. याप्रसंगी परिमंडळ २ चे उप आयुक्त रमाकांत बिरादार, सहाय्यक आयुक्त (मालमत्ता) प्रशांत गायकवाड, बृहन्‍मुंबई सार्वजन‍िक गणेशोत्‍सव समन्‍वय समितीचे अध्‍यक्ष ऍड. नरेश दहिबांवकर यांच्‍यासह स्पर्धेचे परीक्षक, सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

[read_also content=”मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण, फितूर झालेल्या साक्षीदारांची संख्या २९ वर https://www.navarashtra.com/maharashtra/malegaon-blast-case-number-of-exonerated-witnesses-rises-to-twenty-nine-345140.html”]

आज आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे या उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाल्या की, गेल्या २ गणेशोत्सवांदरम्यान ‘कोविड’च्या साथीमुळे आपण मर्यादित पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. या दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेने वेळोवेळी केलेल्या आवाहनांना गणेश भक्तांनी व श्रीगणेश मंडळांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला व चांगले सहकार्य केले. तसेच यंदा कोविडची साथ नियंत्रणात आल्यानंतर केलेल्या आवाहनांना देखील सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल त्यांनी सर्व संबंधितांप्रती आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला परिमंडळ २ चे उपायुक्त श्री. रमाकांत बिरादार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकादरम्यान बिरादार यांनी बृहन्मुंबईतील गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये नमूद करतानाच श्रीगणेश गौरव स्पर्धा आयोजना मागील हेतू देखील सांगितला. श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांद्वारे उभारण्यात येणा-या देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश, पर्यावरण जनजागृती संदेश आणि नागरी सेवा-सुविधांविषयक संदेश जनसामान्यांपर्यंत अधिकाधिक प्रभावीपणे पोहोचण्यास प्रोत्साहन मिळावे, या प्रमुख हेतुने ही स्पर्धा आयोजित केली जात असल्याचे श्री. बिरादार यांनी आवर्जून नमूद केले.

• प्रथम पारितोषिक (रु.७५,०००/-)
पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, पंचगंगा संकुल, ना. म. जोशी मार्ग, मुंबई – १३

• द्वितीय पारितोषिक (रु.५०,०००/-)
युवक उत्कर्ष मंडळ, माऊंट मेरी शाळेच्या बाजूला, मालवणी, मालाड (पश्चिम), मुंबई – ९५

• तृतीय पारितोषिक (रु.३५,०००/-)
स्वप्नाक्षय मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, ग्लोरिया सोसायटी जवळ, मॉडेल टाऊन, सात बंगला, अंधेरी (पश्चिम), मुंबई – ५३

Web Title: Shree ganesh gaurav award this year competition award distribution in bmc today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2022 | 07:47 PM

Topics:  

  • Ashwini Bhide

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.