Snake found in Symbiosis College event where Rajnath Singh and CM Devendra Fadnavis present
Snakes in symbiosis: पुणे : सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा सहावा दीक्षांत समारंभ सोहळा होणार आहे. स्कुल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजीचा शुभारंभ देखील केला जाणार आहे. किवळे येथे सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मात्र घटनास्थळी साप आढळून आल्याने एकच गोंधळ उडाला. या कार्यक्रमासाठी संरक्षण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांसह अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र कार्यक्रमस्थळी मंचाजवळ साप आढळल्यामुळे गोंधळ उडाला आहे.
सिम्बायोसिस कॉलेजमधील पदवी प्रदान सोहळ्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. दोन्ही नेते एकाच प्रमुख मंचावर बसणार होते. मात्र मंचावर साप रांगताना दिसून आला. या सापाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. मंचाच्या आसपासच्या परिसरामध्ये साप दिसून आला. प आढळल्यामुळे उपस्थित यंत्रणांची धावपळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, हा साप मंचाच्या खाली गेला आहे. मंत्री महोदय मंचावर येण्यापूर्वी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या सापाला बाजूला करण्याचे मोठे आव्हान यंत्रणांसमोर उभे राहिले आहे. तसेच या ठिकाणी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थिती राहणार असल्याने कार्यक्रमापूर्वी साप पकडण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ऑपरेशन सिंदूर हे देशाच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक असून, भारताच्या संरक्षण क्षमतेतील ऐतिहासिक पाऊल आहे,’ असे प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. गेल्या दहा वर्षांत देशाच्या संरक्षण साहित्य निर्मितीत मोठी झेप घेतली असून, ती ४६ हजार कोटी रुपयांवरून एक लाख ५० हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यामध्ये खासगी क्षेत्राचे सुमारे ३३ हजार कोटी रुपयांचे योगदान आहे. २०२९ पर्यंत देशाची संरक्षण उत्पादनक्षमता तीन लाख कोटी रुपयांपर्यंत आणि संरक्षण साहित्य निर्यात ५० लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे, असे त्यांनी सांगितले.
‘सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी’च्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. कौशल्य विकास हे आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीतील प्रमुख साधन असल्याचे सांगून सिंग म्हणाले, देश विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करीत असून ‘स्कील इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमांद्वारे कौशल्याधारित विकासाला चालना मिळत आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
केंद्र सरकारने यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले असून ‘प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना’अंतर्गत १.६३ कोटींहून अधिक उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच ‘जनशिक्षा संस्था’मार्फत ग्रामीण, आदिवासी व दुर्लक्षित घटकांतील ३० लाखांहून अधिक उमेदवारांना शिलाई, भरतकाम, हस्तकला, फळ प्रक्रिया आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील प्रशिक्षण दिले आहे. ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना’अंतर्गत २२ लाख कारागिरांना व्यवसायासाठी आधुनिक साधने देण्यात आली असून, देशात कौशल्य विकासासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे, असे त्यांनी सांगितले