Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indrayani : वारकऱ्यांच्या पवित्र इंद्रायणीला मिळणार नवे रुप; नदी सुधार प्रकल्पाला मिळाली मंजूरी

आळंदी आणि देहूमध्ये लाखो वराकरी येत असतात. वारकरी सांप्रदायामध्ये अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या इंद्रायणी नदीच्या सुधार प्रकल्पाला मंजूरी मिळाली.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 19, 2025 | 04:46 PM
SLTC approves Indrayani River Improvement Project

SLTC approves Indrayani River Improvement Project

Follow Us
Close
Follow Us:

Indrayani River News : पिंपरी- चिंचवड :  पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील सुमारे 50 लाख नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या आणि महाराष्ट्राच्या वारकरी सांप्रदायामध्ये श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला आता चालना मिळाली आहे. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाच्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या (SLTC) मान्यतेचा प्रस्तावाला अखेर मान्यता मिळाली. त्यामुळे नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला.

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला चालना देण्यासाठी आणि पर्यावरण प्रेमी व स्वयंसेवी संस्था प्रकल्पाचा सुधारीत विकास आराखडा तयार करावा यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला होता. विधानसभा अधिवेशनामध्ये राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 2022 मध्ये मागणी केली होती. इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प अर्थात ‘‘नमामी इंद्रायणी’’साठी सर्व प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, निधीची उपलब्धता याबाबत सातत्त्याने केलेले पाठवायला अखेर यश मिळाले आहे.

विशेष म्हणजे, शहर आणि परिसरातील पर्यावरण प्रेमी संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी नदी सुधार प्रकल्पाचा विकास आराखडा अंतिम करताना महानगरपालिकेच्या Master plan मध्ये दर्शवल्यानुसार विविध ठिकाणी 60 एमएलडी क्षमतेचे मैलाशुद्धीकरण केंद्र सदर कामामध्ये प्रस्तावित केले आहे. तसेच, वॉटर ATM, सार्वजनिक स्वच्छतालय, सार्वजनिक फर्निचर, साखळी कुंपण कंपाऊंड वॉल आणि बायोडायव्हर्सिटी पार्क इत्यादी कामांचा समावेश करण्यात आला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत अंतर्गत राज्यस्तरीय तांत्रिक समितीची अपर मुख्य सचिव, (नवि-२) यांच्या अध्यक्षतेखाली सदर प्रकल्पांचा अनुषंगाने आज बैठक झाली. सदर बैठकीत इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा सविस्तर विकास आराखड्याला तांत्रिक समिमीची मान्यता मिळाली आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पातून नदीसंवर्धन, पूरनियंत्रण, पाण्यावर प्रक्रिया आणि सौंदर्यीकरण अशा चारही बाबी साध्य केल्या जाणार आहेत. एकूण 526 कोटींचा हा प्रकल्प असून, अमृत 2.0 अभियानांतर्गत तो राबविला जाणार आहे. 40 आणि 20 एमएलडीचे हे दोन प्रकल्प असतील. यात पावसाचे पाणी साठवण्यासाठी जलनि:स्सारण प्रणाली, प्रदूषित पाणी मलनि:स्सारण प्रकल्पाकडे वळविण्यासाठी इंटरसेप्टर, पूर नियंत्रणासाठी दगडी बांधकाम करुन नदीच्या तटांचे सक्षमीकरण आणि नदीपात्राचे तटबंदीकरण, तसेच नदी तटावर हरित क्षेत्राचा विकास व वनसंवर्धनाद्वारे सुशोभिकरण अशी कामे एकत्रितपणे करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

तर आमदार महेश लांडगे म्हणाले की, राज्यातील तमाम वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आणि पिंपरी-चिंचवडकरांची जीवनवाहिनी असलेल्या इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मान्यता मिळाली. यापूर्वी प्रशासकीय मान्यता देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार्य केले. भाजपा महायुतीच्या सरकारने पिंपरी चिंचवड करांना दिलेल्या शब्द खरा केला. सरकारचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो, असे आमदार महेश लांगडे म्हणाले आहेत.

Web Title: Sltc approves indrayani river improvement project congratulates cm fadnavis pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2025 | 04:45 PM

Topics:  

  • Indrayani River
  • PCMC News
  • pune news

संबंधित बातम्या

Pune News : वाकडेवाडी, बारामती बसस्थानकांवर सुरक्षारक्षकांचे सतर्कता दाखवत मानवीय कार्य
1

Pune News : वाकडेवाडी, बारामती बसस्थानकांवर सुरक्षारक्षकांचे सतर्कता दाखवत मानवीय कार्य

Pune : पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचे आरोप, नेमकं प्रकरण काय ?
2

Pune : पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचे आरोप, नेमकं प्रकरण काय ?

Pune News : परिसर बिबट्या मुक्त करण्यासाठी लागेल ती यंत्रणा लावा,Eknath Shinde नी दिले प्रशासनाला आदेश
3

Pune News : परिसर बिबट्या मुक्त करण्यासाठी लागेल ती यंत्रणा लावा,Eknath Shinde नी दिले प्रशासनाला आदेश

Maharashtra Politics: प्रचारासाठी दिवस फक्त चार! उमेदवारांसामोर उभा राहिला पेच
4

Maharashtra Politics: प्रचारासाठी दिवस फक्त चार! उमेदवारांसामोर उभा राहिला पेच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.