• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Harshvardhan Sapkal Has Given His First Reaction After Sanjay Raut Complained

संजय राऊतांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्यानंतर हर्षवर्धन सपकाळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

संजय राऊत यांनी थेट दिल्ली दरबारी हर्षवर्धन सपकाळांची तक्रार केल्याचे बोलले जात आहे. यावरुन काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 16, 2025 | 04:37 PM
संजय राऊतांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्यानंतर हर्षवर्धन सपकाळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • संजय राऊतांनी पक्षश्रेष्ठींकडे सपकाळांची केली तक्रार
  • संजय राऊतांनी तक्रार केल्यानंतर हर्षवर्धन सपकाळांची पहिली प्रतिक्रिया
  • हर्षवर्धन सपकाळांनी विविध मुद्द्यावरही केलं भाष्य
मुंबई : महाविकास आघाडीमध्ये मनसेच्या संभाव्य समावेशावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याची तक्रार थेट काँग्रेस हायकमांडकडे केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मनसेला महाविकास आघाडीत घेण्याला हर्षवर्धन सपकाळ यांचा तीव्र विरोध आहे. याबद्दल संजय राऊत यांनी थेट दिल्ली दरबारी तक्रार केल्याचे बोलले जात आहे. यावरुन काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

निवडणूक प्रक्रियेतील गडबड घोटाळा हा सध्याचा महत्वाचा प्रश्न असून त्या अनुशंगाने निवडणूक आयोगाकडे गेलेल्या शिष्टमंडळात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सहभागी होते. मतदारयाद्यातील घोळ, मतचोरी हे विषय महत्वाचे आहेत. काँग्रेस पक्ष सातत्याने या मुद्दयाचा पाठपुरावा करत आहे, निवडणूक आयोगाच्या एकूण कारभारासंदर्भात काही गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत, यासाठी हे शिष्टमंडळ गेले होते, त्यामुळे कोणी काही तक्रार करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, दिनांक १३ ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या पॉलिटिकल अफेअर्स कमिटीची बैठक होती. त्यावेळीच प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी निवडणूक आयोगाकडे जाणाऱ्या शिष्टमंडळात काँग्रेसचे कोणते नेते सहभागी होणार आहेत, हे स्पष्ट केले होते. त्यानुसार जेष्ठ नेते, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षा गायकवाड सहभागी झाले होते. दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे माझी बैठक ठरलेली असल्याने मी दिल्लीला गेलो होतो. त्यामुळे काही तक्रार करण्याचा प्रश्न नाही.

निवडणुकीतील घोटाळ्याचा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुराव्यासह पर्दाफाश करत आहेत. यात महाराष्ट्रातील कामठी मतदारसंघ व मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील घोटाळेही त्यांनी उघड केले आहेत. या घोटाळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) व शिवसेना (उबाठा) यांना काँग्रेसने माहिती दिलेली आहे. निवडणूक आयोगाच्या भेटीतही बाळासाहेब थोरात यांनी घोटाळ्याची माहिती आयोगाकडे दिलेली आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

राज ठाकरे यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, निवडणूक आयोगाकडे गेलेले शिष्टमंडळ हे मतदार याद्यातील घोटाळे व एकूणच निवडणूक प्रक्रियेतील दोष यासंदर्भात होते, यात कोणत्या पक्षाला आघाडी वा युतीत सहभागी करून घेण्याचा मुद्दा नव्हता. मनसेकडून आघाडी विषयी कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणे उचित होणार नाही. इंडिया आघाडीत एखाद्या पक्षाचा सहभाग करायचा असेल तर त्याचा निर्णय इंडिया आघाडीतील घटक पक्ष घेतील, असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी याआधीही संवाद झालेला आहे व यापुढेही संवाद करण्यास आनंदच होईल, त्यासंदर्भात काहीही समस्या नाही, फोन करून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही देईन, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

‘मनाचे श्लोक’ नाव बदलून ‘मन की बात’ करा…

‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिलेली असतानाही काही संघटनांनी आक्षेप घेत या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले, या संघटना सेन्सॉर बोर्डालाही जुमानत नाहीत, त्यांनी जी गुंडगिरी करून चित्रपटाचे खेळ बंद पाडले ही आपली संस्कृती नाही. चित्रपट निर्मात्यांनी आता या चित्रपटाचे नाव बदलून ‘मन की बात’ करावे, असा टोलाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी लगावला..

Web Title: Harshvardhan sapkal has given his first reaction after sanjay raut complained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 04:37 PM

Topics:  

  • Harshvardhan Sapkal
  • MNS Chief Raj Thackeray
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Israel-Iran War : Epstein Filesवरुन लक्ष वळवण्यासाठी हे विनाशकारी युद्ध; खासदारांचा मोठा दावा, चर्चांना उधाण
1

Israel-Iran War : Epstein Filesवरुन लक्ष वळवण्यासाठी हे विनाशकारी युद्ध; खासदारांचा मोठा दावा, चर्चांना उधाण

जनार्दन वाघमारे यांच्या निधनाने शिक्षण, साहित्य अन् समाजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रीया
2

जनार्दन वाघमारे यांच्या निधनाने शिक्षण, साहित्य अन् समाजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रीया

‘काँग्रेस संघटना बांधणीसाठी तीन दिवसांचे शिबिर’; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती
3

‘काँग्रेस संघटना बांधणीसाठी तीन दिवसांचे शिबिर’; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती

देशात दोन विचारधारांची लढाई, काँग्रेसची विचारधारा संविधानवादी तर भाजपची…; हर्षवर्धन सपकाळांची टीका
4

देशात दोन विचारधारांची लढाई, काँग्रेसची विचारधारा संविधानवादी तर भाजपची…; हर्षवर्धन सपकाळांची टीका

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Operation Epic Fury: PM मोदी भारतात पोहोचले अन् इराण झाला उद्ध्वस्त; इस्रायली राजदूताने उघड केलं ‘त्या’ टायमिंगचं रहस्य

Operation Epic Fury: PM मोदी भारतात पोहोचले अन् इराण झाला उद्ध्वस्त; इस्रायली राजदूताने उघड केलं ‘त्या’ टायमिंगचं रहस्य

Mar 04, 2026 | 01:22 PM
Nashik Crime: संतापजनक! आधी गुंगीचे औषध दिले, नंतर मद्य पाजले आणि… दहावीच्या विद्यार्थ्यांकडून चिमुकल्यांवर अत्याचार

Nashik Crime: संतापजनक! आधी गुंगीचे औषध दिले, नंतर मद्य पाजले आणि… दहावीच्या विद्यार्थ्यांकडून चिमुकल्यांवर अत्याचार

Mar 04, 2026 | 01:20 PM
“सनई चौघडे” मध्ये राज हंचनाळेची दमदार एन्ट्री; ‘जय खानोलकर’च्या भूमिकेत घालणार धुमाकूळ

“सनई चौघडे” मध्ये राज हंचनाळेची दमदार एन्ट्री; ‘जय खानोलकर’च्या भूमिकेत घालणार धुमाकूळ

Mar 04, 2026 | 01:09 PM
मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तीव्र चटका; शेतीपिकांसह आरोग्यावर होणार गंभीर परिणाम?

मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तीव्र चटका; शेतीपिकांसह आरोग्यावर होणार गंभीर परिणाम?

Mar 04, 2026 | 01:08 PM
IND VS ENG Weather Report : भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनलमध्ये पाऊस बनणार ‘विलेन’? मोठ्या सामन्यापूर्वी कसं असेल मुंबईत हवामान?

IND VS ENG Weather Report : भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनलमध्ये पाऊस बनणार ‘विलेन’? मोठ्या सामन्यापूर्वी कसं असेल मुंबईत हवामान?

Mar 04, 2026 | 01:07 PM
ग्लेन मॅकग्राची भविष्यवाणी, ‘या’ दोन टीमदरम्यान होणार T20 World Cup 2026 चा अंतिम सामना, घमासान असणार मॅच

ग्लेन मॅकग्राची भविष्यवाणी, ‘या’ दोन टीमदरम्यान होणार T20 World Cup 2026 चा अंतिम सामना, घमासान असणार मॅच

Mar 04, 2026 | 01:05 PM
Middle East Conflict : मध्य पूर्वेत युद्धाचा भडका! भारताने धाडली महाशक्तीशाली युद्धनौका; भारतीयांच्या सुरक्षेसाठी मोठा प्लॅन

Middle East Conflict : मध्य पूर्वेत युद्धाचा भडका! भारताने धाडली महाशक्तीशाली युद्धनौका; भारतीयांच्या सुरक्षेसाठी मोठा प्लॅन

Mar 04, 2026 | 01:03 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.