Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : एसओपीनुसार अनधिकृत बांधकामांवर हातोडा; येत्या 3 दिवसात…

महापालिका आयुक्तांच्या ‘एसओपी’ नुसार अनधिकृत बांधकामे शाेधण्यास सुरुवात झाली आहे. कनिष्ठ अभियंत्यांनी गेल्या चार दिवसात पन्नासहून अधिक अनधिकृत बांधकामे शाेधली आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 08, 2026 | 01:36 PM
एसओपीनुसार अनधिकृत बांधकामांवर हातोडा; येत्या 3 दिवसात...

एसओपीनुसार अनधिकृत बांधकामांवर हातोडा; येत्या 3 दिवसात...

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महापालिका आयुक्तांच्या ‘एसओपी’ नुसार अनधिकृत बांधकामे शाेधण्यास सुरुवात झाली आहे. कनिष्ठ अभियंत्यांनी गेल्या चार दिवसात पन्नासहून अधिक अनधिकृत बांधकामे शाेधली आहेत. पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामांचे पेव उघडकीस येण्याची शक्यता आहे.

 

महापालिका आयुक्तांनी शहरातील अनधिकृत बांधकामे आणि व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी नवीन ‘एसओपी’ जाहीर केली हाेती. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातंर्गत असलेल्या कनिष्ठ अभियंत्यासह इतर अधिकाऱ्यांवर सर्व्हेक्षण करण्याची जबाबदारी साेपविण्यात आली हाेती. त्यानुसार ‘कनिष्ठ अभियंत्यांनी’ पन्नासहून अधिक अनधिकृतपणे कामे सुरू असलेली बांधकामे शोधून काढली आहेत. लोहगाव, खराडी परिसरासह गुजर निंबाळकरवाडीतील ही बांधकामे आहेत. शहराच्या उर्वरीत भागातील अहवालही प्रशासनाला प्राप्त होत असून, शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामांचे पेव उघडकीस येण्याची शक्यता आहे.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी २० जानेवारीला शहरातील अनधिकृत बांधकामे आणि व्यवसायांवर कारवाई संदर्भात संबधित विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. अनधिकृत बांधकामांवर विहीत मुदतीत कारवाई करण्यासाठी एसओपी तयार केली. यामध्ये प्रामुख्याने क्षेत्रिय कार्यालयांमध्ये काम करणार्‍या कनिष्ठ अभियंत्यांवर त्यांच्या भागातील साईड व फ्रंट मार्जिनमधील अनधिकृत बांधकामांसह सर्व प्रकारची अनधिकृत बांधकामे, पदपथांवरील अनधिकृत व्यवसाय यांचे दररोज सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सोपविली. त्यांनी याचा अहवाल क्षेत्रिय सहाय्यक आयुक्तांच्या मार्फत बांधकाम व अतिक्रमण निर्मुलन विभागाला पाठवायचा. या विभागांकडून संबधितांना नोटीस पाठवून पोलिस आणि व्हेईकल डेपोशी समन्वय साधून विहीत मुदतीत कारवाई करायची. याचा अहवाल बांधकाम व अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या माध्यमातून महापालिका आयुक्तांना पाठवायचा, असे या एसओपीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

अगदी चारच दिवसांपुर्वी आयुक्तांनी या एसओपीनुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले. अवघ्या तीनच दिवसांत खराडी, लोहगाव, नगररोड, कात्रज येथील गुजर निंबाळकरवाडी येथील कनिष्ठ अभियंत्यांच्या सर्व्हेत आढळलेल्या सुमारे पन्नास सुरू असलेली व यापुर्वी करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांची यादी संबधित क्षेत्रिय कार्यालये आणि विभागीय कार्यालयाकडून अतिक्रमण निर्मुलन कार्यालयाकडे पोहोचली आहेत. अवघ्या तीन दिवसांत दोन-तीन क्षेत्रिय कार्यालयातील कनिष्ठ अभियंत्यांकडून साधारण पन्नास अनधिकृत बांधकामांचे फोटो, गुगल लोकेशन व जागा मालकांच्या नावासह तयार करून पाठविले आहेत. सर्वच क्षेत्रिय कार्यालयांकडून किमान महिनाभर प्रामाणिकपणे प्रयत्न झाल्यास याच बेकायदा बांधकामांची संख्या हजारोंमध्ये जाण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसाठी अलिशान गाड्यांची खरेदी; महापौर, उपमहापौरांसह…

येत्या तीन दिवसांत कारवाई तीव्र

यासंदर्भात अतिक्रमण निर्मुलन विभागाचे प्रमुख सोमनाथ बनकर यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले दोन झोनल विभागांकडून अनधिकृत बांधकामांबाबतचे अहवाल प्राप्त झाले आहेत. बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यासंदर्भात आयुक्तांनी कडक पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. येत्या दोन तीन दिवसांत बेकायदा बांधकामांवरील कारवाई तसेच व्यावसायीकांवरही कारवाई करण्यात येईल.

Web Title: Pune municipal commissioner has decided to take action against unauthorized constructions as per sop

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • Naval Kishore Ram
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.