नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil)आणि राडा हे आता समीकरणच झालं आहे. तिच्या कार्यक्रमात गोंधळ होत असल्याच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहे. सोमवारीही पुन्हा असाच एक राडा झाला. नवी मुंबईतील कामोठे परिसरात गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत. यावेळेही अपेक्षेप्रमाणे गोंधळ झालाचं. कार्यक्रम सुरू असताना अचानक सर्पराजाचं आगमन झालं आणि सगळीकडे एकचं गोंधळ उडाला. आधीच तरुणांसह, लहान मुले आणि वयोवद्धांनाही गौतमीने वेड लावलं आहे. आता गौतमीच्या नृत्याची सापालाही भूरळ पडल्याची चर्चा सगळीकडे सुरू होती.
[read_also content=”12 वर्षाच्या बांधकामानंतर अमेरिकेत उभं राहिलं सर्वात मोठं हिंदू मंदिर! 185 एकरात पसरलेलं अक्षरधाम मंदिर भाविकांसाठी खुलं! https://www.navarashtra.com/world/america-largest-hindu-temple-akshardham-temple-i-inaugurated-in-new-jersey-nrps-467905.html”]
अजित पवार गटाचे नेते सचिव राजकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठे परिसरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. आपल्या नृत्याने सगळ्यांना वेड लावणाऱ्या गौतमीला पाहण्यासाठी तरुणांनी एकच गर्दी केली होती.
गौतमीचा कार्यक्रम ऐन रंगात असताना कार्यक्रमस्थळी अचानक नागराजाचं आगमन झालं. कार्यक्रमात साप शिरला आहे हे ऐकताच लोकांनी एकच गोंधळ करायला सुरुवात केली. दरम्यान एका सर्पमित्राला पाचारण करण्यात आलं. त्याने मोठ्या शिताफीने साप पकडला. त्यामुळे अनर्थ टळला. मात्र, या कार्यक्रमाला तरुणांनी तुफान गर्दी केली आणि धिंगाणा घातला. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचा धाक दाखवावा लागला. दरम्यान उत्साही प्रेक्षकांनी खुर्च्यांची तोडफोड केली.