पंढरपुरात व्हीआयपी दर्शनासाठी वशिलेबाजी सुरूच
पंढरपूर : आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी 10 कोटी 84 लाख रुपयांचे दान अर्पण केले. तसेच सोने-चांदीचे दागिने अर्पण केले असून, मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
यंदा आषाढी यात्रा कालावधीत दर्शनरांगेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांचे सुलभ जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना देखील मंदिर समितीने केल्या होत्या. आषाढ शुद्ध 0१ (दि.२६) ते आषाढ शुध्द १५ (दि.१०) या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ ७५०५२९१ रुपये अर्पण, २८८३३५६९ रुपये देणगी, ९४०४३४० रुपये लाडू प्रसाद विक्री, ४५४१४५८ रुपये भक्तनिवास, १४४७१३४८ रुपये हुंडीपेटी, ३२४५६८२ रूपये परिवार देवता, २५९६१७६८ रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून १२४५०७५ रुपये व ३ इलेक्ट्रिक रिक्षा / बसचे ३२ लाख इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे.
मागील वर्षी श्रींच्या चरणाजवळ ७७०६६९४ रुपये अर्पण, २६९२२५७८ रुपये देणगी, ९८५३००० रुपये लाडू प्रसाद विक्री, ५०६०४३७ रुपये भक्तनिवास, ९३५५०७३ रुपये हुंडीपेटी, ३१७९०६८ रूपये परिवार देवता तसेच २२१५३६०१ रुपये सोने-चांदी अर्पण, अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून ६२८१०९ रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे.
मागील यात्रेच्या तुलनेत यंदा उत्पन्नात चांगली वाढ
सन २०२४ च्या आषाढी यात्रेत रूपये ८४८५८५६० व या वर्षीच्या यात्रेत १०८४०८५३१ इतके उत्पन्न प्राप्त असून, मागील यात्रेच्या तुलनेत २३५४९९७१ इतकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या मिळालेल्या दानातून श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना पुरेशा प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील, असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.