Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune : महापालिका स्थायी समिती घेणार करवाढीचा निर्णय! प्रशासनाने ठेवलेल्या प्रस्तावावर निर्णय नाही

मिळकत कर वाढीचा निर्णय आता नव्याने स्थापन हाेणारी स्थायी समिती घेण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनाने ठेवलेल्या या प्रस्तावावर स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय हाेऊ शकला नाही.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 08, 2026 | 02:38 PM
'Bharat Mandapam' project in Lohegaon intended to safeguard a builder's interests: Congress alleges

'Bharat Mandapam' project in Lohegaon intended to safeguard a builder's interests: Congress alleges

Follow Us
Follow Us:
  • स्थायी समिती घेणार करवाढीचा निर्णय!
  • प्रशासनाने ठेवलेल्या प्रस्तावावर निर्णय नाही
  • वाहतूक व्यवस्थेवरील खर्च वाढला
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळकत कर वाढीचा निर्णय आता नव्याने स्थापन हाेणारी स्थायी समिती घेण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनाने ठेवलेल्या या प्रस्तावावर स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय हाेऊ शकला नाही. हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला आहे.

 

महापालिका प्रशासनाने मिळकत करात १० टक्के वाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी प्रशासनाने मांडलेल्या या प्रस्तावाला राजकीय पक्ष, नागरी संघटना आणि नागरिकांनी तीव्र विरोध केला हाेता. आम आदमी पार्टीने महापालिकेसमाेर “सुविधा अपुऱ्या, कर मात्र वाढीचे” असा सवाल करत आंदाेलन केले. महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ५०० चौरस फूटपर्यंतच्या मिळकतींना पूर्ण करमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. “आता करमाफी कुठे गायब झाली?” असा थेट सवाल ‘आप’ने उपस्थित केला. दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अन्यथा करवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

महापालिकेच्या वाढत्या खर्चाचा भार पेलण्यासाठी प्रशासनाने मिळकत करात वाढ सुचवली असली, तरी ही वाढ थेट पुणेकरांच्या खिशावर घाव घालणारी असल्याचा आरोप होत आहे. करवाढीच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली असून, नागरिकांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीने प्रस्तावावर निर्णय घेणे टाळल्याने हा विषय पुन्हा लांबणीवर पडला आहे.

वाहतूक व्यवस्थेवरील खर्च वाढला

पुणे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना पायाभूत सुविधा, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि वाहतूक व्यवस्थेवरील खर्च वाढत चालला आहे. मात्र, महापालिकेचे उत्पन्न अपेक्षित गतीने वाढलेले नाही. विशेष म्हणजे समाविष्ट गावांमधील मिळकत करवसुलीवर राज्य सरकारने घातलेली बंदी आणि नवीन मिळकतींची नोंदणी रखडल्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नाला मोठा फटका बसला आहे. आजही मिळकत करातून होणारे वार्षिक उत्पन्न २ हजार ५०० कोटी रुपयांच्या पुढे गेलेले नाही.

दोन ते तीनवेळा करवाढ नाकारली

मिळकत कर वाढीचा मुद्दा नवीन नाही. २०१६ मध्ये समान पाणीपुरवठा योजनेसाठी निधी उभारण्याच्या नावाखाली ११ टक्के करवाढ मंजूर करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर २०१७ ते २०२२ या कालावधीत सादर झालेले सर्व प्रस्ताव फेटाळण्यात आले. प्रशासकीय राजवटीतही कोरोना संकट आणि मुख्यसभा नसल्याचे कारण देत आयुक्तांनीच करवाढ नाकारली होती.

हे सुद्धा वाचा : मतदान झाले, धाकधूक सुरू! पुणे जिल्ह्यातील 827 उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद

चुकीच्या नियोजनाचा नागरिकांवर भुर्दंड नको

यंदा पुन्हा १० टक्के करवाढीचा प्रस्ताव समोर आल्याने पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. महापालिकेच्या चुकीच्या नियोजनाचा बोजा पुणेकरांवर टाकू नये, अशी मागणी होत आहे. कर वाढीऐवजी थकबाकी वसुली, नवीन नोंदणी आणि खर्चावर नियंत्रण यावर भर द्यावा, असा सूर नागरी संघटनांकडून व्यक्त होत आहे. आता नव्या स्थायी समितीचा निर्णय पुणेकरांसाठी निर्णायक ठरणार आहे.

Web Title: Pune municipal corporation standing committee likely to take decision on tax hike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • Naval Kishore Ram
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.