Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News: स्मार्ट सोलापूर सिटीवर Dirty चा लागला डाग! अंदाज समितीचा अंदाज; १२७० मीटर रस्त्यावर १५ कोटींचा खर्च

महापालिकेच्या मागील पाच वर्षांतील कॅग लेखापरीक्षण अहवाल तसेच मागील दोन वर्षाच्या अर्थसंकल्पाच्या प्रती समितीने मागवल्या आहेत. शनिवारी महापालिका अधिका-यांसोबत बैठक घेऊन विकासकामे, निधीचा वापर व लेखापरीक्षणातील मुद्दधांचा आढावा घेतला जाणार आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 22, 2026 | 11:30 AM
स्मार्ट सोलापूर सिटीवर Dirty चा लागला डाग! अंदाज समितीचा अंदाज; १२७० मीटर रस्त्यावर १५ कोटींचा खर्च

स्मार्ट सोलापूर सिटीवर Dirty चा लागला डाग! अंदाज समितीचा अंदाज; १२७० मीटर रस्त्यावर १५ कोटींचा खर्च

Follow Us
Follow Us:

शासनाच्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी सोलापूर दौऱ्यावर आलेल्या विधिमंडळ अंदाज समितीने शुक्रवारी शहरासह जिल्ह्यातील विविध कामांची पाहणी केली. अस्वच्छता, निकृष्ट कामे आणि निधीच्या वापराबाबत समितीने तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना जाब विचारला. केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत असलेल्या सोलापूरवर तडर्टी सिटीचा डाग समितीने आक्षेपातून टाकला. अवघ्या १२७० मीटर रस्त्यासाठी तब्बल १५ कोटी रुपये खर्च झाल्याने समितीच्या सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले.(फोटो सौजन्य – AI)

Dharashiv Zilla Parishad: महिला उद्योजकतेला बळ! प्रत्येक कर्जप्रकरणासाठी सीआरपींना ₹१ हजार; धाराशिवचा राज्यात पहिला प्रयोग

आ. अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीने रस्ते, जलसंधारण, घनकचरा व्यवस्थापन, नदीपात्र, महापालिका तसेच विविध विकासकामांची पाहणी केली. सिद्धेश्वर कारखानामार्गे कुंभारी रस्त्याची पाहणी करताना अल्पावधीतच रस्ता खराब झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर हैद्राबाद रोड ते मुळेगाव या केवळ १२७० मीटर रस्त्यासाठी १५ कोटी रुपये खर्च झाल्याचे समोर आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खर्चाचा सविस्तर तपशील मागविण्यात आला. विडी घरकुल वसाहतीच्या पाहणीत घनकचरा व सांडपाण्याची विल्हेवाट होत नसल्याचे आढळले. त्यामुळे स्वच्छतेवर समितीने तीव्र ताशेरे ओढले. सांडपाणी, कचरा व्यवस्थापन आणि त्यावरील खर्चाची माहितीही मागविण्यात आली. वाढीव एफएसआयच्या माध्यमातून बांधकामांना परवानगी दिल्यानंतर इमारतींच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची, असा सवालही समितीने उपस्थित केला.

आषाढी वारीसाठी ६५ एकर परिसरात दरवषीं हायमास्ट दिवे उभारण्यासाठी लाखो रुपये खर्च होतात. मग मागील वर्षीचे दिवे पुढील वर्षीं का वापरले जात नाहीत? असा सवाल समितीने उपस्थित केला. याबाबतचा खर्च व उपलब्ध साहित्याचा तपशील मागविण्यात आला.इब्राहिमपूर तलावासाठी दोन कोटी रुपये खर्च होऊनही पाणी येत नसल्याची तक्रार करण्यात आली. चुकीच्या बाजूला बांध घातल्याचा मुद्दाही समोर आला. निमगाव अंगणवाडीची दुरवस्था तसेच कोन्हाळी आश्रमशाळेतील निकृष्ट सुविधांवरही समितीने नाराजी व्यक्त करून संबंधित विभागांकडून खुलासा मागविला.

Manori Water Treatment Project: मनोरी जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध; ‘हजारो कुटुंबांच्या रोजगारावर संकट’

महापालिकेच्या मागील पाच वर्षांतील कॅग लेखापरीक्षण अहवाल तसेच मागील दोन वर्षाच्या अर्थसंकल्पाच्या प्रती समितीने मागवल्या आहेत. शनिवारी महापालिका अधिका-यांसोबत बैठक घेऊन विकासकामे, निधीचा वापर व लेखापरीक्षणातील मुद्दधांचा आढावा घेतला जाणार आहे. जिल्ह्यातील कामांच्या पाहणीसाठी तीन पथके असून प्रत्येक पथकात चार ते पाच आमदारांचा समावेश आहे. बाळे परिसरातील आदिला नदीची पाहणी करताना नदीच्या नैसर्गिक स्वरूपाशी छेडछाड करू नये, अशा स्पष्ट सूचना समितीने महापालिका प्रशासनाला दिल्या.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Smart solapur city tarnished by the dirty tag estimates committees assessment 15 crore spent on a 1 270 meter road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • maharashtra
  • Smart City
  • Solapur

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
2

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक
3

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती
4

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.