नाशिक : आगामी २०२७ मध्ये नाशिक मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) तयारीला महापालिका (Nashik Mumnicipal Corporation) प्रशासनाने प्रारंभ केला आहे. नमामी गोदा प्रकल्प (Namami Goda Project) सल्लागार नेमणूक शेवटच्या टप्प्यात असताना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner and Administrator Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध प्रकारच्या सूचना केल्या.
सिहस्थासाठी पार्किंगला भरपूर जागा लागणार असून नवीन जागांचा शोध घेण्याबरोबरच नव्याने ६० किलोमीटर लांबीचा नवीन बाह्य रिंग रोड तयार करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. रिंगरोडचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
कुंभमेळ्याच्या कामाचे प्रधान्यक्रम ठरविण्याचे आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले. नवीन रिंग रोड (New Ring Road) जलालपूर (Jalalpur) पासून सुरू होऊन एकूण ६० किलोमीटर फिरून पुन्हा जलालपूर पर्यंत येणार आहे. त्याला नवीन बाह्य रिंग रोड असे नाव सध्या देण्यात आले आहे. महापालिका प्रशासन या रोडयासाठी प्रयत्न करणार असून कुंभमेळ्यापूर्वी साधारण चार वर्षात हे नवीन रिंग रोड तयार करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
[read_also content=”अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी कोणती पावले उचलली?; प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश https://www.navarashtra.com/maharashtra/what-steps-were-taken-for-the-annabhau-sathe-memorial-clarify-stand-on-affidavit-mumbai-high-court-directive-to-maharashtra-govt-325931.html”]
काही भागांमध्ये रिंग रोडचा काही भाग ३० मीटर प्रमाणे असला तरी त्याला ६० मीटर करण्यापर्यंत विचार सुरू आहे. रिंग रोड तयार झाल्यावर शहरातील वाहतुकीवर पडणारा ताण हलका होऊन वाहतूक कोंडी देखील कमी होणार आहे. त्याचप्रमाणे जगभरातून येणाऱ्या भाविकांना देखील सर्व गावात फिरता येणार आहे. त्याचप्रमाणे मागच्या कुंभमेळ्याच्या वेळेला ज्या जागा पार्किंग साठी होत्या त्यातील बऱ्याचशा ठिकाणी बांधकाम झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे महापालिकेने आता पार्किंगसाठी नव्याने जागा शोधण्याचा काम हाती घेतला आहे.
नाशिक महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी यापूर्वीचे अनेक कुंभमेळे आयोजनांमध्ये भाग घेतलेला आहे. यामुळे महापालिका आयुक्त यांनी आज त्यांच्याकडून माहिती घेऊन यापूर्वी कशा पद्धतीने काम झाले त्याचा आढावा घेतला.
नाशिक मध्ये दर बारा वर्षांनी भव्य स्वरूपात सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होते. या काळात शाही स्नानाची परभणी असते म्हणून जगभरातून लाखो भाविक नाशिकमध्ये येतात. त्यांचा सर्व प्रकारच्या सोयी सुविधा शासनासह महापालिका प्रशासनाच्या वतीने पुरविण्यात येतात.
शहरातील घाटांची लांबी वाढविण्याचा विचार सध्या सुरू आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी प्रशासना दिले असून घाटांची लांबी वाढल्यास अधिकाधिक भाविकांना स्नान करण्यासाठी जागा मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल व गर्दी नियंत्रणात राहील, असा प्रशासनाचा अंदाज आहे.
सिंहस्थ कुंभमेळासाठी नाशिक महापालिकेला विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यासाठी नेमका किती निधी आवश्यक आहे. याबाबतचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. आढावा घेण्यात आल्यानंतर
शासनाकडे निधीची मागणी करण्यात येणार आहे. कुंभमेळा नियोजनात करण्यात येणाऱ्या कामांच्या प्रधान्यक्रम ठरविण्याच्या आदेश देखील दिले आहे. अत्यंत चोख पद्धतीने सर्व नियोजन करण्याचे प्रयत्न आहे.
-डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मनपा आयुक्त तथा प्रशासक