Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Harshvardhan Sapkal : शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये द्या, संपूर्ण कर्जमाफी करा; सपकाळांची सरकारकडे मागणी

महाराष्ट्र संकटात असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस पुण्याच्या दौऱ्यावर होते पण त्यांनी दुष्काळ निवारणासाठी व केंद्राकडून महाराष्ट्राला द्यायच्या मदतीवर चकार शब्दही काढला नाही, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 21, 2026 | 05:02 PM
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये द्या, संपूर्ण कर्जमाफी करा; सपकाळांची सरकारकडे मागणी

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये द्या, संपूर्ण कर्जमाफी करा; सपकाळांची सरकारकडे मागणी

Follow Us
Follow Us:
  • अमित शाह यांच्याकडून महाराष्ट्राची क्रूर थट्टा
  • पुण्याच्या दौऱ्यात मदतीवर चकार शब्दही नाही
  • हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
पुणे : महाराष्ट्र सध्या भिषण दुष्काळाचा सामना करत आहे. पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे, शेतकरी व शेतमजूरही संकटात आहे, पिण्याच्या पाण्याचीही भयंकर समस्या आहे. महाराष्ट्र संकटात असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस पुण्याच्या दौऱ्यावर होते पण त्यांनी दुष्काळ निवारणासाठी व केंद्राकडून महाराष्ट्राला द्यायच्या मदतीवर चकार शब्दही काढला नाही, ही महाराष्ट्राची क्रूर थट्टा आहे. मुख्यमंत्री व दोन्ही मुख्यमंत्र्यांशी त्यांनी चर्चा केल्याचे समजते पण ही चर्चा राज्यातील समस्यांवर नव्हती, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

 

पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा प्रभारी, विधानसभा प्रभारी, जिल्हा प्रभारी, जिल्हाध्यक्ष यांची आढावा बैठक प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात पार पडली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे गटनेते सतेज बंटी पाटील, काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्या प्रणिती शिंदे, माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव मोहन जोशी, वरिष्ठ उपाध्यक्ष माजी मंत्री रमेश बागवे, वरिष्ठ उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी, शहराध्यक्ष दिप्ती चवधरी, प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.

यावेळी प्रसारमाध्यामांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपा महायुती सरकार करत आहे. कोणाचीही मागणी नसताना ८० हजार कोटी रुपयांच्या शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला आहे, तर दुसरीकडे ३६ हजार कोटी रुपये कुंभमेळ्यावर खर्च केले जात आहेत. हा सर्व निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वळवला पाहिजे. शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्यावेत, संपूर्ण कर्जमाफी करावी, चारा छावण्या तात्काळ सुरु कराव्यात, पिण्याच्या पाण्याचे मायक्रो नियोजन करावे. शेतकऱ्यांबरोबरच शेतमजुरांना गावातच मनरेगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून द्यावा, ग्रामीण भागातील स्थलांतर रोखले पाहिजे पण सरकार यातील काहीच करताना दिसत नाही. दुष्काळाची परिस्थिती पाहता सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवली पाहिजे पण सरकार फक्त वल्गना करत आहे, त्यांना दुष्काळाचे गांभिर्यच नाही. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, अशी देवेंद्र फडणवीस यांची अवस्था आहे.

देवेंद्र फडणवीस झाडखाऊ मुख्यमंत्री

महाराष्ट्रात विकास प्रकल्पाच्या नावाखाली पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे. कर्जतमधील भीमाशंकरच्या डोंगरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. साताऱ्यातही असाच एक प्रकल्प प्रस्तावित आहे. वाढवण बंदर प्रकल्पही स्थानिकांना उद्ध्वस्थ करणारा व पर्यावरणाला मोठा धोका आहे. पर्यावरणाचे भिषण संकट उभे ठाकले आहे. या सर्व प्रकल्पासाठी होत असलेली वृक्षतोड पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इतिहासात झाडखाऊ म्हणून नोंद होईल, असे सपकाळ म्हणाले.

अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी करा

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर अनेक शंका उपस्थित होत आहेत. हा अपघात होता की घातपात याची चौकशी झाली पाहिजे पण सध्याची चौकशी अत्यंत संथगतीने होत आहे. सरकारचा अहवालही दिशाभूल करणारा आहे. या संपूर्ण घटनेची सीबीआय चौकशी न्यायाधिशाच्या देखरेखीखाली करावी व जनतेच्या मनातील शंका दूर करावी, असे सपकाळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा : अतिक्रमण रोखण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करा; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांचे आयुक्तांना पत्र

डिलिमिटेशन विधेयक राष्ट्रविरोधी

डिलिमिटेशन विधेयक हे राष्ट्रविरोधी आहे म्हणून काँग्रेस पक्षाने त्याला विरोध केलेला आहे. आमदार, खासदारांची संख्या वाढवून चालणार नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार वाढवले पाहिजेत. पण भाजपाला मात्र सत्तेचे केंद्रीकरण करायचे आहे. डिलिमिटेशन विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सत्ताधारी भाजपाकडून विविध आमिषं दाखवली जात आहे, धमक्या दिल्या जात आहेत, पक्ष फोडले जात आहेत. वाट्टेले ते करुन हे विधेयक मंजूर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीच्या घटक पक्षांशी यासंदर्भात सवन्वय साधत असून घटक पक्षही या विधेयकाला विरोध करतील अशी अपेक्षा आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हर्षवर्धन सपकाळ यांनी अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यावर काय टीका केली?

    Ans: महाराष्ट्र दुष्काळाचा सामना करत असताना अमित शाह यांनी केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीबाबत कोणतीही ठोस भूमिका मांडली नाही, अशी टीका सपकाळ यांनी केली.

  • Que: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काँग्रेसने कोणत्या मागण्या केल्या आहेत?

    Ans: शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत, संपूर्ण कर्जमाफी, चारा छावण्या सुरू करणे आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याची मागणी केली आहे.

  • Que: अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी काय मागणी केली?

    Ans: उत्तर : अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करून जनतेच्या मनातील शंका दूर कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Harshvardhan sapkal has criticized the government over issues concerning farmers nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 05:02 PM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • maharashtra

संबंधित बातम्या

Mhaswad: म्हसवडमध्ये संत नामदेव महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा; विविध धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय
1

Mhaswad: म्हसवडमध्ये संत नामदेव महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा; विविध धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय

अतिक्रमण रोखण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करा; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांचे आयुक्तांना पत्र
2

अतिक्रमण रोखण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करा; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांचे आयुक्तांना पत्र

Amravati Crime : अमरावतीत दरोड्याचा मोठा डाव उधळला; सात जणांना पोलिसांनी पकडले
3

Amravati Crime : अमरावतीत दरोड्याचा मोठा डाव उधळला; सात जणांना पोलिसांनी पकडले

Tata Dam Project: धरणाच्या ब्लास्टिंगमुळे घरांना तडे, ग्रामस्थांच्या जीवाला धोका; तापकीरवाडीत महिला-विद्यार्थ्यावर दगडांचा मारा
4

Tata Dam Project: धरणाच्या ब्लास्टिंगमुळे घरांना तडे, ग्रामस्थांच्या जीवाला धोका; तापकीरवाडीत महिला-विद्यार्थ्यावर दगडांचा मारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.