केंद्र सरकारच्या 'अमृत २.०' योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सुमारे ४३० कोटी ७५ लाख रुपयांच्या 'इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पा'चा विषय ऐनवेळी (आयत्या वेळी) मंजुरीसाठी आणल्याने बैठकीत जोरदार गोंधळ उडाला.
आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर आली असताना पवित्र इंद्रायणी नदीचे पात्र केमिकलयुक्त पाण्यामुळे फेसाळली आहे. वारीत लाखो वारकरी इंद्रायणीत स्नान करून माऊलींच्या दर्शनाला जात असल्याने या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त होत…
देहूगाव येथील भैरवनाथ चौक पुलावरून इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवाहितेचे प्राण वाचवण्यात पुणे महानगर प्रदेश आपत्कालीन प्रतिसाद दल (पीडीआरएफ) आणि पोलिसांना यश आले आहे.
इंद्रायणीचे पाणी पिण्यायोग्य न राहिल्याने आळंदी नगरपरिषदेला भामा-आसखेड धरणातून पाणी मागवावे लागत आहे. नदीतील प्रदूषणामुळे स्थानिक जलशुद्धीकरण केंद्रावर अतिरिक्त ताण पडत आहे.
अधोक्षज आणि इंदूचं नातं गंभीर परीक्षेच्या टप्प्यावर येऊन ठेपलं आहे. श्रीकलाविरुद्धच्या लढाईत इंदूला मोठ्याबाईंची भक्कम साथ लाभली आहे. नात्यातील दुरावा मिटवण्यासाठी बाहेर गेले असताना घडलेली घटना आयुष्याला कलाटणी देते.
महाराष्ट्रातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदी येथील इंद्रायणी नदीचे प्रदूषण आता धोकादायक टप्प्यावर पोहोचले असून, नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळल्याने परिसरात मोठी खळबळ माजली आहे.
पिंपरी चिंचवडकरांसह तमाम वारकरी संप्रदायासाठी श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीच्या सुधार प्रकल्पाला राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता अखेर मिळाली आहे.
कुंडमळा येथील दुर्घटनेमध्ये 4 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर सुमारे 38 जण जखमी झाले होते. या पुलाच्या मालकीबाबत जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने हात वर केले.
कार्ला आणि मळवली परिसरात इंद्रायणी नदीला पूर आल्याने मळवली–देवळे मार्ग पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. तसेच पाटण परिसरातील अनेक सोसायट्यांमध्येही पाणी घुसले आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.